आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

आयपीएल 2021 मध्ये झालेत हे सर्वात मोठे विक्रम; विराट आणि धोनीने केलेत नवे विक्रम!


कोविड -19 च्या अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर इंडियन प्रीमियरचा चौदावा हंगाम अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आला आहे.  हंगामाच्या पहिल्या टप्प्यात, खेळाडूंनी काही अविश्वसनीय कामगिरी केली ज्याने सर्वांना प्रभावित केले.  या लीग दरम्यान कित्येक नवीन विक्रमांची नोंद देखील करण्यात आली. या लेखात आम्ही आयपीएल 2021 मध्ये केलेल्या सर्व मोठ्या विक्रमाबद्दल सांगणार आहोत:

6 हजार धावा – राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आयपीएलमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या, असे करणारा तो पहिला खेळाडू ठरला.आयपीएल 2021

5 हजार धावा – शिखर धवन या हंगामात स्पर्धेत चांगला खेळताना दिसत होता, स्पर्धा पुढे ढकलण्यापर्यंत ऑरेंज कॅप होती. त्याच मोसमात त्याने सलामीवीर म्हणून आयपीएलमध्ये 5 हजार धावा पूर्ण केल्या.

new google

एका संघाकडून सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारा कर्णधार

200 एमएस धोनीने आयपीएलच्या इतिहासात या मोसमात एकाच  संघाकडून 200 सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. धोनीने सर्वाधिक सामन्यात सीएसकेच्या संघाचे नेतृत्व करण्याचा विक्रम नोंदविला. 2008 पासून तो चेन्नईचा कर्णधार आहे.

4 हजार धावा – आयपीएल 2021 मध्ये रोहित शर्माने कर्णधार म्हणून 4000 धावा पूर्ण केल्या आणि असे करणारा तो चौथा भारतीय ठरला.आयपीएल 2021

50 अर्धशतके करणारा खेळाडू  – सनरायझर्स हैदराबादचा डावखुरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये 50 अर्धशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला. वॉर्नरनेही आपल्या नावावर 4 शतके केली आहेत.

150 बळी-  यष्टिरक्षक म्हणून एमएस धोनीने विकेटच्या मागे 150 शिकार केले आणि त्यामुळे असे करणारा तो पहिला यष्टिरक्षक ठरला.

एका षटकात सर्वाधिक 36 धावा – आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या षटकात रवींद्र जडेजाने 36 धावा केल्या. आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा संयुक्त विक्रम आहे.

आयपीएल 2021

सलग 4 वेळा शून्यावर बाद – निकोलस पूरनसाठी आईपीएल 2021 एका वाईट स्वप्नासारखे होते या फलंदाजाने या मोसमातील चार डावात शुन्य धावसंख्येवर बाद झाला आहे.

119 धावांची शतकी खेळी- संजू सॅमसनने कर्णधार म्हणून खेळताना  पंजाब किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 63 चेंडूत शानदार 119 धावा केल्या.

एका षटकात सलग 6 चौकार  – पृथ्वी शॉने कोलकाताचा वेगवान गोलंदाज शिवम मावीच्या एका षटकात सर्व चेंडूंत एक चौकार ठोकला, जो आयपीएलमध्ये प्रथमच एखाद्या फलंदाजाने केला आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here