पर्यावरणप्रेमी कदम दाम्पत्यांनी उभारली परसबाग: हिरवाईने नटले शासकीय निवासस्थान


सोलापूर : पर्यावरणाची आवड जोपासणार्‍या एका दाम्पत्याने आपल्या शासकीय निवासस्थानीमधील मोकळ्या जागेत सेंद्रिय पद्धतीनं परसबाग फुलवली आहे. आज या परसबागेत एकूण ५४ प्रकारची फळ-फुलं झाडे फुलली आहेत. सचिन कदम आणि स्नेहल चौधरी कदम असे या दाम्पत्याचे नाव आहे.

स्नेहल चौधरी कदम या मूळच्या वाशिम जिल्ह्यातल्या असून त्या क्षितीज संस्थेच्या संस्थापिका आहेत तर त्यांचे पती सचिन कदम हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातले असून सध्या ते अकोला शहरात पोलीस उपाधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सचिन कदम यांची बदली २०१९ साली अकोला या शहरात झाल्यानंतर त्यांना शासकीय निवासस्थान मिळाले. शासकीय निवासस्थान परिसरात ६-७ गुंठे जागा पडीक होती. या जागेचा सदुपयोग पर्यावरणासाठी करावा असा विचार त्यांच्या मनात आला आणि भाजीपाला, फळे, फुले, औषधी वनस्पती सेंद्रीय पद्धतीने वाढवायचे ठरवले. परसबागेची प्रेरणा त्यांची आई पुष्पा चौधरी यांच्याकडून मिळाली.

परसबाग

स्नेहल कदम सांगतात, या जागेवर आधीच्या अधिकाऱ्यांनी लावलेली पण बरीच झाडे होती. त्यांची जपणूक करण्यापासून सुरुवात केली. आधी सर्व परिसर स्वच्छ करून घेतला. तसेच झाडांना आळे करून कुंपण केले. वेळेत पाणीही दिले. नंतर आम्ही सेंद्रिय शेतीला लागणारी बेसिक तयारी केली. जसे की खोदकाम करणे, माती मोकळी करणे, दगड वेचणे, शेणखताचा थर टाकणे इत्यादी. दोघेही आवर्जून भाजीपाला तसेच एक-एक झाड चेक करतो. तसेच अधून-मधून तज्ज्ञांचा सल्ला घेतो. परस बागेसाठी लागणारे बियाणे विकत न आणता घरी जे काही उपलब्ध होते तेच वापरले.

त्या पुढे म्हणाल्या, घरीच तयार झालेल्या काही बिया लावत आहोत. सुशोभीकरण म्हणून गार्डनमध्ये लाकडावर पेंटिंग सुद्धा करण्यात आली. पक्ष्यांसाठी अन्न-पाणी तसेच काही कृत्रिम घरटी ठेवण्यात अाली. घरासमोरचा परिसर प्रचंड हिरवागार झाल्याने दिवसभर विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट असतो. कधीकधी पहाटेच्या वेळेस मोराचेदेखील दर्शन घडते. आम्ही आमच्या कामात भरपूर व्यस्त असतो. पण छंद जोपासण्यासाठी आवर्जुन वेळ देतो. झाडे लावताना तसेच वाढताना पाहण्याचा आनंद आणि समाधान खूप वेगळे असते.

new google

फुल कोबी, ब्रोकोली, टोमॅटो, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, चवळी ची भाजी, पुदिना, अद्रक, कांदा, लसून, लिंबू, आवळा, काकडी, बीट, करवंद, भेंडी, गवार, वांगी, भरीत वांगी, मटकी, मुळा, कडीपत्ता, सिताफळ, मोसंबी, चिकू, बदाम यासह ५४ झाडे आहेत. तसेच गवती चहा, तुळस, बेल, गुलाब, चाफा, मोगरा, सायली, जास्वंद, स्वस्तिक इत्यादी हे सगळे घरीच ताजे आणि रसायनमुक्त परसबागेत मध्येच मिळतो. विशेष म्हणजे बाजारातून आणण्याचे कष्ट आणि खर्च दोन्हीही वाचतात. तसेच आरोग्यही निरोगी राहते. परसबाग

परसबागेतील भाजी मूकबधिर शाळेत दिली जाते

सेंद्रिय पध्दतीने फुलवलेल्या परसबागेतील भाजीपाला आणि फळे घरीच वापरली जातात आणि उरलेला भाजीपाला आणि फळे ही शहरातील मूकबधिर विद्यालयास दिली जाते. या सामाजिक कार्यातून एक वेगळा आनंद मिळत असल्याची प्रतिक्रिया स्नेहल चौधरी यांनी दिली.

तुळशीची रोपे दिली जातात भेट 

याच परसबागेत तुळशीची रोपे तयार करण्यात आली आहेत. घरी येणाऱ्या पाहुण्यांना आणि नातेवाईकांना यातील तुळशीचे रोप भेट म्हणून दिली जातात. कारण तुळशीच्या रोपापासून प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. तसेच बाग पाहायला येणार्‍या लोकांना परसबागेचे महत्त्वही पटवून दिले जाते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here