आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

फोटोग्राफीच्या माध्यमातून श्वानप्रेम जपणारा ‘विशाल’; कुत्र्यांचे जतन व संवर्धनासाठी करतोय प्रसार प्रचार !


कुत्रा हा जगातला सर्वात प्रामाणिक प्राणी आहे. प्राचीन काळी लोक शिकार आणि राखण यासाठी कुत्रा पाळायचे. अाजही आपल्याकडे श्वानप्रेमींची संख्या ही काही कमी नाहीये. लोक स्वतःच्या हौसेपोटी कित्येक महागडे कुत्रे खरेदी करुन पाळतात. अाज कुत्र्यांच्या परदेशी प्रजातींना श्वानप्रेमींची मोठी पसंती आहे. पण तरीही अस्सल भारतीय अशा कारवान हाऊंड या प्रजातीवरील श्वानप्रेमींचे प्रेम अजूनही कायम आहे. या कुत्र्याच्या प्रजातींचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी एक युवा फोटोग्राफर धडपड करत आहे.

विशाल खामकर असं या श्वानप्रेमी तरूणाचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेडा येथे राहणारा विशाल व्यवसायाने फोटोग्राफर आहे. तो गेल्या सहा वर्षांपासून कारवान हाऊंड या कुत्र्याच्या प्रजातीचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी  प्रयत्न करतो आहे. यासाठी तो पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देऊन तिथल्या कारवान हाऊंड जातीच्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याची माहिती फोटोसह सोशल मिडीयावर देत असतो. गावोगाव भेट दिल्यानंतर तेथील कारवान प्रजातीचे वेगळेपण अाणि त्यांचे वंशज यांच्या नोंदी ठेवतो.

new google

कुत्र्यांच्या मालकांना कुत्रा कसा सांभाळावा, काय खाऊ घालावे याविषयी सांगतो. लोक त्याची क‍ाळजी कशाप्रकारे घेतात याची माहिती घेतो. कारवानचे जुने जाणकार असणाऱ्या लोकांना प्रत्यक्षात भेटून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व करतोय. या प्रजाती विषयी पुढील पिढीला माहिती व्हावी व त्याचे जतन व संवर्धन व्हावे, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. या प्रजातींविषयी त्याने काही डाटा गोळा केला आहे. त्याचा वापर काही लोक आपल्या संशोधनासाठी करताहेत. त्याने तयार केलेली माहिती अाणि फोटोज त्यांना उपयुक्त ठरत आहेत.

पूर्वीपासून शेतकरी आपल्या शेत अाणि घराच्या राखणदारीसाठी हा कुत्रा पाळत असत. महाराष्ट्रात बीड, सोलापूर, सांगली, सातारा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा या परिसरात कारवान हाऊंड ही प्रजाती जास्त प्रमाणात आढळते. चित्त्याप्रमाणे वेगात धावणारा अत्यंत चपळ असलेला हा कुत्रा भारतीय प्रजाती म्हणून ओळखला जातो. सामान्य कुत्र्यांपेक्षा कारवान हाऊंड अधिक काटक आणि कणखर शरीरयष्टी असलेले असतात. लांब पाय, लांब शेपटी, उंच शरीर अशी याची शरीरयष्टी आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेली ही प्रजाती साधारणतः गावरान प्रकारात येते. त्यामुळे यांचा खर्च जास्त नसतो.

परदेशातील श्वानप्रेमी येतात महाराष्ट्रात

परदेशातील श्वानप्रेमी कारवान प्रजाती विषयी माहिती जाणून कुर्डुवाडी सापटने शिंगेवाडी खासपुरी, रत्नापुर, तेरखेडा या गावी येतात. गतवर्षी लेना गॅझडर नावाचे जागतिक डॉग हँडलर या महाराष्ट्रातील कारवान पहाण्यासाठी भेट दिली होती. सध्या विविध डॉग शोजमध्ये या कारवान हाऊंड कुत्र्यांनादेखील मागणी आहे. त्यामुळे इतर कुत्र्यांप्रमाणेच कारवान हाऊंड कुत्र्यांचेदेखील महत्त्व वाढले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here