आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

अभिनेता सोनू सूदला भेटण्यासाठी हा चाहता तेलंगणाहून मुंबईला पायी निघालाय!


बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने त्याच्या मोठ्या मनाच्या स्वभावाने संपूर्ण देशवासियांचं मन जिंकून घेतलंय. कुणी त्याला देवाची उपमा देतंय, तर कुणी त्याला देशाचा पंतप्रधान रूपात पाहतंय. गेल्या वर्षीपासून न थकता तो अखंडपणे लोकांच्या मदतीसाठी धडपड करता करता ‘गरिबांचा मसिहा’ बनला. कोरोना काळात गरीबांचा मसिहा बनलेल्या सोनू सूदने हे सिद्ध केले की तो रियल लाइफ हीरो आहे. तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनलेला हा अभिनेता आजच्या काळातील लाखो लोकांनाच मदत करतोय. बर्‍याच लोकांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे. यासाठी त्याचे चाहते त्याचं मन जिंकण्यासाठी काहीतरी वेगळे करत आहेत.सोनू सूद

तेलंगणा या राज्यांतील एक चाहता त्याला मदत मागण्यासाठी मुंबईला पायी निघाला आहे. व्यंकटेश हरिजन असे या युवकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील विकाराबाद या जिल्ह्यातील दोरनालपल्ली गावचा रहिवासी आहे. इंटरमीडिएट च्या दुसऱ्या वर्गात शिकणारा २० वर्षीय व्यंकटेश मंगळवारी दुपारी सोलापूर शहरात पोहचला होता. सोलापूर शहरात ठिकठिकाणी या चाहत्याचे स्वागत केले. व्यंकटेश सोनू सूदच्या कोरोना काळतील समाजसेवेने प्रभावित झाला आहे. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवतात तर आईचे निधन झाले आहे. हातात अभिनेता सोनू सूदचा भलामोठा फोटो घेऊन तेलंगणाहून मुंबईकडे चक्क पायी निघाला आहे.

व्यंकटेशने १ जून रोजी तेलंगणा राज्यातील विकाराबाद या जिल्ह्यांतून मुंबईकडे आपला प्रवास सुरू केला आहे. प्रचंड उन्हामध्ये आतापर्यंत त्याने जवळपास ४०० किलोमीटरचे अंतर आठ दिवसात पूर्ण केले आहे. अजून  ४०० किलोमीटरचा प्रवास करायाचा आहे. यासाठी अजून त्याला आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार आहे. तो रोज ४१ किलोमीटरचा प्रवास पायी करत आहे. ऊन, वारा, पाऊस झेलत तेलंगणा ते मुंबई असा पायी प्रवास करणार्‍या व्यंकटेशचे लोक कौतुक आणि स्वागत करत आहेत. दिवसभर पायी चालून थकल्यावर रात्रीचा मंदिरात करतोय.

new google

चालून पाय थकले की तो सोनू सूद ची आठवण काढतो. यातून त्याला ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले. व्यंकटेश हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील अॅटोरिक्षा चालवितात. तो सोनू सूदला देव मानतो. सोनू सूदने कोरोनाकाळात केलेल्या कामाला सॅल्यूट करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी तो तेलंगणाहून मुंबईकडे पायी निघाला आहे. आपल्या आवडत्या हिरोच्या प्रेमापोटी चालत निघालेला पाहून लोक त्याला आर्थिक मदत करत आहे. पण तो पैशाच्या स्वरुपातली ही मदत नाकारत आहे. लोक त्याला जेवण, पाणी आणि फळे आणून देत आहेत. लोकांचे मिळणारे प्रेम पाहून तो भारावून गेला आहे.

सोनू सूद
दीर्घायुष्यासाठी करतोय प्रार्थना

व्यंकटेश म्हणाला की, सोनू सूद माझ्यासाठी देव आहेत.  मुंबईत त्यांची भेट झाल्यानंतर ते मला मदत करतील किंवा नाही हे मला माहीत नाही. पण त्यांनी लोकांना सतत मदत करावी.  आतापर्यंतच्या प्रवासात जिथेही मंदिर दिसले तिथे जाऊन मी सोनू सूदच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.

सोनू सूदने दिली ही प्रतिक्रिया

व्यंकटेशचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो सोनू सूद पर्यंत पोहचला. त्याने व्यंकटेशचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आणि म्हणाला की, “माझ्यावर खूप प्रेम दाखविल्याबद्दल धन्यवाद. पण तुमचा जीव धोक्यात घालवू नका, मला माहित आहे बरेच लोक माझ्यावर प्रेम करतात, त्या सर्वांना माझे प्रेम.”

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here