सर्वांत कमी वयाचे हे ५ खेळाडू आयपीएल २०२१ मध्ये चमकवू शकतात स्वतःच करीयर…!


आयपीएलचा उर्वरित हंगाम लवकरच सुरु होणार आहे. ज्यात अनेक दिग्गज खेळाडू भाग घेतील.युएई मध्ये खेळल्या जाणऱ्या बाकीच्या हंगामात दिग्गज खेळाडूश काही नवीन तरुण युवा खेळाडूसुद्धा भाग घेतील. आपापले कौशल्य दाखवण्याचा त्यांना यापेक्षा चांगला दुसरा चान्स मिळणार नाही. आजच्या या लेखात जाणून घेऊया आयपीएल 2021 मध्ये  सर्वांत कमी वयाचे खेळाडू कोणते आहेत ते..

अभिषेक शर्मा (20 वर्षे 215 दिवस)

अभिषेक शर्मा या हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाचा एक भाग आहे. त्याने आयपीएलमध्ये 145.92 च्या स्ट्राइक रेटसह 14 सामने खेळल्यानंतर आतापर्यंत 143 धावा केल्या आहेत. याशिवाय अभिषेक चांगल्या गोलंदाजाचीही भूमिका साकारू शकतो. आयपीएलपूर्वी अभिषेकने भारतीय अंडर 19  संघासाठी विश्वचषकात अष्टपैलू म्हणून महत्वाची भूमिका बजावली होती.

 रवी बिश्नोई (20 वर्षे 214 दिवस)खेळाडू

पंजाब किंग्जकडून खेळणारा लेगस्पिनर रवी बिश्नोईने गेल्या आयपीएल मोसमात आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. या दरम्यान, बिश्नोईने 31.33 च्या सरासरीने १२ बळी घेतले. याशिवाय सन 2020 मध्ये खेळलेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये रवी बिश्नोईने सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

new google

प्रियम गर्ग (20 वर्षे 128 दिवस)

भारतीय अंड19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार प्रियांम गर्ग यांनी आतापर्यंत आयपीएलमधील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा भाग असलेल्या गर्गची या मोसमात आणखी चांगली कामगिरी करण्याकडे लक्ष आहे. आतापर्यंत गर्गने 10 डाव खेळत 1 अर्धशतकाच्या मदतीने आयपीएलमध्ये एकूण 133 धावा केल्या आहेत.

अब्दुल समद (20 वर्षे 161 दिवस) खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात अब्दुल समदने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना त्याच्या कौशल्याची जाणीव करुन दिली. गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटलच्या विरूद्ध दुसर्‍या पात्रता सामन्यात सामदने शानदार डाव खेळला. समदचा आयपीएलमध्ये स्ट्राईक रेट 170 आहे आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा विश्वास आहे की तो या मोसमात संघासाठी आणखी चांगली कामगिरी करताना दिसेल.

 मुजीब उस रहमान (20 वर्षे 10 दिवस)खेळाडू

अफगाणिस्तानातून आलेल्या युवा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानने अगदी लहान वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली गोलंदाजीची लोहा सिद्ध केली आहे, हे कोणालाही सोपे काम नाही. गेल्या मोसमात पंजाब किंग्जकडून खेळलेला मुजीब 14 व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा भाग असेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत 18 सामने खेळल्यानंतर केवळ 17 विकेट घेण्यास मुजीब यशस्वी झाला आहे. आयपीएल 2021 मध्ये भाग घेणारा मुजीब उर रहमान हा सर्वात तरुण खेळाडू आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here