आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

हार्दिक पंड्याच्या नावावर आहेत हे पाच अनोखे विक्रम; अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय खेळाडू !


भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतीच काही वर्षे झाली असून, त्याने आपल्या कामगिरीने जबरदस्त छाप सोडली आहे. हार्दिकने आतापर्यंत तिन्ही फॉर्मेटमध्ये भारतीय संघाकडून खेळण्यास सुरवात केली असून यामध्ये त्याने गोलंदाजी तसेच फलंदाजीद्वारे चमत्कार केले आहेत.हार्दिक पंड्या

हार्दिक पंड्याच्या नावावर आहेत हे पाच विक्रम

हार्दिक पंड्यामध्ये भारताचे उज्ज्वल भविष्य दिसत आहे, ज्यात  त्याला अजून खूप मोठा प्रवास करायचा आहे, परंतु आतापर्यंतच्या कारकीर्दीत हार्दिकने नक्कीच काही आश्चर्यकारक विक्रम केले आहेत. आतापर्यंतच्या कारकीर्दीत त्याने त्या पाच विक्रमांची नोंद केली अाहे जी इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आले नाही.

new google

कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा

भारताच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने 2017 साली श्रीलंकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हार्दिक  आपल्या पहिल्याच पदार्पणाच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेविरूध्द शतक ठोकले. या डावातील श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज पुष्पकुमाराच्या एका षटकात सर्वाधिक 26 धावा करण्याचा विक्रम केला आहे जे की इतर कोणत्याही भारतीय खेळाडूला असा विक्रम करता आला नाही.

टी -20 सामन्यात 30 पेक्षा जास्त धावा आणि 4 बळी

भारतीय संघासाठी या अष्टपैलूने खेळाडूने आपल्या अष्टपैलू कामगिरीने अनेक वेळा चमत्कार केले.  हार्दिक पंड्याच्या या अष्टपैलू क्षमतेने भारताला अनेक यश मिळवून दिले.  त्याचप्रमाणे मागील वर्षी इंग्लंडविरुद्ध त्याने टी -20 सामन्यात 33 धावांची खेळी केली आणि 4 बळीही घेतले.  30 पेक्षा जास्त धावा आणि 4 बळी घेणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

नॉटिंघॅम कसोटीत 5 बळी घेणारा तिसरा भारतीय गोलंदाज

इंग्लंडच्या मातीत विकेट घेणे भारतीय संघाच्या गोलंदाजांसाठी मोठी गोष्ट आहे. आणि जर एखादा गोलंदाज इंग्लंडमध्ये डावात 5 विकेट घेत असेल तर त्याच्याबद्दल काय बोलावे. गेल्या वर्षी भारतीय संघाने इंग्लंड दौर्‍यावर असताना नॉटिंघॅममध्ये खेळलेल्या कसोटी सामन्याच्या डावात पंड्याने 5 विकेट्स घेतल्या. यापूर्वी नॉटिंगहॅममध्ये कपिल देव आणि सलीम दुरानी यांनी केले होते.

हार्दिक पंड्या

आयपीएलमध्येहीही मोठा विक्रम

भारतीय संघात येण्यापूर्वी अष्टपैलू हार्दिक पंड्याची खरी छाप आयपीएलमध्ये दिसून आली जेव्हा त्याने मुंबई इंडियन्ससाठी उत्तम कामगिरी बजावली. हार्दिक पंड्याकडे आयपीएलच्या नावावर अनेक विक्रम आहेत, त्यापैकी एक म्हणजे गेल्या हंगामात त्याने केलेला अनोखा विक्रम.  आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध 4 बळी घेण्याबरोबरच त्याने पन्नास धावाही केल्या. युवराज सिंगनंतर ही कामगिरी करणारा दुसरा भारतीय ठरला.

सय्यद मुश्ताक अली करंडकातील एका षटकात 39 धावा

हार्दिक पंड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी, आयपीएलच्या मुंबई इंडियन्ससाठी तसेच घरगुती क्रिकेटमधील वडोदराच्या संघाकडून खेळताना अनेक विक्रम केले आहेत.  हार्दिक पांड्याने 2016 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये एका षटकात 39 धावा केल्या. या दरम्यान त्याने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. असे करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

इस्टर बेटावर सापडलेल्या या मूर्तींशी संबंधित रहस्य आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही सोडवता आलेले नाहीये..

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

खरचं धोनीने अनेक यष्टीरक्षकांचे करीयर संपवलंय का?

व्हिडीओ प्लेलीस्ट:

ना मिळेल फायनलमधी संधी, दिग्गज खेळाडू अजित आगारकरचे भाकीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here