आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सोलापुरातला या जोडप्याने बांधल्या गोशाळेत रेशीमगाठी; हे होते कारण


सोलापूर : भटक्या प्राण्यांबाबत आजही अनेकांच्या मनात उदासीनता आहे. त्यांच्याकडे फारसे गांभीर्याने कोणी घेत नाही. त्या मुक्या प्राण्यांची भावना समजून घेत एक तरूण शहरातील भटक्या गायींची सेवा करत आहे. सतीश सिरसिल्ला असे या युवकाचे नाव आहे. सतीश गेल्या एक वर्षभरापासून भटक्या गायींची सेवा करतो. त्यांची सेवा करण्यात त्याला मनस्वी आनंद मिळतो.

रस्त्यावरती चाऱ्याच्या शोधात भटकंती करताना अनेक गायींचा अपघात होतो. वेळेत उपचार न मिळाल्याने जखमी अवस्थेत विवळत पडतात. प्रसंगी त्यांचा मृत्यूदेखील होतो. अशा प्रसंगी जर शहरात कुठे जखमी अवस्थेत गाय आढळून आली की सतीशला फोन येतो. त्या गाईंच्या मदतीसाठी तो हातातील काम बाजूला ठेवून त्या ठिकाणी तात्काळ धावून जातो. डॉक्टरांच्या मदतीने त्या गायींवर योग्य तो स्वखर्चाने औषध उपचार करतो.

गायीवर उपचार केल्यानंतर तिला पुन्हा सोडून दिले जाते. या औषध उपचार मधून काही गायींना जीवदान मिळाले.

new google

आयटीआय डिझेल मेकॅनिकलमध्ये शिक्षण घेतलेला ३१ वर्षीय सतीश हा जुना विडी घरकुल परिसरात राहतो. तो मोबाइल डिस्ट्रिब्युटर आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो एल.आर.जी प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने सामाजिक काम करत असतो. सामाजिक कार्याची आवड असलेला सतीश गायींविषयी खूप हळवा आहे. आतापर्यंत अनेक गायींना आपल्या मित्रांच्या सहकार्याने वाचवले आहे.

रेशीमगाठी

गायीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या या युवकाने काही दिवसांपूर्वी कत्तलीसाठी नेलेल्या गाईंची सुखरूप सुटका करण्यात यश आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन घोषित केला. मात्र रस्त्यावरील भटक्या मुक्या जनावरांची चारा पाण्याविना हालापेष्टा सुरू झाली. पोटाची भूक भागवण्यासाठी ते काहीही खाऊन दिवस काढू लागले. अश्या मुक्या गायींच्या भावाना या तरुणांने समजून घेत अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाच्या सहकार्याने त्यांच्या चारा पाण्याची सोय केली.

एक वर्षांपूर्वी सतीशच्या वाढदिवसाच्या  दिवशी एक गाय रस्ते अपघातात जखमी असल्याची माहिती सतीशला मिळ‍ली. त्याने त्या गायीला सर्व वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु गायीची परिस्थिती नाजूक झाल्याने तिचा जीव वाचू शकला नाही. त्यानंतर त्याने नित्य नियमाने गायींची सेवा करण्याचा निर्धार केला.

गोशाळेत केले लग्न

पृथ्वीवर गाय ही एकमेव अशी पशु आहे, जिला आपण मातेसमान मानतो. मानवी जीवनात तिचे असंख्य फायदे अाहेत. गाईचे शेण, गोमूत्र, दूध हे लाभदायक असते. पण आधुनिक काळात याचा विसर पडला आहे. याच गोमातेचा प्रसार-प्रचार व्हावा, म्हणून सतीश यांनी आपला विवाह गोमातेच्या  सान्निध्यात करून लोकांना गोसेवा करण्याचे आवाहन केले.

प्लास्टिकचा वापर टाळा

भटक्या गायी चाऱ्यासाठी दारोदारी, रस्तोरस्ती हिंडत असतात. कधी कधी ते प्लास्टिकसह अन्न खातात. त्यामुळे प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने गायीच्या पोटात त्या प्लास्टिकचा गोळा तयार होतो. त्याचा परिणाम गायीच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करू नये असे आव्हान सतीश यांनी केले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here