आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

येणाऱ्या टी20 वर्ल्ड कप मध्ये युजवेंद्र चहलची जागा या ३ गोलंदाजापैकी एक घेऊ शकतो…!


मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय टीम बर्‍याच दिवसापासून संघर्ष करताना दिसून येत आहे..हे भारतीय संघासाठी चांगले संकेत नाहीत,कारण टी-२० वर्ल्ड  सुद्धा यावर्षी होणार आहे. या  परिस्थितीत फिरकी विभागात मजबूत गोलंदाज असणे फार महत्वाचे होते. फिरकी गोलंदाज असला तरी त्याच्या फॉर्ममध्ये अडचण आहे आणि गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून भारतीय संघासाठी  हा चिंतेचा विषय आहे. अशा परिस्थितीत टी -20 विश्वचषकात फिरकी मारा करण्यासाठी  संघाला महत्वाचा गोलंदाज सापडणे गरजेचे झाले आहे.

युजवेंद्र चहल

युजवेंद्र चहलच्या फिरकी गोलंदाजीत काही शंका नसावी पण आता त्याच्या गोलंदाजीला थोडी कमी धार मिळत आहे. कदाचित विरोधी फलंदाजांनी  त्याला समजले असेल. अशा परिस्थितीत टीम इंडियाला टी -20 वर्ल्ड कपसाठी इतर पर्यायही शोधावे लागतील. या लेखात अशा तीन गोलंदाजांचा उल्लेख करण्यात आला आहे, जे चहलच्या जागी टी20 वर्ल्ड कपमध्ये  खेळू  शकतात.

new google

राहुल चहर: मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाने गेल्या काही काळासाठी उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. गेल्या दोन आयपीएलमध्ये त्याच्या गोलंदाजीत वाढती रेखा दिसली. याशिवाय यावर्षी इंग्लंडविरुद्ध टी -२० क्रिकेट सामन्यातही त्याने भाग घेतला आहे. चाहरने टी -20 क्रिकेटमध्ये  64 सामने खेळून 78 विकेट्स घेतल्या आहेत आणि चहलच्या जागी त्याला योग्य खेळाडू म्हणता येईल.

युजवेंद्र चहल

रवी बिश्नोई: पंजाबकडून खेळण्यापूर्वी बिश्नोईने १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली. तेथून त्याचे नाव चर्चेत आले. आयपीएलमध्ये त्याने 18 सामन्यांत एकूण 16 विकेट्स घेतल्या आहेत. चहलची जागा घेणारा तो उत्तम दावेदारही मानला जाऊ शकतो. त्याच्याकडे फिरकी आणि गुगली दोन्ही आहेत.

युजवेंद्र चहल

वरुण चक्रवर्ती: फिटनेस ही या प्लेअरची समस्या आहे. नाहीतर आत्तापर्यंत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असते. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी  निवड झाल्यानंतर तो जखमी झाला होता. त्यानंतर यावर्षी इंग्लंडविरुद्ध त्याला पुन्हा फिटनेस मिळवता आले नाही. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणारा ऑफस्पिनर वरुण चक्रवर्ती हा देखील  युजवेंद्र चहलच्या जागी संघात खेळण्याच्या शर्यतीत असेल.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here