आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
चुडामणि देवी मंदिर या मंदिरात चोरी केल्याने होतात भक्तांच्या इच्छा पूर्ण..!
असे म्हणतात की चोरी करणे हे पाप आहे. जर कोणी चोरी केली असेल तर शेजारी किंवा कुटुंबातील सदस्य त्याच्याबद्दल वाईट गोष्टी सांगतात. या व्यतिरिक्त, जर कोणी चोरी करताना पकडला गेला असेल तर त्याला तुरूंगच्या हवालाही सामोरे जावे लागेल. पण जर आपण असे म्हणतो की देवाच्या मंदिरात चोरी केल्याने शिक्षेऐवजी तुमची इच्छा पूर्ण होईल, तर मग तुम्ही काय म्हणाल? होय, यावर विश्वास ठेवा किंवा नाही, परंतु हे सत्य आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत, जेथे चोरी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते. या मंदिराची ही परंपरा बर्याच वर्षांपासून चालत आली आहे.. उत्तराखंडच्या देव भूमि रुड़कीच्या चुडियाला गावात वसलेले हे प्राचीन आणि अनोखे मंदिर सिद्धपीठ चुडामणी देवीचे आहे.
चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे हा प्रकार..
मंदिरात चोरी करा आणि चमत्कार पहा …
या देवीच्या चमत्कारामागे एक कथा सांगितली जाते ती अशी की, अनेक शतकांपूर्वी एक निसंतान राजा या जंगलात शिकार करायला आला होता. त्याला तेथे देवीच्या पिंडीचे दर्शन झाले होते. राजाने पिंडीला नमन केले आणि मुलगा मागितला. देवीने त्यांची विनंती मान्य केली. काही महिन्यांनंतर, राजाला त्याचा मुलगा मिळाला आणि त्याने येथे भव्य असे देवीचे मंदिर बांधले.
या मंदिरात, मुलगा पाहिजे असा नवस करून नवरा-बायको देवीच्या पाया पडायला येतात. असी मान्यता आहे कि या जोडप्यांनी देवीच्या पायाजवळ ठेवलेले लाकडी गठ्ठे लपवून घेऊन जायचे. आणि आपल्या घरी न्यायचे. जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण होते तेव्हा ते देवीजवळ भंडारा करतात आणि तश्याच लाकडी गठ्ठे देवीच्या पायाजवळ आणून ठेवतात. आसीही धारणा आहे कि, हे लाकडी गठ्ठे घेऊन मंदिराच्या बाहेर पडताना ते घरी जाईपर्यंत कोणालाही दिसु द्यायचे नाही.
या मंदिराला शक्तीपीठ असेही म्हणतात.
ज्या ठिकाणी माता सती यांचे अंग व दागिने पडले तेथे शक्तिशाली शक्तीपीठ स्थापन केली गेली आहेत. असे मानले जाते की या मंदिराच्या ठिकाणी आई सतीची बांगडी पडली होती. म्हणूनच या मंदिराला चुडामणि देवी मंदिर असे नाव देण्यात आले आहे. हे अत्यंत प्राचीन मंदिर भक्तांच्या श्रद्धाचे केंद्र आहे. नवरात्रोत्सवात येथे एक विशाल मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
बाबा बनखंडी यांचे थडगे .
माता चुडामणियांचे खास भक्त,बाबा बनखंडी यांची समाधी याच परिसरात आहे. आपल्या आयुष्याची अनेक वर्षे त्यांनी देवीच्या सेवेत व भक्तीत घालविली.1909 मध्ये त्यांनी या मंदिरात समाधी घेतली. येथे येणारे भक्त येथे नतमस्तक होण्यास विसरत नाहीत.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : निर्वानिकरन : पर्यावरणाची सर्वांत मोठी समस्या