आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत पाकिस्तानच्या खेळाडूंना किती मिळते सॅलरी?


पाकिस्तानकडे एकापेक्षा जास्त सर्वोत्कृष्ट खेळाडू आहेत ज्यांनी जगभरात नाव कमावले आहे. बाबर आजम, मोहम्मद रिजवान, शाहीन आफ्रिदी असे खेळाडू मैदानावर उत्तम प्रदर्शन करतात.  परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की पीसीबी या खेळाडूंना फारच कमी पगार देते. कमी पैसा मिळत असल्यामुळे काही क्रिकेटपटू पैसा कमावण्याच्या नादात मॅचफिक्सिंग सारख्या वाम मार्गाकडे वळताना देखील दिसून येतात. मॅचफिक्सिंग अडकल्यामुळे अनेक क्रिकेटपटूंची कारकीर्द देखील संपली.खेळाडू

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वारंवार बीसीसीआयकडे भारतीय संघाचा पाकिस्तानचा दौरा  करण्याची विनंती करत असतो. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांतील राजकीय संबंधांमुळे क्रिकेटचे सामने गेल्या बऱ्याच वर्षांपासून खेऴे जात नाहीत. मात्र आयसीसीच्या स्पर्धेत हे दोन्ही संघ एकमेकांविरूद्ध भिडतात. पाकिस्तानी खेळाडूंचे पगार इतके कमी आहेत की, माजी कसोटी क्रिकेटपटू आकाश चोप्राला त्यांच्याबद्दल वाईट वाटले. आकाश चोप्रा याने पाकिस्तानला आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सल्ला दिला.

पाकिस्तानच्या केंद्रीय करारानुसार खेळाडूंचे तीन ग्रेड आहेत.  प्रथम श्रेणीतील खेळाडूंना वर्षाकाठी 46 लाख रुपये मिळतात.  दुसरीकडे, ग्रेड ब खेळाडूंना केवळ 28 लाख रुपये मिळतात.  ग्रेड सी मध्ये समाविष्ट असलेले खेळाडू वर्षाकाठी फक्त 19 लाख रुपये मिळतात.

new google

पाकिस्तानी खेळाडूंची मॅच फी किती?

पाकिस्तानच्या खेळाडूंची कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 सामन्याची फी खूपच कमी आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना कसोटीसाठी 6.6 लाख रुपये, तर एकदिवसीय सामन्यांसाठी 2.2 लाख रुपये मिळतात. टी 20 सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना 1.6 लाख रुपये मिळतात. पाकिस्तानी खेळाडूंना किती बोनस मिळतो याबद्दल माहिती नाही. आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब व्हिडीओमध्ये ही सर्व माहिती दिली.

खेळाडू

भारतीय खेळाडू आहेत श्रीमंत

पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय खेळाडूंची कमाई जास्त आहे.  भारतातील ग्रेड ए + खेळाडूंना वर्षाकाठी 7 कोटी रुपये मिळतात.  ग्रेड ए चे खेळाडू 5 कोटी, ग्रेड बी – 3 कोटी आणि ग्रेड सी चे खेळाडू वार्षिक 1 कोटी रुपये कमवितात. भारताच्या खेळाडूंना कसोटी सामना खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. त्याचबरोबर वनडे खेळण्यासाठी 6 लाख रुपये आणि टी -20 खेळण्यासाठी 3 लाख रुपये दिले जातात.

चांगल्या कामगिरीबद्दल बक्षीस मिळते.

भारतीय खेळाडूंनाही चांगल्या कामगिरीसाठी बोनस मिळतो.  शतक आणि डावात पाच विकेट घेण्यास 5-5 लाखांचा बोनस उपलब्ध आहे. त्याचबरोबर दुहेरी शतक ठोकण्यासाठी 7 लाख रुपये दिले जातात. जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटूना बीसीसीआय सर्वाधिक मानधन देते. यासह भारतीय क्रिकेटपटू जाहिरातीच्या माध्यमातूनही सर्वाधिक कमाई करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक: लिहला हा संदेश!   

4 ओव्हरमध्ये ९ रन देऊन एक विकेट, राशिद खानच्या आताषबाजीत विरोधी संघ झाला गारद!

WTC Final: या जोडीने सलामीवीर म्हणून डावाची सुरवात करावी, युवराज सिंगने सुचवले हे खेळाडू!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here