आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

ख्रीस गेलने केलेल्या ह्या 3 वादळी खेळ्या क्रिकेटचे चाहते कधीच विसरू शकत नाहीत..!


जगातील युनिव्हर्स बॉस म्हणून प्रसिद्ध असलेल्या डाव्या हाताचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेलने वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. इंग्लंडमध्ये झालेली आयसीसी विश्वचषक 2019 ही त्यांची शेवटची वन डे स्पर्धा राहिली. त्यानंतर गेल एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसला नाही. 39 वर्षीय ख्रिस गेलने 284 एकदिवसीय सामन्यांच्या 279 डावात 9727 धावा केल्या आहेत. गेलने या काळात 1073 चौकार आणि 275 षटकार ठोकले आहेत, तर 85 धावांच्या स्ट्राईक रेट आणि 37.12 च्या सरासरीने या धावा केल्या आहेत. गेल मर्यादित षटकांचा एक चमकदार खेळाडू आहे, म्हणून त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक महान खेळ्या  नोंदविल्या आहेत. आजच्या या लेखात आपण त्याच्या तीन सर्वांत मोठ्या खेळ्याबद्दल जाणून घेऊया..ख्रीस गेल

140 रन्स विरुद्ध भारत, वडोदरा, 2002

ख्रिस गेलने1999 साली पदार्पण केले होते, परंतु 2000 सालानंतरच जगाने त्याला ओळखण्यास सुरुवात केली. २००२ साली गेलने भारतीय दौऱ्यावर चमकदार कामगिरी केली होती, वेस्ट इंडिजच्या विजयात त्यांचे विशेष योगदान होते. वडोदरा येथे झालेल्या सामन्यात सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या उत्कृष्ट खेळीच्या बदल्यामुळे संघाने २१२ धावा केल्या पण त्यानंतर खराब फलंदाजीमुळे संघ केवळ 290 धावा करू शकला. ख्रिस गेलने आपल्या संघाला शानदार सुरुवात करुन देत 140 धावांची खेळी केली.  त्यावेळीपर्यंत गेलने केवळ 5 शतके केली होती, त्यापैकी तीन भारतीय संघाविरुद्ध होते. गेलच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजने हा सामना जिंकला. त्या मालिकेत गेलने एकूण 455 धावा केल्या. ख्रीस गेल

new google

152 विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2004

ख्रिस गेलने 2004 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नाबाद 152 धावा केल्या. जरी त्याचा संघ पराभूत झाला होता, परंतु त्याचा डाव पाहण्यासारखा होता. गेलने या डावात 15 वेळा चौकार सीमा ओलांडली होती. यामुळे वेस्ट इंडिजने 50 षटकांत2 गडी गमावून404 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल जॅक कॅलिसने 139 धावांची खेळी साकारून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.

झिम्बाब्वे, 2015 विरुद्ध 215 धावाख्रिस गेल

एकदिवसीय विश्वचषकातील पहिले दुहेरी शतक झळकावणारा ख्रिस गेल जगातील पहिला फलंदाज ठरला. 2015 च्या विश्वचषकात गेलने झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची ताबडतोब खेळी केली. या खेळीदरम्यान गेलने 147 चेंडूंत 10 चौकार आणि 16 षटकारांच्या मदतीने 215 धावा चोपल्या. याच सामन्यात गेलने 35 धावा देऊन 2 बळीही घेतले होते..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : निर्वानिकरन : पर्यावरणाची सर्वांत मोठी समस्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here