आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यासाठी हे असतील पंच आणि मॅचरेफ्री; आयसीसीने नावे केली जाहीर!


भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 जूनपासून होणार्‍या ऐतिहासिक कसोटी सामन्यासाठी मैदानी पंच, तिसरे पंच आणि चौथे पंचांची नावे जाहीर केली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टनमध्ये खेळला जाणार आहे. इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि मायकेल गफ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी मैदानाचे पंच असतील.चॅम्पियनशिप

या प्रतिष्ठित सामन्यात इंग्लंडचे माजी सलामीवीर ख्रिस ब्रॉड आयसीसीच्या मॅच रेफरीची भूमिका साकारणार आहे.  आयसीसी एलिट पॅनेलचे सदस्य रिचर्ड कॅटलब्रू हे टीव्ही पंच असतील तर अमिरातीच्या आयसीसी आंतरराष्ट्रीय पंच पॅनेलचे अ‍ॅलेक्स वर्फ चौथे पंच म्हणून काम करतील, असे आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे. आयसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक (पंच व रेफरी) अ‍ॅड्रियन ग्रिफिथ म्हणाले, “विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी अनुभवी सामन्यांच्या अधिकार्‍यांच्या टीमची घोषणा करण्यास आम्हाला आनंद झाला आहे.”

चॅम्पियनशिप

new google

ते म्हणाले, “महामारीच्या दरम्यान ही सोपी वेळ नाही. आपण खूप भाग्यशाली आहोत की या प्रतिष्ठेच्या सामन्यात वर्षांनुवर्ष सातत्याने चांगली कामगिरी केलेले पंच-अधिकारी आपल्यासोबत आहेत. त्यांना आम्ही शुभेच्छा देतो.”

टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल मॅचसाठी साऊथॅम्प्टनचे मैदान गाठले असून सराव सुरू केला आहे.  न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिली कसोटी सामना अनिर्णित झाला असून दुसरी कसोटी 10 जूनपासून खेळविली जाणार आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा… करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!

WTC Final: रोहित शर्मा सोबत कोण करेल ओपनिंग? माईक हेसनने सुचवले हे नाव!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here