आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

किस्से क्रिकेटचे: 1999च्या विश्वचषकात झिम्बाब्वेच्या या गोलंदाजाने भारताच्या तोंडून हिरावला होता विजयाचा घास! 


 

1999 या विश्वचषकात भारतीय संघाला झिंबाम्बे संघाविरूध्द मिळालेला पराभव भारतीय फॅन्स कधीच विसरु शकणार नाहीत. या सामन्यात एका वेगवान गोलंदाजाने एकाच षटकात तीन गडी बाद करून भारताच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला होता. हा पराभव भारतीय फॅन्सच्या इतका जिव्हारी लागला होता की, भारतीय खेळाडूंचे पुतळे जाळण्यात आले तर काही ठिकाणी त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली होती. हे घातक षटक टाकणारा गोलंदाज होता हेन्री ओलंगा. या सामन्यानंतर हेन्री ओलोंगा क्रिकेट जगतात एक स्टार म्हणून उदयास आला.

new google

विश्वचषक

इंग्लंडच्या लिस्टरशायर मैदानात झालेल्या या सामन्यात सचिन तेंडुलकर खेळला नव्हता. सामन्याआधी दोन दिवसांपूर्वी सचिनच्या वडिलांचे निधन झाल्याने तो भारतात परतला होता. सचिनच्या गैरहजेरीत झिम्बाम्बेविरुद्ध चा सामना भारतीय संघासाठी तसा कठीण नव्हता. मात्र भारतीय फलंदाजांनी हा सोपा पेपर अवघड करून टाकला आणि संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने अँडी फ्लॉवरच्या (६८)अर्धशतकी खेळाच्या जोरावर २५२ धावा केल्या होत्या.

सामन्यात भारतीय संघाने ५२ धावा अतिरिक्त दिल्या होत्या.  यासह क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक अतिरिक्त धावा देण्याचा  नकोसा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाला. तसेच या सामन्यात स्लो ओव्हर रेट मुळे भारतीय संघाच्या चार षटकांची कपात केली होती. यामुळे भारतीय संघाला ४६ षटकात २५३ धावा करायच्या होत्या. तसे पाहता, भारतीय संघासाठी हे आव्हान सोपे होते. मात्र भारतीय संघाची सुरूवात निराशाजनक झाली. सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि मोहम्मद अझरुद्दीन हे धुरंधर फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले आणि भारतीय संघ बॅकफूटवर गेला. त्यानंतर सदगोपन रमेश याने अजय जडेजाला हाताशी धरून धावसंख्या १५५ पर्यंत नेली.विश्वचषक

भारतीय संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना १५५ धावसंख्येवर सदगोपन रमेशने अजय जडेजाची साथ सोडली. सदगोपन रमेशच्या रुपात भारतीय संघाची चौथी विकेट पडली. रमेश पाठोपाठ अजय जडेजाही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर ४१ व्या षटकात नयन मोंगिया २८ धावांवर बाद झाला आणि सामन्यांत खूप मोठा ट्विस्ट आला. भारतीय संघाची विजयाची जबाबदारी आता रॉबिन सिंग आणि जवागल श्रीनाथ यांच्या खांद्यावर येऊन पोचले. अखेरच्या दोन षटकांत भारतीय संघाला ७ धावांची गरज होती. भारतीय संघ हा सामना सहज जिंकेल असं वाटत होते. मात्र घडले उलटच.

झिम्बाब्वेकडून ४५ वे घातक षटक टाकण्यासाठी हेन्री ओलोंगा नावाचा एक तरणाबांड गोलंदाज आला ज्याने भारताच्या  विजयाचे मनसुबे उधळून लावले. त्याने एका षटकात रॉबिन सिंग, व्यंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथ यांना बाद करून भारताच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. या रोमहर्षक सामन्यात झिम्बाब्वेने भारतावर विजय मिळवला. या विजयाचा नायक हेन्री ओलोंगा क्रिकेटमध्ये रातोरात स्टार झाला.

विश्वचषक

याअाधीही हेन्री ओलोंगा याने १९९८-९९ साली झालेल्या कोको कोला त्रिकोणी मालिकेत देखील खूप त्रास दिला होता. या मालिकेच्या साखळी सामन्यात एका साखळी सामन्यात झिम्बाब्वेने  २०५ धावांचे भारताला आव्हान दिले होते. या सामन्यातही हेन्री ओलोंगा भारताच्या टॉप ऑर्डर ला आपल्या घातक गोलंदाजीने सळो की पळो करून सोडले होते. त्याने सचिन तेंडुलकर, अजय जडेजा, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांना बाद केले. हा सामना झिम्बाब्वे संघाने १३ धावांनी जिंकला होता.

१९९८-९९ च्या कोकाकोला कप त्रिकोणी मालिकेत हेन्री ओलोंगा सचिन तेंडुलकरला बराच त्रास दिला होता. मात्र सचिनने अंतिम सामन्यात हेन्री अोलंगाचा हिशेब चुकता केला. सचिनने त्याची खूप धुलाई केली. अंतिम सामन्यात भारतानं झिम्बाब्वेचा दहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात सचिनने ९२ चेंडूत १२४ धावांची शानदार खेळी केली होती. हा सामना सचिनच्या शतकासह हेन्री ओलोंगाची झालेली धुलाई आणि सौरव गांगुलीने ग्रँट फ्लॉवरची एका षटकात मारलेले तीन षटकारांसाठी ओळखला जातो.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here