आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक: लिहला हा संदेश!


   ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जॉन बुकानन ज्युनियर बुमराह म्हणून प्रसिद्ध असलेल्या सात वर्षांच्या अक्षज त्रिपाठी यांची भेट घेण्यासाठी उत्सुक आहेत. सोशल मीडियावर एका संदेशाद्वारे त्याने हे व्यक्त केले आहे. त्यांनी लिहिले आहे की ‘मी ज्या दिवसाची वाट पाहात आहे ज्या दिवशी अक्षज मला भेटणार आहे.’

जॉन बुकॅनन

जॉन बुकाननदेखील अक्षजला क्रिकेटच्या युक्त्या शिकवतील. यासह ते स्वत:च्या स्पोर्ट्स गिअर कंपनी लॉन्च टी च्या उत्पादनांचीहे मार्केटिंग करतील. जिल्हा मुख्यालय रुद्रप्रयागपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चोप्रा गावातील द्वारका प्रसाद त्रिपाठी आणि रेखा डंगवाल त्रिपाठी यांचा अक्षज हा मुलगा आहे. त्याचे क्रिकेटवर खूप प्रेम आहे.

द्वारका प्रसाद परिवारासह देहरादूनमध्ये राहतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अक्षजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये अक्षज गोलंदाजी करत होता. विशेष म्हणजे त्याची गोलंदाजीची स्टाइल टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराहसारखाच आहे. काही दिवसांत हा व्हिडिओ 1.5 कोटीहून अधिक लोकांना आवडला.

new google

प्रशिक्षक पॉल निक्सन यांनीही व्हिडिओवर दिली प्रतिक्रिया

इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक / फलंदाज आणि प्रशिक्षक पॉल निक्सन यांनीही व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.  त्याचवेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला सलग दोन वेळा विश्वविजेता बनवणारे माजी प्रशिक्षक जॉन बुचनन यांनाही मार्चमध्ये अक्षजविषयी माहिती मिळवली.

त्यांनी आपल्या कंपनीची जाहिरात करणारी टीम देहरादून येथे पाठविली होती. या पथकाने अक्षज आणि त्याचे कुटुंब तसेच त्यांच्या शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. अक्षजसह खेळाच्या मैदानावर अनेक व्हिडिओही शूट केले. हे व्हिडिओ लाँच टी कंपनीसाठी चित्रीत करण्यात आले होते.

जॉन बुकॅनन

आता क्रिकेटचे माजी प्रशिक्षक जॉन यांनी ज्युनियर बुमराहसाठी एक संदेश सोशल मीडियावर लिहिला आहे की ते अक्षजला भेटण्याची प्रतिक्षा करीत आहे. त्यांनी अक्षजला सांगितले आहे की, तू तुझ्या स्वप्नांचा पाठलाग कर यश तुला नक्कीच मिळेल. यासोबतच कंपनीने एक पोस्टरही जारी केले आहे. यात जॉन आणि अक्षयचा फोटो लावण्यात आला आहे.

या कंपनीचे भारतात होणार अोपनिंग

यावर्षी ही कंपनीचे अोपनिंग भारतात होणार आहे, त्यामध्ये अक्षज खास सामील होणार आहे. असे सांगितले जात आहे की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जॉन ज्युनियर बुमराह यांची भेट घेईल.  अक्षजचे वडील डीपी त्रिपाठी आणि आई रेखा डंगवाल त्रिपाठी यांनी सांगितले की, ते मुलाच्या क्रिकेटवरील प्रेमामुळे भारावून गेले आहेत.  लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर अोळख मिळवणे हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.

सकाळी आणि संध्याकाळी करतो गोलंदाजीचा सराव

ज्युनियर बुमराह आपल्या देहरादून निवासस्थानी दररोज सकाळी आणि संध्याकाळी किमान एक तास गोलंदाजीचा सराव करतो.  जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजीच्या अॅक्शनमध्ये तो आपल्या यॉर्करने एका यष्ट स्टम्पला मारतो.

यासोबतच तो भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सर्वाधिक आवडता फटका हेलिकॉप्टर शॉटचा देखील सराव करतो. उत्तराखंड राज्याचे गीतलेखक व क्रीडा समालोचक हेमंत बिस्ट यांनी ज्युनियर बुमराहची खूपच प्रशंसा केली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here