आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

WTC Final: भारतीय संघाने प्लेइंग इलेव्हन केला घोषित; मोहम्मद सिराज आऊट: असा आहे संघ


भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 जून म्हणजे अाजपासून साऊथॅम्प्टनच्या एजिस बाऊल स्टेडियमवर खेळला जाईल.  शुक्रवारपासून खेळल्या जाणार्‍या भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे. रवींद्र जडेजाला भारतीय संघात  स्थान मिळालं आहे. दुसरीकडे, मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही.

रविंद्र जडेजा

रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना डब्ल्यूटीसी फायनलसाठी सलामीवीर म्हणून स्थान मिळाले आहे. या सामन्यात भारत दोन फिरकी गोलंदाजांसह उतरणार आहे. अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. ऋषभ पंतला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.  ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची कामगिरी अभूतपूर्व आहे.  हनुमा विहारीलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नाही. नुकताच इंग्लंडमध्येही त्याने काउन्टी क्रिकेट खेळला. पण त्याची कामगिरी काही खास नव्हती.

new google

जसप्रीत बुमराह मोहम्मद शमीसह वेगवान गोलंदाज म्हणून इशांत शर्माचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला प्ले इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. इशांतला अनुभवाचा फायदा मिळाला आणि त्याला संघात स्थान मिळाले. भारतीय संघात सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा तो सर्वात वेगवान गोलंदाज आहे.  त्याने भारताकडून 101 कसोटी सामने खेळले आहेत.

मोहम्मद सिराज

डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारताची प्लेइंग इलेव्हनः

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रिषभ पंत, आर.अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here