आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

WTC Final: सौरव गांगुलीने नाणेफेकीवर टीम इंडियाला दिला हा सल्ला; सांगितले पहिल्यांदा काय करावे!


बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा सल्ला दिला आहे. कारण परदेश दौऱ्यावर प्रथम फलंदाजी करणे हे नेहमी सर्वश्रेष्ठ राहिले आहे. भारताच्या या माजी कर्णधाराला भारताची टीम विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जिंकू शकेल असा विश्वास आहे. मात्र न्यूझीलंड ही तितकाच प्रबळ दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोहम्मद सिराज

गांगुलीने सांगितले की, ‘जर तुम्ही रेकॉर्ड्स आणि परदेशातील भारताच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीवर नजर टाकली ( 2020-2021 मधील ऑस्ट्रेलिया दौरा वगळता) तर तुम्हाला कळेल की प्रथम फलंदाजी केल्यावरच आम्ही नेहमीच सामने जिंकले आहेत.  प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीपासूनच दडपणाचा सामना करायचा की चौथ्या डावाची वाट पाहायची असो, ही तुमची निवड आहे.  2002 मध्ये लीड्सकडे पाहा किंवा 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका, आम्ही गोलंदाजीना अनुकूल असलेल्या परिस्थितीत प्रथम फलंदाजी केली, सुरुवातीच्या दबावाचा सामना केला, धावा केल्या आणि सामना जिंकला.’

new google

गांगुली पुढे म्हणाले, “मार्क टेलर किंवा स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन संघांनीही वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीत पहिलेच क्षेत्ररक्षण केले असेल. कधीकधी विकेटमध्ये ओलावा असतो तेव्हाही. या सामन्यात रोहित आणि गिलला मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल.”

सौरव गांगुली

गांगुली म्हणाले की न्यूझीलंड आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत नवीन बॉलने वेगवान गोलंदाजीचा हल्ला रोखणे ही रोहित शर्मा आणि शुभमन गिलची मोठी जबाबदारी आहे. ते म्हणाले, ‘रोहित आणि शुमने चांगली सुरुवात देण्याची गरज आहे. त्याला किमान 20  षटके फलंदाजी करावी लागतील ज्यामुळे चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवर काम करण्यास मदत होईल.”

विल्यमसन आणि टिम साऊदीशिवाय इंग्लंडविरुद्ध कसोटी जिंकल्याबद्दल गांगुलीने न्यूझीलंडचे कौतुक केले.  ते म्हणाले, ‘गेल्या 30 ते 35 वर्षातील न्यूझीलंडमधील हा सर्वोत्कृष्ट संघ आहे. त्यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडचा पराभव केला.  त्यांचे मनोबल उंचावले आहे. भारताचा रस्ता सोपा होणार नाही कारण ते चांगले क्रिकेट खेळत आहेत. हा केवळ विजय नव्हे तर संघ म्हणून ते किती बळकट दिसतात तेच.  विल्यम्सन, सौदी आणि जेम्ससनशिवाय ते जिंकले.  विल यंग हा नवीन खेळाडू मलाही आवडला. त्याने बर्मिंघममध्ये स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनविरूद्ध चांगला खेळ केला. भारताला लयीत येण्यास वेळ लागेल, कारण त्यांनी बरेच सामने खेळले नाहीत परंतु हा एक चांगला सामना असेल.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here