आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

सावधान किवी फलंदाजानो: WTC च्या अंतिम सामन्यात अश्विन-जडेजाची जोडी ठरु शकते घातक


न्यूझीलंडविरुद्ध आजपासून सुरू होणार्‍या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारताने अनुभवी खेळाडूंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनमध्ये अनुभवी इशांत शर्माला मोहम्मद सिराजपेक्षा आधी प्राधान्य देण्यात आले आहे.  एजिएस बाऊलवरील सामन्यात अपेक्षेप्रमाणे रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या दोन फिरकीपटू निवडण्यात आले असून हे दोघेही फलंदाजी करण्यास सक्षम आहेत. इशांत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या रूपात संघात तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल.

अश्विन

अश्विन-जडेजाची जोडी खूप धोकादायक आहे. रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 400 हून अधिक बळी आणि जडेजाने 220 बळी घेतले आहेत. या दोन फिरकीपटूंनी एकत्रितपणे 35 कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण 362 बळी घेतले आहेत. माजी भारतीय फिरकीपटू अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगच्या जोडीनंतरची ही सर्वात यशस्वी जोडी आहे. हरभजन-कुंबळेने 54 कसोटी सामन्यांमध्ये 501 बळी घेतले. यापूर्वी अश्विन-जडेजा ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न आणि सिडनी कसोटीत एकत्र खेळले होते. या जोडीने मेलबर्न येथे 8 तर सिडनी कसोटीत 6 विकेट्स घेतल्या. सिडनी कसोटीच्या दुसर्‍या डावात दुखापतीमुळे जडेजा गोलंदाजी करू शकला नाही. मेलबर्नने भारतात कसोटी जिंकली तर सिडनी कसोटी अनिर्णित राहिला.

new google

अश्विन-जडेजाची इंग्लंडमध्ये कामगिरी

अश्विन

इंग्लंडमध्ये जडेजाने पाच कसोटी सामन्यांत 16 गडी बाद केले आहेत तर अश्विनने 6 कसोटीत केवळ 14 विकेट घेतल्या आहेत. न्यूझीलंडबद्दल सांगायचे तर अश्विनने या संघाविरुद्ध 6 कसोटी सामन्यांत 48 बळी मिळवले आहेत तर जडेजालाही तितक्याच 6 कसोटी सामन्यात फक्त 19 विकेट घेता आले आहेत. न्यूझीलंडच्या पहिल्या 5 फलंदाजांमध्ये तीन डावखुरे फलंदाज आहेत आणि अशा परिस्थितीत अश्विन त्यांना भारी पडू शकतो. अश्विन डावखुरा फलंदाजांविरुद्ध अधिक यशस्वी गोलंदाज आहे.

भारतीय संघ:

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here