आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

राम मंदिर जमीन खरेदीत खरच घोटाळा झालाय का? आपचे खासदार संजय सिंह यांचा दावा किती खरा?


 

राम मंदिर नेहमीच देशाच्या राजकारणात चर्चचा विषय बनलेल आहे. वादग्रस्त निर्णय,अनेकवेळा संघर्ष ऐतिहासिक निर्णय होऊन राममंदिर निर्माणाचा शेवटी एकदाचा प्रश्न मिटला होता. याच  प्रश्नाचं भांडवल करून काही राजकीय पुढार्यांनी आपली पोळी भाजून घेतली.

सध्या राममंदिर मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आले आहे.श्री रामजन्मभूमी ट्रस्टच्या जागेच्या खरेदीत घोटाळा झाला  असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. हे ऐकून खर तर विश्वास बसने थोडे कठीण जातंय परंतु त्यांनी हा आरोप समस्त प्रसारमाध्यमांसमोर मांडला आहे. Ayodhya Ram Janmabhoomi Mandir Update | Architect Nikhil Sompura Over Ram Temple In Ayodhya | कुल 67 एकड़ भूमि में से 2 एकड़ में बनेगा रामलला मंदिर, एक हजार साल तक अपनी

new google

चला तर जाणून घेऊया नक्की संपूर्ण प्रकरण काय आहे आणि काय आरोप करण्यात आले आम आदमी पक्षाकडून..

आपचे खासदार संजय सिंह यांनी हा दावा केला आहे कि, आयोध्येत गट नंबर २४३, २४४,२४६ ज्याची  किंमत ५ करोड ८० लाख रुपये आहे.ती जमीन अगोदर 2 करोड रुपयांमध्ये खरेदी केली गेली होती. त्यांनतर सुल्तान अंसारीने या जमिनीच्या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा केला.

राममंदिर

शिवाय त्यांनी यामध्ये श्री राम भूमी ट्रस्टचे महामंत्री चंपत राय यांच्यावरही आरोप केले आहेत. खासदार संजय सिह एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या सर्व प्रकरणात आयोध्याचे महापौर यांचही नाव समोर आणले आहे. त्यांनी दावा केला आहे कि,२०१८ मध्ये 2 करोड रुपयाला विकत घेतलेली हीच जमिन राममंदिर ट्रस्टने  साडे १८ कोटी रुपयास  विकत घेतली आहे..

त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी आपचे खासदार संजय सिंह यांनी  केली आहे. त्यांच्या मते जमिनीच्या खरेदीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. १८ मार्च रोजी 2 कोटी रुपयास खरेदी केलेली जमीन काही वेळानंतर १८ कोटी रुपयांना कशी काय खरेदी करू शकतात. असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राम मंदिर

या संपूर्ण प्रकरणात चंपत राय यांनीआपली बाजू जाहीर केली आहे. ते म्हणतात, “ट्रस्टने बांधकाम सुरू असलेल्या राम मंदिराच्या आजूबाजूला छोटी मंदिरे आणि घरदारांची जमीनही विकत घेतली आहे. ट्रस्टने आतापर्यंत खरेदी केलेली सर्व जमीन खुल्या बाजारभावापेक्षा कमी घेतली आहे. मंदिराची भिंत बांधण्यासाठी आणि पूर्व-पश्चिम दिशेला वाहतुकीची सोय वाढविण्यासाठी या जागेचा उपयोग होणार आहे, त्यामुळे अधिक जमीन घेतली गेली आहे.

ही सर्व जमीन 18 मार्च 2021 रोजी विकले गेले होते आणि ट्रस्टसह करार झाला होता. आणि त्यांनी सांगितले आहे की ज्याच्याकडून ही जमीन घेतली गेली आहे, त्यांच्या पुनर्वसनाचीही व्यवस्था केली जात आहे. त्यांना लवकरच एक नवीन स्थान देण्यात येईल.

आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. आम्ही कोणत्याही न्यायालयीन चौकशीसाठी तयार आहोत.

आता या आरोपामध्ये किती तथ्य आहे हे लवकरच समजेल परंतु यानिमिताने पुन्हा एकदा राममंदिर चर्चेचा विषय बनले आहे..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here