आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

२ महिन्यात स्वतः विहीर खोदून या दाम्पत्यांनी पाणीटंचाईवर मत केलीय..!


उस्मानाबाद हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा. पाण्याचे नेहमीच दुर्भिक्ष असतं. सतत पडणाऱ्या कोरड्या दुष्काळामुळे काही वर्षांपूर्वी अनेक लोक विस्थापित झाले. पाणीटंचाई ही इथली कायमचीच समस्या. या समस्येवर मात करण्यासाठी एका दाम्पत्याने चक्क आपल्याच जागेत विहीर खोदून पाणीटंचाईचा प्रश्न सोडवला आहे. ही किमया साधली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय कॉलेज जवळ वास्तव्यास असणाऱ्या पाचंगे दाम्पत्याने.

विहीर

माळरानावर वास्तव्यास असलेल्या पाचंगे दाम्पत्यांना कुटूंबियांना पाणीटंचाई सतत भासत होती. पाण्यासाठी ठिकठिकाणी जाऊन भटकंती करावी लागत होती. सतत सापडणारा कोरडा दुष्काळ आणि पाणीटंचाईचा बाऊ न करता आपल्या मालकीच्या 40 बाय 30 प्लॉटमध्ये पती-पत्नीने मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर चक्क विहीरच खोदली. प्रभाकर आणि सोनाली हे दाम्पत्य आपली दोन मुले आणि एका मुलीसह राहतात. शेतात मोलमुजरी काढून ते आपले कुटुंब चालवतात. आर्थिक टंचाई असतानाही त्यांनी केवळ पाण्यासाठी स्वत: विहीर खोदली.

new google

प्रभाकर आणि सोनाली या दाम्पत्याने कुणाचीही मदत न घेता रात्रंदिवस मेहनत करून पाण्यासाठी दोन महिन्यात विहीर खोदली. यासाठी चारशे रुपयाचे एक घण, छानी, घरातील पार, सायकलच्या चाकाची कप्पी बनवून नायलॉनच्या दोरीच्या साह्याने पती प्रभाकर खोदलेले मुरूम वर पाठवत असत आणि पत्नी ते मुरूम बाजूला टाकून परत टोपले आत सोडत असत. २५ फूट खोल विहीर आज मागील चार वर्षापासून सतत पाणी पुरवत आहे. पावसाळ्यात ही विहीर काठोकाठ भरलेली असते. या विहिरीमुळे आसपासच्या कुटुंबियांना पाणीटंचाई भासत नाही

विहीर

विहीरच्या पाण्यावर माळरानात फुलवली परसबाग

पाचंगे कुटूंबियांनी याच विहिरीच्या पाण्यावर घरासमोरील जागेत छोटीशी परसबाग फुलवली आहे. या परसबागेत भाजीपाल्याची लागवड केली आहे. ना रोजगार हमीचे मजूर, ना कुठली शासकीय मदत, अनुदान. बुद्धिचातुर्य आणि मेहनतच्या जोरावर या सर्वसामान्य कुटुंबाने पाणीटंचाईवर कुठलाही बाऊ न करता मात केली. दुष्काळाच्या नावाखाली धीर सोडून खचलेल्या गरजवंत शेतकऱ्यांना पाचंगे दाम्पत्याचे हे कार्य नवी उमेद देणारे आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here