आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

‘गब्बर’ झाला टीम इंडियाचा सेनापती; श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड;  मनीष पांडेचे पुनरागमन


भारतीय संघाचे मुख्य खेळाडू इंग्लंड दौर्‍यावर असल्याने बीसीसीआयच्या निवडकर्त्यांना श्रीलंका दौर्‍यासाठी बी संघाची निवड करावी लागली. श्रीलंका दौर्‍यासाठी 20 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली आहे. शिखर धवनला संघाचा कर्णधार बनविण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमारला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

श्रीलंका

जुलै महिन्यात भारत श्रीलंकेचा दौरा करेल. या दौर्‍याच्या एकदिवसीय आणि टी -20 मालिकेच्या तारखा प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रथम एकदिवसीय मालिका खेळली जाईल आणि त्यानंतर टी -20 मालिका सामने खेळल्या जातील. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै रोजी होईल. त्याचबरोबर शेवटचा टी -20 सामना 27 जुलै रोजी खेळला जाईल. 15 दिवसांच्या कालावधीत भारतीय संघ आपला श्रीलंका दौरा पूर्ण करेल.

देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, कृष्णाप्पा गौतम, चेतन सकारिया यांची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे. त्याचबरोबर वरुण चक्रवर्ती यालाही जागा मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठीही त्यांची निवड झाली होती. मात्र दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलिया जाऊ शकला नाही. मनीष पांडे संघात परतला आहे. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ यंदा श्रीलंका दौरा करेल.

new google

भारतीय संघ:श्रीलंका

शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक ​​पांड्या, नीतीश राणा, युजवेंद्र चहल, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन, राहुल चाहर, दीपक चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, नवदीप सैनी अाणि चेतन सकारिया

 

नेट बॉलर : ईशान परेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साईं किशोर, सिमरजीत सिंह

 

दौर्‍याचे वेळापत्रक

 

13 जुलै – पहिला वनडे सामना

16 जुलै – दुसरा वनडे सामना

19 जुलै – तिसरा वनडे सामना

22 जुलै – 1 टी 20 सामना

24 जुलै – दुसरा टी 20 सामना

27 जुलै – तिसरा टी 20 सामना

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here