आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी केन विल्यमसनच मोठ वक्तव्य..!


न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांनी गुरुवारी सांगितले की, भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गाठणे हे संघाच्या मागील दोन वर्षातील प्रगतीचा दाखला आहे. परंतु आपल्या संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे, पण याला मी फारसे महत्त्व देत नाही. विल्यमसनच्या नेतृत्वात न्यूझीलंडने आतापर्यंतची सर्वात मजबूत टीम तयार केली आहे. कर्णधार म्हणाला की, डब्ल्यूटीसी फायनल ही गेल्या 24 महिन्यांपासून घेतलेल्या मेहनतीला यशात रुपांतर करण्याची संधी आहे.

केन विल्यमसन

विल्यमसनने अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी सांगितले की, “दररोज अनेक आव्हानांना सामोरे जात या संघाने या काळात बरीच प्रगती केली आहे, पण संघ आता या टप्प्यावर पोहोचला असून आता त्यातही (विजयी) पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. इतक्या दिवसांत खूप कठोर परिश्रम केले. त्यानंतर येथे डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलो. हे आपल्या सर्वांसाठी रोमांचक आहे. आम्ही प्रगती सुरू ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहोत. आम्हाला सर्वोत्तम संधी देण्यासाठी सामन्यामधील आपल्या भूमिकेबद्दलची आपली वचनबद्धता कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत, यावरच खेळाडूंनी यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही प्रत्येक वेळी कसोटी क्रिकेटमध्ये सुधारण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

new google

केन विल्यमसन

न्यूझीलंडचा संघ मोठ्या स्पर्धेत एका छुप्या रुस्तम सारखा दिसतो. परंतु शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण विल्यमसन मात्र याला त्या पध्दतीने पाहत नाही. तो म्हणाला, ”सर्व प्रथम आम्ही सामन्यात खेळण्याची अपेक्षा करीत आहोत, यासाठी बराच काळ लोटला आहे. जोपर्यंत मजबूत स्पर्धकांच्या टॅगचा प्रश्न आहे, आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहोत त्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रित करत आहोत आणि हेही आपल्याला माहित आहे की, भारत जगातील एक बलाढ्य संघ आहे. त्यांना सर्वोत्कृष्ट संघ म्हणतात. आम्हाला माहित आहे की या भारतीय संघाविरुद्धचे आव्हान खूप कठीण आहे.”

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here