आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

‘द फॅमिली मॅन 2’चा वाद संपेना, आता या दिग्गज चित्रपट निर्मात्याने केली सिरीजवर बंदीची मागणी…!


‘द फॅमिली मॅन 2’ मनोज बाजपेयी आणि सामंथा अक्किनेनी स्टारर वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज झालेल्या या वेब सीरिजला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, तर दुसरीकडे दक्षिण भारतातील लोक अजूनही याबद्दल निषेध करत आहेत. रिलीज होण्यापूर्वीच तामिळ प्रेक्षकांनी ‘द फॅमिली मॅन 2’ वर बंदी आणण्याची मागणी केली होती. आता अलीकडेच तमिळ इंडस्ट्रीचे दिग्गज चित्रपट निर्माता भारतीराजा यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरून ‘द फॅमिली मॅन 2’ त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे.

द फॅमिली मॅन 2

वेब सिरीजच प्रदर्शन थांबवा अन्यथा प्राईम वर बहिष्कार टाकणार.

‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये तमिळ एलाम लोकांचे चुकीचे वर्णन केले गेले आहे असा आरोप चित्रपट निर्मात्या भारतीराजा यांनी निवेदनाद्वारे केला आहे. भारतीराजाने असेही म्हटले आहे की जर या वेब सिरीजच प्रदर्शन थांबविल नाही तर तामिळ लोक ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर बहिष्कार घालतील. या निवेदनात त्यांनी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना ‘द फॅमिली मॅन 2’ वर त्वरित बंदी घालण्याची मागणी केली आहे. यापूर्वी भारतीराजाने श्रीलंकेचा क्रिकेटर मुथय्या मुरलीधरन यांच्या बायोपिकविरोधात आवाज उठविला होता आणि शेवटी त्याला बंदी घातली गेली.द फॅमिली मॅन 2

new google

वेब सीरिजचे प्रकाशन थांबविण्याची विनंती तामिळनाडू सरकारने केली होती.

नाम तमीलार कच्ची (एनटीके) प्रमुख सीमन यांनीही अशीच विनंती केल्याच्या दुसर्‍याच दिवशी भारतीराजाचे हे विधान आहे. वेब सीरिजवर बंदी घातली नाही तर अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर बहिष्कार टाकील असेही सीमन यांनी एक निवेदन जारी केले. त्याच वेळी, ‘द फॅमिली मॅन 2’ चा ट्रेलर समोर आल्यानंतर, तमिळनाडू सरकारने माहिती व प्रसारण मंत्रालयाला या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सीझनच्या प्रदर्शनावर थांबण्यास किंवा बंदी घालण्याची विनंती केली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा= भारतातून  नष्ट झालेली शहर..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here