आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हिटमॅन रोहित शर्माचा विसरभोळेपणा स्वभाव; चक्क लग्नातच विसरला होता,कोहलीने सांगितला हा मजेदार किस्सा!


भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएलचा विजेता बनवणारा रोहित शर्मा हा विक्रमांचा राजा आहे. क्रिकेटच्या मैदानावरील त्याची कव्हर ड्राईव्ह पाहण्यासारखी आहे, पण त्याला अशी एक सवय आहे ज्यामुळे खेळाडूपासून ते त्याच्या पत्नीपर्यंत सर्वच जण त्रस्त आहेत.

रोहितच्या या सवयीवर एकदा कर्णधार विराट कोहलीने एक किस्सा सांगितला होता. रोहितची वाईट सवय काय आहे आणि लोकांना यातून कसा त्रास होतो.

Exclusive | Rohit Sharma still hasn't cracked the code of Test cricket: Ramiz Raja | Cricket News – India TV

‘विसरभोळा’ रोहित शर्मा

वास्तविक, भारतीय संघाचा धुरंधर फलंदाज रोहित शर्मा याचा स्वभाव विसरभोळा आहे. त्याच्या विसरभोळेपणामुळे तो अनेकदा अनेक किमती वस्तू जागीच विसरून जातो. त्याच्या या स्वभावावर भारतीय संघातील सदस्य आणि त्याची पत्नीने  याबद्दल अनेकदा खुलासा केला आहे.

कोहलीने एक रंजक किस्सा सांगितला

एकदा त्याच्या विसरभोळेपणामुळे रोहित मोठ्या संकटात सापडला. त्यावेळचे किस्से सांगताना विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितले होते की एकदा रोहित आपल्या लग्नाची अंगठी हॉटेलमध्येच विसरुन आला.  तो नवविवाहित होता, अशा परिस्थितीत रोहितच्या लग्नाची अंगठी विसरला. आजही विराट त्याची बर्‍याच प्रसंगी खेचाखेची करतो.रोहित शर्मा

अशा प्रकारे लग्नाची अंगठी सापडली.

स्वतः रोहितने एका मुलाखतीत याची कबुली दिली होती आणि आपल्या लग्नाची अंगठी विसरल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘विमानतळावर पोहोचल्यानंतर उमेश यादवचे बोट पाहून मला आठवले की मी अंगठी घालायचो विसरलो. यानंतर मी हरभजनसिंगला बाजूला बोलावलं आणि त्याला सांगितले की तुझ्या ओळखीची एखादी व्यक्ती हॉटेलमध्ये आहे, तू कृपया त्याला फोन कर आणि रिंग घेऊन येण्यास सांगा. रोहितला रिंग मिळाली, पण हळू हळू सर्वांनाच या गोष्टीची माहिती मिळाली. विराट कोहलीने याबद्दल फक्त गडबड केली आणि त्याला खूप खेचले.

रोहित शर्मा पासपोर्टसुद्धा विसरला आहे

रोहित शर्मा एकदा आंतरराष्ट्रीय दौर्‍यावर जात असताना त्याचा पासपोर्ट विसरला. खरं तर रोहितचा साथीदार शिखर धवनने खुलासा केला होता की, tत्याने विमानाच्या पुढच्या सीटच्या मागील पाकिटात आपला पासपोर्ट ठेवला होता. आणि विमानातून बाहेर येताना ते पासपोर्ट घेऊन न येता तिथेच ठेवून आला.

रितिका करते मदतरोहित शर्मा

त्याची जीवनसाथी रितिका यापूर्वी रोहितची मॅनेजर होती. अशा परिस्थितीत रोहितच्या या सवयीमुळे ती बर्‍याच वेळा त्याच्या गोष्टी आठवत असे. मात्र, रोहितबरोबर लग्नानंतर रितिकालाही त्याच्या या सवयीमुळे त्रास झाला होता. जेव्हा जेव्हा ती रोहितला काहीतरी आणायला सांगते तेव्हा तो नेहमीच विसरला जातो.

हाताची नखे चावण्याची सवय

विसरभोळेपणा सोबत रोहित शर्माला बोटाची नखे चावण्याची देखील वाईट सवय आहे. यावर रोहित शर्मा म्हणतो की, मला ही सवय लहानपणापासून आहे. पण पूर्वीपेक्षा आता या सवयीवर नियंत्रण आले आहे.

रोहितची ड्रेसिंग रूममध्ये केली जाते टिंगल

रोहित शर्माच्या या सवयीमुळे अनेक वेळा ड्रेसिंग रूममधील इतर क्रिकेटर्स त्याचा खूप आनंद घेतात. रोहित त्याच्यावर बनवलेल्या मेम्सवरही खूप एन्जॉय करतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक: लिहला हा संदेश!   

4 ओव्हरमध्ये ९ रन देऊन एक विकेट, राशिद खानच्या आताषबाजीत विरोधी संघ झाला गारद!

WTC Final: या जोडीने सलामीवीर म्हणून डावाची सुरवात करावी, युवराज सिंगने सुचवले हे खेळाडू!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here