Reading Time: 2 minutes

आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

दोन द्विशतक ठोकणाऱ्या न्यूझीलंडच्या या खेळाडूवर ओढावलय आर्थिक संकट: पत्नीने दिलाय घटस्फोट


इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावल्यानंतर न्यूझीलंडचा सलामीचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे चर्चेत आला आहे.  कॉनवेने या आश्चर्यकारक खेळीने अनेक विक्रम मोडले आहेत. पदार्पण कसोटीतच द्विशतक ठोकणारा तो न्यूझीलंडचा दुसरा फलंदाज आहे. कॉनवेपूर्वी डेब्यू कसोटीत दुहेरी शतक झळकाविणारा किवी फलंदाज मॅथ्यू सिन्क्लेअर होता.  न्यूझीलंडचा हा फलंदाज आज एकाकी जीवन जगत आहे. हे एेकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. मॅथ्यू सिन्क्लेअरकडे कायमची नोकरीदेखील नाही आणि त्यांची पत्नी टीना देखील त्याला सोडून गेली आहे.

न्यूझीलंड

न्यूझीलंडकडून 33 कसोटी सामन्यांमध्ये उजव्या हाताचा वरचा फलंदाज मॅथ्यू सिन्क्लेअरने 1635 धावा केल्या.  त्याने 26 डिसेंबर 1999 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले आणि या सामन्यात दुहेरी शतक झळकावले. इतकेच नाही तर सिसलेरने त्याच्या कसोटी कारकीर्दीत 3 शतके ठोकली, ज्यात दोन द्विशतकांचा समावेश आहे. सिन्क्लेअरने 54  एकदिवसीय सामन्यात 1304 धावा केल्या, त्यामध्ये त्याने 2 शतके आणि 8 अर्धशतके ठोकली.निवृत्तीनंतर सिनक्लेअरचे आयुष्य बदलले.

सेवानिवृत्तीनंतर मॅथ्यू सिन्क्लेअरचे आयुष्य पूर्णपणे बदलले.  सिनक्लेअर यांनी एका मुलाखतीत सांगितले की सेवानिवृत्तीनंतर नोकरी नाही आणि कुटुंब चालविण्यासाठी न्यूझीलंड सरकारच्या बेरोजगार भत्त्यांवर अवलंबून आहे. सिन्क्लेअरकडे कोणतीही पदवी नव्हती, यामुळे त्याला कोणतीही नोकरी मिळाली नाही.  आर्थिक अडचणींमुळे सिंकलेयर आणि त्यांची पत्नी भांडण करू लागले.  सिन्क्लेअरवरही घरगुती हिंसाचाराचा आरोप होता आणि शेवटी त्याने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला.

न्यूझीलंड

आज मॅथ्यू सिन्क्लेअर रिअल इस्टेट कंपनीत काम करतोय. आणि त्याला कमिशनच्या आधारावर मोबदला मिळतो.  म्हणजे जेव्हा सिन्क्लेअर घर विकेल तेव्हाच त्याला पैसे मिळतील.  जर तो हे करू शकत नसेल तर पैसे मिळत नाहीत. पहिल्या कसोटीत दुहेरी शतक ठोकणारा खेळाडू असेच जीवन जगतो, यावर विश्वास ठेवणे खरोखर कठीण आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here