आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

हा खेळाडू ब्रॅडमन यांना अखेरच्या डावात शुन्यावर बाद करून क्रिकेट इतिहासात अजरामरझाला होता


एरिक शेवटच्या डावात महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमनला शुन्यावर बाद करून क्रिकेट इतिहासात अजरामर ठरले.  एरिक केवळ 13 कसोटी सामने खेळले असतील, परंतु 7 व्या कसोटी सामन्यात ब्रॅडमन यांना 100 च्या जादूई सरासरीला स्पर्श करु दिला नाही. ब्रॅडमन यांना शेवटच्या डावात 100 च्या सरासरीसाठी अवघ्या चार धावांची गरज होती पण ते शून्यावर बाद झाले.

ब्रॅडमन

1948 एशेस मालिक पासून प्रसिद्धी झोतात आले. हॉलिसने त्याच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त एक कसोटी सामना खेळला. 1948 अ‍ॅशेस मालिकेच्या शेवटच्या सामन्यात त्यांना ओव्हल मैदानावर उतरण्याची संधी मिळाली.  योगायोगाने हा डॉन ब्रॅडमन यांचा शेवटचा कसोटी सामनादेखील होता.  पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 54 धावांवर गुंडाळला होता.  ऑस्ट्रेलियाकडून आर लिंडवॉलने 6 बळी घेतले. यानंतर ऑस्ट्रेलियाने आर्थर मॉरिसच्या शानदार 196 च्या मदतीने 389 धावांची विशाल धावसंख्या बनविली. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सिड बर्न्स (61 धावा) बाद झाल्यावर ब्रॅडमन तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस आले. हॉलिसने दुसर्‍या चेंडूवर ब्रॅडमन यांना बोल्ड केले.

new google

तिसर्‍या डावात इंग्लंडने थोडा संघर्ष केला परंतु लेन हटनने  अर्धशतक करुनही 188 धावांवर बाद झाला.  अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने डाव आणि 149 धावांनी सामना जिंकला आणि ब्रॅडमनला दुसर्‍या डावात फलंदाजीची संधी मिळाली नाही.  अशा प्रकारे 52 कसोटी सामन्यांच्या कसोटी कारकीर्दीत ब्रॅडमनची सरासरी 99.94 राहिली आणि चार धावांनी 7000 धावा पूर्ण करण्यातदेखील ते हुकले. या सामन्यात हॉलिसने ऑस्ट्रेलियाच्या पाच खेळाडूंना बाद करत 131 धावा दिल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2323 विकेट

ब्रॅडमन

1912 मध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेला एरिक हॉलिस 25 वर्षे क्रिकेट खेळला. त्यांचा प्रथम श्रेणीचा विक्रम जबरदस्त आहे.  त्यांनिो 515 प्रथम श्रेणी सामन्यात सुमारे 21 च्या सरासरीने 2323 विकेट्स घेतल्या आहेत. या गोलंदाजाने 182 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत, तर त्यांनी सामन्यात दहा बळी घेण्याची कामगिरी 40 वेळा केली आहे. हॉलिसने एका डावात 10 बळीही घेतले आहेत. वार्क्शायरकडून खेळत हॉलिसने काउन्टी क्रिकेटमध्ये 49 धावा देऊन 10 बळी घेतले.  त्यांनी 19 सीजनपैकी 14 काऊन्टी हंगामात 100 हून अधिक बळी मिळवले, जो एक विक्रम आहे.

 

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या 15 वर्षांत केवळ 13 कसोटी सामने खेळले

एरिक होलिसने 1935 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण महायुद्धामुळे त्यांना कमी आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली.  त्यांनी 13 कसोटी सामन्यांमध्ये 44 बळी घेतले आहेत.  तसेच पाच डावांमध्ये पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले.  या गोलंदाजाने 1950 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरची कसोटी खेळली होती.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here