आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब
===
वादविवादात युक्तिवाद लढवून जिंकण्यात माहीर असतात या चार राशीचे लोक!
जगात असे काही लोक आहेत ज्यांना वाद घालायला अावडत नाही. जोपर्यंत शक्य असेल तोपर्यंत हे लोक वादविवादाचे विषय टाळतात, तर असे काही लोक आहेत जे वादाची कोणतीही संधी त्यांच्या हातातून जाऊ देत नाहीत. ज्या वादविवादामध्ये ते पडतात ते योग्य निर्णय झाल्यानंतरच शांत बसतात. अशी कोणती रास आहे जी प्रत्येक लढाई किंवा वादविवादात जिंकूनच शांत बसतात ते जाणून घेऊया.

मेष: या राशीच्या लोकांना नेहमीच प्रत्येक गोष्टीत पुढे रहायला आवडते. या लोकांचा असा विश्वास आहे की ते सर्वोत्कृष्ट आहेत. त्यांचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी हे लोक तार्किक (लॉजिकल) चर्चा करतात.
मिथुन: मिथुन राशीचे लोकांमध्ये फार लवकर मिसळतात आणि नवीन गोष्टी शिकण्यात नेहमी विश्वास ठेवतात. म्हणूनच हे लोक प्रत्येक गोष्टीत पुढे आहेत. या लोकांचा असा विश्वास आहे की, त्यांना बर्याच गोष्टींबद्दल ज्ञान आहे. तार्किक युक्तिवाद असो वा त्यांच्या युक्तिवादाने इतरांना प्रभावित करण्यासाठी ते त्यांच्या दृष्टिकोनाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी सर्व काही करतात.
वृश्चिक: या राशीच्या लोकांना आपल्या शत्रूंविरुद्ध कसे लढायचे व कसे जिंकता येईल हे देखील माहित आहे. ते प्रत्येक गोष्टीस योग्य प्रत्युत्तर देतात. समोरच्यावर आपले मत लागूनच शांत बसतात.
कुंभ: या राशीचे लोक समोरच्या व्यक्तीचे म्हणणे अत्यंत काळजीपूर्वक ऐकतात. तसेच यावेळी ते चर्चेचा मुद्दाही मांडतात. हे लोक सहसा प्रथम त्यांची बाजू मांडतात, जर त्यांचे म्हणणे ऐकले नाही तर मग हे लोक युक्तिवाद करतात.
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील एखाद्या तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.
हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!