आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक इंस्टाग्राम
===

द फॅमिली मॅन:2 साठी मनोज बाजपेयीला मिळाले एवढे कोटी, तर सामंथालाही मिळाले एवढे मानधन..!


 

मनोज बाजपेयी स्टारर ‘द फॅमिली मॅन‘ चा दुसरा सीझन 4 जून रोजी रिलीज झाला आणि प्रेक्षकांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शोसाठी मनोज बाजपेयी आणि सामंथा अक्केनेनी यांच्या फीसंदर्भातील दावा आता समोर आला आहे. ‘द फॅमिली मॅन सीझन 2’ साठी मनोज बाजपेयी यांनी 10 कोटी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर सामंथा अक्किनेनीला 3-4 करोड मिळाल्याचा दावा करण्यात येतोय.द फॅमिली मॅन

सामन्थाने दीड महिन्याचे लढाऊ प्रशिक्षण घेतले.

नुकतेच या मालिकेच्या दिग्दर्शिका सुपर्णा एस वर्मा यांनी  सांगितले होते की, ‘तामिळ बंडखोर’ राजी च्या भूमिकेत सामंथा अक्किनेनीने बरीच मेहनत घेतली आहे. तिने संपूर्ण क्रिया स्वत: केली. बॉडी डबल वापरली नाही. त्यासाठी तीने दीड महिना लढाऊ प्रशिक्षण घेतले. यानंतर पडद्यावर तिची अ‍ॅक्शन धारदार दिसली आहे.

सिरीजवरचा वाद आजूनही मिटलेला नाही.

द फॅमिली मॅन

सामन्था अकिनेनीच्या व्यक्तिरेखेमुळे वेब सीरिज सतत वादात आहे. तामिळनाडूतील लोक यास सतत विरोध करत आहेत. नुकतीच तामिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ चित्रपट निर्माते भारतीराजा यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून अमेझॉन प्राइम व्हिडिओवरून ‘द फॅमिली मॅन 2‘ चे प्रसारण त्वरित रोखण्याची मागणी केली आहे. भारथिराजाच्या मते, ‘द फॅमिली मॅन 2’ मध्ये तमिळ एलाम लोक चुकीच्या पद्धतीने रेखाटले आहेत.

या वेब सीरिजच प्रसारन बंद न केल्यास तामिळनाडूतील लोक ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर बहिष्कार घालतील अशी धमकीही भरतीराजाने दिली. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘द फॅमिली मॅन 2′ वर त्वरित बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा= भारतातून  नष्ट झालेली शहर..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here