आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

सचिन-लाराच्या संघाला तंग करणारा हा कर्णधार रस्त्यावर उपाशी पोटी फिरतोय; ड्रग्जचेही लागले व्यसन!


 

एक खेळाडू होता जो के ब्रायन लाराच्या बलाढय़ वेस्ट इंडीज संघाचा पराभव करण्यास कारणीभूत ठरला होता. सचिनसारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध पंगा घेतला होता. तो त्यांच्या देशाचा सुपरस्टार होता, जे की क्रिकेटच्या प्रत्येक चाहत्याला माहित होते.

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर या क्रिकेटपटू आयुष्य अत्यंत हलाखीचे जात आहे. यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. तो भुकेल्या पोटी रस्त्यावर फिरला. एवढेच नव्हे तर त्याला ड्रग्ज घेण्याचेही व्यसन लागले. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून केनियाचा माजी कर्णधार मॉरिस ओडुम्बे आहे.Maurice Odumbe profile and biography, stats, records, averages, photos and videos

new google

मॉरिस ओडुम्बे हा केनियामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे.  ओडुम्बे हा एक मोठा मॅचविनर खेळाडू मानला जात होता आणि मधल्या फळीत चांगली फलंदाजी करण्यासह त्याचा ऑफस्पिन अनेकदा विरोधकांना त्रास देत असे. 1996 च्या मॉरिस ओडुम्बेच्या नेतृत्वात असलेल्या विश्वचषकात केनियाने वेस्ट इंडिजला पराभूत करून मोठा उलटफेर केला होता. केनियाने वेस्ट इंडिजला 73 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि ओडुम्बे त्या सामन्याचा नायक ठरला. ओडुम्बेने अवघ्या 14 धावांत 3 गडी बाद केले आणि एकाला धावचीत हे केले होते.

विश्वचषक उपांत्य फेरीत केनियाला स्थान

2003 च्या विश्वचषकात केनियाने इतिहास रचला. दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात केनियाचा कमकुवत संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला. केनियाच्या या यशात ओडुम्बेचा मोठा हात होता. ओडुम्बेने या स्पर्धेत 42 च्या सरासरीने धावा केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. यानंतर ओडुम्बेने लीवार्ड आयलंड विरुद्ध कॅरेबियन कॅरिब बीयर मालिकेत 207 धावांची डाव खेळला. तथापि, 2004 येताच ओडुम्बेची कारकीर्द संपुष्टात आली.

ओडुम्बेवर 5 वर्षांसाठी बंदी

केनियाचा हा दिग्गज खेळाडू 2004 मध्ये आयसीसीच्या चौकशीखाली आला होता. ओडुम्बे याच्यावर बुकीशी संबंध असल्याचा दोषी आढळला होता आणि त्याला पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती. जागतिक क्रिकेटमध्ये चमकणारा तारा अचानक कुठेतरी हरवला. बंदीनंतर मॉरिस ओडुम्बे उद्ध्वस्त झाले होते. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, आपल्याकडे खायलाही पैसे नाहीत आणि तो भुकेल्या रस्त्यावर फिरला. एवढेच नव्हे तर त्याला ड्रग्ज घेण्याचेही व्यसन लागले.  या परिस्थितीसाठी ओडुम्बे आपल्या पत्नीला दोष देतात.  ओडुम्बे यांचा आरोप आहे की त्याची पत्नी आयसीसीवर खोटी विधाने करीत होती, त्यामुळे त्याची कारकीर्द बरबाद झाली.

कर्णधार

केनियाच्या वृत्तपत्र द स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत ओडुम्बे म्हणाले, ‘माझ्या पत्नीचा तपासकर्त्यांशी संपर्क झाला. त्याने माझ्या बायकोला काय वचन दिले ते मला माहित नाही. तिने तपास अधिकार्‍यांना जे काही सांगितले ते त्यांनी स्वीकारले. मला असं वाटायचं की तिला मला धडा शिकवायचा आहे.

तो पुढे म्हणाले, ‘गोष्टी फार वाईट झाल्या होत्या. ते वेदनादायक होते. एकवेळी मी ड्रग्स घेऊ लागलो. मलाही पुनर्वसन आवश्यक आहे. तथापि, ओडुम्बे यांनी हार मानली नाही. पाच वर्षाची बंदी संपल्यानंतर तो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये सामील झाला आणि वयाच्या 40 व्या वर्षी तो केनियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये परतला. एप्रिल 2018 मध्ये तो केनिया संघाचा प्रशिक्षक बनला.  तथापि, त्यांचा कार्यकाळ 6 महिनेही टिकू शकला नाही आणि डेव्हिड ओबुयाला त्याच्या जागी प्रशिक्षक बनविण्यात आले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ह्या आहेत जगातील सर्वात विषारी वनस्पती..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here