अशी मिळाली होती महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघात जागा, क्रिकेट संघाच्या माजी निवडकने केला खुलासा..!


भारतीय क्रिकेटच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वात त्याने आयसीसीच्या सर्व ट्रॉफीमध्ये भारताचे नेतृत्व केले. धोनीने सन 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याचे चाहते अजूनही त्याच्या नेतृत्वाचे चाहते आहेत. आजच्या या लेखात आपण धोनीची पहिल्यांदा भारतीय संघात निवड कशी झाली होती याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

महेंद्रसिंग धोनी

 धोनीची निवड खूप कठीण झाली: महेंद्रसिंग  धोनीला भारतीय संघात सामील होणे खूप कठीण होते. आपली ओळख निर्माण करण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवडक किरण मोरे यांनी माहीची निवड कशी झाली याचा खुलासा केला.

किरण मोरे यांनी सांगितले की, महेंद्रसिंग  धोनीसाठी सौरव गांगुलीला पटविण्यात त्याला 10 दिवस लागले. ‘त्यावेळी आम्ही विकेटकीपर शोधत होतो जो आक्रमक फलंदाजी करू शकेल आणि राहुल द्रविडची जागा घेईल आणि तो शोध धोनी पर्यंत येऊन  थांबला.

किरण मोरे  पुढे म्हणाले  ‘त्यावेळी आम्ही एक पॉवर हिटर शोधत होतो जो 6 किंवा 7 व्या क्रमांकावर येऊ शकेल आणि 40-50 धावा वेगाने करेल. राहुल द्रविड यष्टीरक्षक म्हणून काम करत होता आणि विकेटकीपर म्हणून त्याने 75 सामने खेळले होते. म्हणूनच आम्ही यष्टीरक्षकांचा वेगवान शोध घेत होतो.

2004 मध्ये, दिलीप  ट्रॉफीचा अंतिम सामना पूर्व विभाग आणि उत्तर विभाग यांच्यात खेळला जाणार होता. पूर्व विभागाकडून दीपदास गुप्ता विकेटकीपर होता. याच सामन्यादरम्यान सौरव गांगुलीला धोनीच्या निवड करण्यारून बराच वेळ समजावण्यात आले होते.

महेंद्रसिंग धोनी

किरण मोरे पुढे म्हणाले ‘माझ्या सहका्याने धोनीची फलंदाजी पाहिली होती. त्यानंतर मी त्याला पाहिले, धोनीने त्या सामन्यात 170 चेंडूत130 धावा जोडल्या होत्या धोनीला अंतिम सामन्यात फक्त यष्टीरक्षक म्हणून खेळावे अशी आमची इच्छा होती. यानंतर गांगुली आणि दीपदास गुप्ता यांच्याशी माझे बरेच वाद झाले. त्यानंतर दीपदास गुप्ताला अंतिम सामन्यात बळी मिळू नयेत आणि धोनीच्या ताब्यात देण्यास सौरव आणि त्याच्या निवडकर्त्यांना पटवून देण्यासाठी मला दहा दिवस लागले होते.

त्या दिवसाची निवड सार्थकी लावत धोनीने भारताला अनेक महत्वाचे सामने जिंकून दिले. आणि आपल्या क्रिकेट कारकिर्दीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले..

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here