आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

WTC Final: अंतिम सामन्यावर पावसाच सावट, क्रिकेट चाहत्यांचा होऊ शकतो हिरमोड!


जेव्हा अन्न खाताना तोंडात दगड अचानक येतो तेव्हा संपूर्ण चव बेकार बनते. जगातील क्रिकेट चाहत्यांनाही याक्षणी असेच वाटत असावे. कारण एकीकडे कसोटी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या सामन्याच्या सुरूवातीला काही तास शिल्लक आहेत, एकीकडे पावसाचा जोर वाढत असतांना दुसरीकडे भारत आणि न्यूझीलंड  यांचा उत्साहही वाढत आहे. खेळाडूंसह चाहत्यांची चिंता वाढली आहे कारण 18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 17 जून रोजी साऊथॅम्प्टनमध्ये मुसळधार पाऊस पडला. चला, या सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवार 18 जूनला या पावसाचा किती परिणाम होईल याबद्दल जाणून घेऊया..

क्रिकेट

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना 18 जूनपासून सुरू होईल आणि 22 जूनपर्यंत चालेल. परंतु अडचण अशी आहे की या पाच दिवसांपैकी चार दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. एक-दोन दिवस वादळी वारे देखील वर्तवले गेल्यामुळे याविषयीही चिंता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सामन्याच्या चौथ्या दिवशी 21 जून वगळता इतर सर्व दिवशी पाऊस पडेल. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतही पावसाचा परिणाम झाला होता हे आपण पहिलेच आहे त्यामुळे सामना बरोबरीत सुटला होता.

 

पहिल्या दिवशी 90 षटके खेळणे कठीण

क्रिकेट

आता जर साऊथॅम्प्टनच्या रोझ बाउल स्टेडियमवर पावसाची शक्यता वर्तवल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे हे मात्र खर आहे.पण इंग्लंडमधील पावसाची स्वतःची शैली असते आणि जर साऊथॅम्प्टनमध्ये पाऊस भूतकाळात पाहिला गेला तर पाऊस सुरू होण्यास आणि थांबायला वेळ लागत नाही. अशा परिस्थितीत असा विश्वास आहे की पहिल्या दिवशी अपेक्षित पावसाच्या अनुषंगाने सामन्यावर दोन ते तीन तास परिणाम होऊ शकतो. याचा अर्थ असा आहे की पहिल्या दिवशी 90 ऐवजी चाहत्यांना केवळ 60 ते 70 षटकांचे खेळ पहायला मिळेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्यात किती वेळ खेळला जातो या प्रश्नाचे उत्तर आता सर्वांना मिळणार आहे, पण सर्वात मोठा प्रश्न भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कोणता संघ ही ट्रॉफी मिळवणार हा आहे. ज्याचे उत्तर येणाऱ्या 4/5 दिवसात आपल्याला मिळणारच आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा: या ३ सोप्या उपायांनी चेहऱ्यावरील पिंपल घालवा आणि मिळवा तेजस्वी चेहरा!

तेव्हा राशिद पटेल आपल्या सहकारी खेळाडूला मारण्यासाठी स्टम्प घेऊन मैदानावर धावत सुटला होता!

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना फलंदाजीचा गुरुमंत्र देणारा ‘हा’ खेळाडू झाला मुंबई क्रिकेट संघाचा प्रशिक्षक 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here