आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भाऊ आणि पित्याला गमावणार्‍या चेतन साकारियाचा असा आहे प्रवास: श्रीलंका दौऱ्यात करणार पदार्पण !


गुरुवारी, बीसीसीआयने श्रीलंका दौर्‍यासाठी 20 सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. या पथकात अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. संघात 6 नवीन खेळाडूंची निवड करण्यात आली असून यामध्ये वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या नावाचा समावेश होता. वयाच्या 26 व्या वर्षी या युवकाला भारताचा कॉल अप मिळाला आहे आणि श्रीलंकेविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. तर या लेखात आम्ही तुम्हाला साकारियाशी संबंधित काही माहिती सांगणार आहोत.

साकारिया

1-  गुजरातच्या भावनगरमध्ये कांजीभाई आणि वर्षाबेन यांच्या घरी चेतन साकारीया यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1998 रोजी झाला.

new google

2- साकारियाला सुरुवातीला फलंदाज बनण्याची इच्छा होती, पण जेव्हा तो अकरावीमध्ये होता तेव्हा तो वेगवान गोलंदाज बनला.

3- 2015 च्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये 6 सामन्यात सौराष्ट्रकडून 15 बळी घेऊन तो चर्चेत आला.

4- साकारियाने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून ऑडिशन दिले होते.

5- त्याला 2020 च्या आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून रॉयल  बंगळुरू संघाने संधी दिली होती.

6- तो 2020 मध्ये सौराष्ट्र च्या रणजी ट्रॉफी विजेत्या संघाचा सदस्य आहे.

चेतन साकारिया

7- राजस्थान रॉयल्स ने त्याला 1.2 कोटी रुपयात खरेदी करून आपल्या संघात सामील केले.

8- आईपीएल 2021 सुरुवातीच्या टप्प्यात चेतनने सात सामन्यांत सात बळी घेतले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध त्याने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करत 3 विकेट घेऊन 31 धावा दिल्या.

9- वयाच्या 26 वर्षी त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  15 प्रथम श्रेणी, 7 अ दर्जाचे आणि 20  टी ट्वेंटी सामन्यात अनुक्रमे  41,10′ 35 बळी घेतले आहेत.

10 – कूच बिहार ट्रॉफीमध्ये सकारिया सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केल्याने त्याला शिष्यवृत्ती मिळाली होती आणि एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये ग्लेन मॅग्र्था ने त्याला प्रशिक्षणही दिले आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. 16 वर्षांच्या खेळाडूने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; सर्वांत लहान वयात ठोकले अर्धशतक!

या कारणामुळे दिनेश कार्तिकने रिषभ पंतची तुलना सहवाग आणि गिलक्रिस्टशी केली…!

WTC Final:या ३ गोलंदाजांना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here