या मुलाने ५ हजार इको फ्रेंडली पेन्सिलचा संग्रह केलाय, संग्रहात 56 इंचाच्या पेन्सिलचाही समावेश…!


सोलापूर : शाळेतल्या पाठ्यपुस्तका ऐवजी हल्लीची मुलं ही सोशल मीडियाच्या आभासी विश्वात जास्त रमतात. त्यामुळे  विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, ही पालकांची नेहमीची ओरड असते. सोशल मीडियाच्या मायाजालात मुलांनी अडकून पडू नये, यासाठी कुठल्या तरी छंदात मुलाने गुंतून राहावे यासाठी वडीलांनी प्रयत्न केला. त्यातून त्या मुलाचा संग्रह वाढत गेला आणि आज त्याच्याकडे पाहता-पाहता चक्क पाच हजारहून अधिक पेन्सिलचा संग्रह झाला आहे. ही कहाणी आहे अकोल्याच्या यश उत्कर्ष जैन या चिमुकल्याची. पेन्सिल

यश जैन हा वयाच्या पाचव्या वर्षापासून पेन्सिलचा वैविध्यपूर्ण  संग्रह करतोय. इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणार्‍या यशने सर्वात लहान संग्राहक म्हणून देखील ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या संग्रहात पेन्सिलसह खोडरबर आणि काडीपेटीचे बॉक्स देखील संग्रहात आहेत. यश चे वडील उत्कर्ष जैन यांचे जनरल स्टोअर्सचे दुकान आहे. दुकानात विविध प्रकारच्या पेन्सिल विक्रीस ठेवण्यात आलेले असतात. यातील काही पेन्सिल यश आपल्या संग्रहात जपून ठेवतोय. विविध आकाराच्या आणि रंगातल्या पाच हजार पेन्सिल त्याच्या संग्रहात पाहायला मिळतात.

केवळ देशातल्या नव्हे तर परदेशातल्या ही शिस पेन्सिल त्याने संग्रही ठेवल्या आहेत. चीन, जर्मनी, जपान, फ्रान्स, युनायटेड किंग्डम, रशिया या देशातल्या विविध नामवंत कंपन्यांच्या पेन्सिल त्याने संग्रही ठेवले आहेत. संग्रहातील पेन्सिल या पाच रुपयांपासून पाचशे रुपये किमतीच्या आहेत. यशचा हा छंद पाहून त्याचे नातेवाईक देखील त्याला गिफ्ट म्हणून पेन्सिलच आणून देतात. भेट म्हणून मिळालेल्या पेन्सिल वापरण्याऐवजी तो संग्रह जमा करतो. या संग्रहाचे तो प्रदर्शनही भरवत असतो. यशचे पेन्सिल वरचे प्रेम आणि डोळे दिपावून टाकणारा हा छंद पाहताक्षणी कौतुक केल्याशिवाय कुणीच राहणार नाही.

पेन्सिल

या पेन्सिल्सचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पेन्सिल वर कार्टून, फळे, फुले फळे, मराठी-इंग्रजी वर्णमाला, गडकिल्ले, स्वातंत्र्यसैनिकाच्या प्रतिमा असलेल्या पेन्सिल त्यांच्या संग्रहात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या किल्ल्याची नावे या पेन्सिल वर आहेत. तसेच संत महात्म्यांचे विचार, जलसाक्षरता, स्वच्छता आरोग्य जनजागृती अभियान, प्रबोधनात्मक विचाराच्या पेन्सिल त्यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. आयुष्य अधिक समृद्धपणे जगण्याची दालने छंद खुली करून देत असतात. छंद म्हणजे खरे तर जीवन शिक्षण असल्याची प्रतिक्रिया यशचे वडील उत्कर्ष जैन यांनी दिली.

new google

५६ इंचची पेन्सिल संग्रहात 

यशने केलेल्या पेन्सिलच्या या भल्यामोठ्या संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संग्रहात ५६ इंचाची पेन्सिल आहे. या पेन्सिलवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त गांधीजींचे विचार पेन्सिलवरील कोरण्यात आल्या आहेत. अशा पेन्सिली त्यांच्या संग्रहात त्याने जपून ठेवल्या आहेत.

अनोख्या पर्यावरण पूरक सीड पेन्सिल

पेन्सिल संपत आली की, मुले त्याचा शेवटचा तुकडा फेकून देतात. हा उर्वरित भागही वापरता यावा यासाठी  पेन्सिलच्या शेवटच्या टोकावर बायोडिग्रेडेबल टोपण बसविले. यात विविध फळभाज्यांच्या बिया ठेवल्या जातात. पेन्सिलचा शेवटचा भाग हा मातीत रुजवला की त्यापासून फळभाज्यांची रोपे उगवतात. अशा एकूण दहा प्रकारच्या सीड पेन्सिल यशच्या संग्रहात आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here