आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

ग्रेग चॅपल यांना प्रभावित केलेल्या ‘या’ खेळाडूंची कारकीर्द कर्णधार आणि निवड समितीमुळे संपली?


2005 हे वर्ष भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील बदलाचे वर्ष म्हणून ओळखले जाते. या काळात जॉन राइट यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा कालावधी पूर्ण केला होता आणि प्रशिक्षकपदाची धुरा ग्रेग चॅपल यांच्या खांद्यावरती येऊन पडली. याचदरम्यान सौरव गांगुलीला संघातून वगळण्यात आलं होतं. राहुल द्रविड हा संघाचा नवा सरसेनापती झाला होता. राहुल द्रविड आणि ग्रेग चॅपल यांच्या कार्यकाळात अनेक नव्या उदयोन्मुख खेळाडूंना भारतीय संघात एण्ट्री मिळाली. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे आंध्र प्रदेशचा वेणुगोपाल राव.Venugopal Rao Retirement From All Format Of Cricket - 37 साल की उम्र में वेणुगोपाल  राव ने लिया संन्यास, टीम इंडिया के लिए खेले सिर्फ 16 वनडे मैच | Patrika News

वेणुगोपाल राव मधील असलेली प्रतिभा पाहून क्रिकेट तज्ज्ञ वेणुगोपाल राव याला सौरव गांगुलीचा पर्याय समजू लागले होते.

२६ फेब्रुवारी १९८२ साली आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणम जिल्ह्यात जन्मलेल्या वेणुगोपालचे बालपण अत्यंत गरीब कुटुंबात गेले. वेणुगोपाल ला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असली तरी त्याने क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न बाळगले होते. अखेर त्याच्या मेहनतीला यश आले आणि २००५ साली त्याला भारतीय संघात एण्ट्री मिळाली. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना यानेदेखील पदार्पण केले होते.कर्णधार

new google

माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांना प्रभावित करणारा वेणुगोपाळ राव आपल्या कारकिर्दीत अवघे 16  सामने खेळू शकला. २००६ साली पाकिस्तानविरूध्द अबुधाबीच्या मैदानावर ६१ धावांची  सर्वोच्च खेळी केली. याच वर्षी वेस्ट झोनकडून खेळताना इंग्लंडविरूध्द त्याने 228 धावांची शानदार खेळी केली. वेणुगोपाल राव कडे प्रतिभा असूनही त्याला कर्णधार आणि निवड समितीकडून सहकार्य न मिळाल्यामुळे वेणुगोपाल बॅकफूटवर गेला अाणि 2006 वेस्ट इंडीजविरूद्ध त्याने शेवटचा सामना खेळला.

यानंतर तो पुन्हा कधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकला नाही. त्याचे कारणही तसेच होते. स्थानिक सामन्यात त्याची बॅट चालली नाही. त्यामुळे आपसूकच निवड समितीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. 2009 मधील आयपीएल विजेता संघ डेक्कन चार्जर्सच्या संघाचा सदस्य देखील होता. 2008 ते 2010 या काळात तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा कडून खेळत होता. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या वर्षी त्याने 11 सामन्यांत 36 च्या सरासरीने 288 धावा केल्या होत्या. 2011 साली त्याला दिल्ली डेअरडेविल्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले. 2014 साली त्याने आपला शेवटचा आयपीएलचा सामना सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळला होता.

2000 साली श्रीलंकेत झालेल्या 19  वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाने मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली विश्वचषकावर नाव कोरले होते. वेणुगोपाल या विजयी संघाचा देखील सदस्य होता. या विश्वचषकात वेणुगोपाल सोबत अजय रात्रा, युवराज सिंग, रितेंदरसिंग सोढी हे खेळाडूदेखील होते.

कर्णधार

वेणुगोपालने एकदा सांगितले होते की, 90च्या दशकात एखाद्या खेळाडूने म्हटले की त्याला भारतीय संघाकडून क्रिकेट खेळायचे तेव्हा लोक त्यांच्यावर हसायचे. पण आज वेणुगोपाळ ला खूप गर्व आहे की, त्याला भारतीय क्रिकेट संघातून खेळण्याचे स्वप्न साकार केले. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यानंतर वेणुगोपाळ राव हा भारतीय संघाकडून क्रिकेट खेळणारा दुसरा आंध्रप्रदेशचा खेळाडू आहे.

2005 श्रीलंकेविरूद्ध पदार्पण करणाऱ्या या खेळाडूने आपल्या कारकिर्दीतील 16  सामन्यांत 24.22 च्या सरासरीनं 218 धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणीच्या 221 सामन्यात 7081 धावा केल्या तर आयपीएलच्या 65 सामन्यात 985 धावा केल्या आहेत. अखेर त्याने 2019 साली क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here