आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

२१ वर्षीय मयूरला फेसबुककडून २२ लाखांचं बक्षीस,इंस्टाग्राममधील शोधली होती चूक!


२१ वर्षीय मयूर फडतरे नावाच्या भारतीय डेवेलपरने इंस्टाग्राममधील एक गंभीर त्रुटी उघडकीस आणली आहे. त्यामुळे फेसबुकने या भारतीय डेवेलपरला २२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या दोषांमुळे, कोणालाही इन्स्टाग्रामवर एखाद्याचे खाजगी खाते पाहू शकत होता. २२ लाखांचे बक्षीस जिंकणारा मयूर हा कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचा रहिवासी आहे.मयूर

दोन्ही खाती एकमेकांना फॉलो करत असतानाच खासगी खाती इन्स्टाग्रामवर पाहिली जाऊ शकतात. परंतु इंस्टाग्राममधील बगमुळे कोणतेही खाजगी खाते पाहिले जाऊ शकते. मयूरने याबद्दल फेसबुकला माहिती दिली आणि फेसबुकने इन्स्टाग्राममधील ही त्रुटी असल्याचे कबूल केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, आता ही त्रुटी इंस्टाग्रामवरुन सुधारली गेली आहे.

मयूरने सांगितले की, ही त्याची पहिली बाऊट आहे. यापूर्वी त्यांनी सरकारच्या साइट्समधील त्रुटी निदर्शनास आणल्या होत्या, परंतु सरकार त्यास बक्षीस देत नाही.

new google

या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल फेसबुकने ईमेलद्वारे मयूर यांना त्या पुरस्काराबद्दल माहिती देण्यात आली आहे. मयुरला पाठवलेल्या ईमेलमध्ये फेसबुकने लिहिले आहे की, ‘या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आम्ही ठरवलं आहे की, तुम्हाला  30,000  डॉलरचे बक्षीस देण्यात येईल’

मयूर

फेसबूकने म्हटले आहे की, मयूरने हा विषय हायलाइट करुन फेसबुकला कळविले आहे. याचा फायदा चुकीच्या वापरकर्त्यांनी इन्स्टाग्रामवर घेतला असता. तथापि, यासाठी चुकीच्या लोकांना विशेष मीडिया आयडीची आवश्यकता भासली असती. कंपनीने ही चूक आता दुरूस्ती केली आहे.

मयूरने 16 एप्रिल रोजी इन्स्टाग्रामच्या या चुकीबद्दल फेसबुकला माहिती दिली होती. यानंतर कंपनीने ते 15 जूनपर्यंत पॅच केले.  सर्वसाधारणपणे, बाउंटी हंटर्सला समस्येचे निराकरण होईपर्यंत ते गुप्त ठेवण्यास सांगितले जाते, जेणेकरून कोणीही त्याचा गैरफायदा घेऊ नये.

या बगमुळे, वापरकर्ते कोणतीही खाजगी खाते फॉलो करीत नसले तरीही तरीही ते इतर खाते पाहू शकत होते. त्या खात्यांच्या आवडी, कमेंट्स आणि सेव्ह काउंट्स पाहिले जाऊ शकत होते. मयूरच्या म्हणण्यानुसार त्यांनी 23 एप्रिल रोजी दुसर्‍या एंडप्वाइंटचा खुलासा देखील केला.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here