आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

या तीन दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकल्यात!


 

 धावा 

भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा कसोटी इतिहास खूप जुना आहे आणि या दोन्ही संघांमध्ये 59 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारताने 21 सामने जिंकले आहेत तर न्यूझीलंडने 12 सामने जिंकले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अनेकदा मोठे डाव पाहिले जातात आणि भारत आणि न्यूझीलंड यांच्यातही असेच काहीसे पाहिले गेले आहे. न्यूझीलंडविरुद्ध अनेक भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक कसोटी धावा केल्या आहेत. या लेखात, आम्ही अशा तीन भारतीय फलंदाजांची माहिती सांगणार आहोत ज्यांची नावे या संघाविरुद्धची सर्वात जास्त कसोटी धावा आहेत.

new google

न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय फलंदाज

3 राहुल द्रविड (222), अहमदाबाद कसोटी 2003धावा

2003 मध्ये भारतीय दौर्‍यावर आलेल्या न्यूझीलंडने अहमदाबादमध्ये कसोटी मालिकेचा पहिला सामना खेळला होता. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत आपला निर्णय पूर्णपणे योग्य सिद्ध केला. संघासाठी तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या राहुल द्रविडने शानदार डाव साकारला द्रविडने भारताच्या पहिल्या डावात 387 चेंडूंचा सामना करत 28 चौकार आणि एका षटकारासह 222 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या मदतीने भारताने पहिल्या डावात 500 धावा काढून डाव घोषित केला. दुसर्‍या डावात द्रविडनेही शानदार अर्धशतक झळकावले आणि या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केल्याबद्दल त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

2 पॉली उम्रीगर (223), हैदराबाद कसोटी 1955

1955 मध्ये न्यूझीलंड जेव्हा भारतात आला तेव्हा त्या दौर्‍यावर त्यांना भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागली होती. मालिकेचा पहिला कसोटी सामना हैदराबादमध्ये 19 ते 24 नोव्हेंबर दरम्यान खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने पॉली उम्रीगरच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर 498 धावांत 4 गडी गमावून पहिला डाव घोषित केला. दोन गडी बाद झाल्यावर तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या पॉली उम्रीगरने स्थिर फलंदाजी केली आणि 503 मिनिटे फलंदाजी करताना 223 धावा केल्या, या खेळीत त्याने 26 चौकार लगावले. अशा प्रकारे भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये डबल शतक ठोकणारे उम्रीगर पहिले फलंदाज ठरला.धावा

1 वीनू मांकड (231) चेन्नई कसोटी 1956

न्यूझीलंड विरुद्ध 1955-56 कसोटी मालिकेचा पाचवा सामना चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय कर्णधार पॉली उम्रीगरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.  उम्रीगराच्या या निर्णयाला त्याचे सलामीवीर मीनू मांकड आणि पंकज रॉय यांनी ऐतिहासिक भागीदारी करून पूर्णपणे इतिहास रचला. या सामन्यात माकडने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटींमध्येही सर्वाधिक धावा केल्या. 525 मिनिटे फलंदाजी करताना माकडने 21 चौकार ठोकले आणि 231 धावांची शानदार खेळी केली.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव

ऑस्ट्रेलियाला दोनदा चॅम्पियन बनवणारे प्रशिक्षक जॉन बुकॅनन ज्युनियर बुमराहला भेटण्यासाठी उत्सुक: लिहला हा संदेश!   

4 ओव्हरमध्ये ९ रन देऊन एक विकेट, राशिद खानच्या आताषबाजीत विरोधी संघ झाला गारद!

WTC Final: या जोडीने सलामीवीर म्हणून डावाची सुरवात करावी, युवराज सिंगने सुचवले हे खेळाडू!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here