आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

दगडांचा आकार न बदलता कलाकृती घडवतोय हा कलाकार!


हातोडा आणि छन्नींचा वापर करून मूर्तिकार दगडापासून सुंदर मूर्ती घडवत असतात, हे आजवर अापण  पाहिले आहे. दुसरीकडे असा एक कलाकार आहे जो दगडांचा आकार न बदलता त्या दगडांनावर विविध रंगांची उधळण करून व्यक्तिचित्रे आणि पोट्रेट काढतोय. सुमन दाभोलकर असं या कलाकाराचे नाव आहे. लॉकडाऊनकाळात त्यांनी दगडावर अनेक व्यक्तिचित्रे साकारली आहेत. दगडावर काढलेल्या कलाकृती सध्या सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.

सुमन दाभोलकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या गावचे रहिवासी. फाइन आर्ट्सचे शिक्षण घेतलेले सुमन गेल्या २ वर्षांपासून ठाणे येथील न्यू हॉरिझॉन स्कॉलर्स स्कूलमध्ये कला शिक्षक म्हणून कार्यरत अाहेत. गतवर्षी कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन होता. त्यामुळे ते आपल्या मूळ गावी परतले. वास्तविक पाहता सिंधुदुर्ग हा निसर्गसौंदर्याने वेढलेला जिल्हा. हे निसर्गसौंदर्य सुमनला नेहमी भावत असत. लॉकडाऊन काळात ते आपल्या घराशेजारी असलेल्या नदीकाठी वेळ घालवत. नदीभोवती फिरताना त्यांना एक दगड दिसला आणि त्याला ते हातात न्याहाळू लागले.

new google

यातूनच सुमन यांना यात दगडांना चित्रकलेच्या माध्यमातून मूर्त स्वरूप देण्याची भन्नाट कल्पना सुचली. या दगडांवर काम करायला सुरुवात केली. अंगी असलेल्या कलात्मक गुणांच्या आधारे रंग देऊन अनेक जीव त्या दगडात घडविले. त्यातून मग विविध आकार जन्मास येऊ लागले. प्राणी, कार्टून्स, मासे विविध वस्तू उलगडून समोर येऊ लागल्या. कला, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रांतील मातब्बर व्यक्तींचे चेहरे त्यांनी दगडात साकारले आहेत. दगडापासून बनवलेली ही रंगशिल्पे इतके वास्तव वाटतात की ती पाहताक्षणी खरी असल्याचा भास होतो.

कलाकार

निसर्ग हा एक भला मोठा कॅनव्हास -सुमन दाभोलकर

नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, स्वप्नील जोशी, विराट कोहली, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, ओशो, रतन टाटा, कविवर्य नारायण सुर्वे यांचे पोट्रेट साकारले आहे. यासह हत्ती मांजर, मासा, कासव, ससा, अांबा, वडापाव यासह पन्नासहून अधिक शिल्पकृती साकारले आहे. अर्थात दगड ही जी काही निसर्गाची निर्मिती आहे त्यातून एक रंगशिल्प साकारलं जातंय हे मला भावतय. निसर्ग हा एक भला मोठा कॅनव्हास आहे. तो खूप काही शिकवत असतो, अशी प्रतिक्रिया सुमन दाभोळकर यांनी दिली.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन बनला 21व्या शतकातील सर्वात महान गोलंदाज!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here