आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

चित्तोडगडचे युद्ध: राजा रतन सिंहच्या शौर्यापुढे क्रूर खिलजीचेही पाय डगमगले होते…!


इतिहासात अनेक क्रूर राजे,सम्राट,राण्या यांचा उल्लेख आपणास पहायला मिळतो. त्यांच्या क्रूरतेच्या कहाण्या ऐकतांना ,वाचतांना आपल्याही अंगावर काटा येतो.कितीतरी निर्दोष लोकांवर अन्याय करून त्यांनी इतिहासात स्वतःलालोकांच्या लक्षात राहील अशी ओळख निर्माण करून दिली. काही राज्यांनी तर या बाबतीत अतिशोयोक्ती केली असंच म्हणावं लागेल.

इतिहासात अश्याच एका राज्याची नोंद आहे जो त्याच्या पराक्रमापेक्षा क्रूरतेमुळे जास्त चर्चेत राहिला.तो म्हणजे ‘अलाउद्दीन खिलजी’. इतिहासात खिलजीची ओळख क्रूर राजा म्हणूनच जगास झाली आहे. अत्यंत निर्दयी व क्रूर असलेल्या खिलजीने सत्तेच्या लालसापोटी आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा सोडले नाही.

खिलजी

new google

चुलत्याला मारून गादी वर बसलेला खिलजीचा इतिहासही तेवढाच भयंकर आहे. क्रूर आणि निर्दयी असलेला खिलजी त्याकाळी प्रत्येक युद्ध आपल्या शौर्याच्या आणि क्रूरतेच्या जीवावर जिंकत गेला. खिलजीच्या युद्ध कौशल्याची खरी परीक्षा ठरली ते म्हणजे चित्तोड चे युद्ध..

इतिहासाच्या  पानातील या घटनेने राजपूतांच्या शौर्याचे आफाट दर्शन.

पद्मावतनुसार राघव नावाच्या व्यक्तीने अलाउद्दीन खिलजीकडे जाऊन राणी पद्मिनीच्या सौंदर्याचे वर्णन केले. हे ऐकूनच खिलजीने चित्तोडगडवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला.

जरी, खिलजीने चित्तोडचा हा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला, तरीही त्याचा विजय झाला नाही. कारण त्याने ज्या कारणामुळे चित्तोडवर आक्रमण केले होते ते म्हणजे  राणी पद्मावती त्याच्या हाती लागली नाही.

28 जानेवारी 1303 रोजी अलाउद्दीनन चित्तोडगडकडे कूच करण्याच्या उद्देशाने आपल्या मोठ्या सैन्यासह निघाला.सैन्यासह गडाजवळ पोहोचल्यानंतर त्याने बेराच व गंभीर नदीच्या दरम्यान आपला तळ ठोकला.

किल्ल्याबाहेर आठ महिने तळ ठोकला.खिलजी

खिलजीच्या सैन्याने रत्न सिंहच्या किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घातला. अलाउद्दीनने स्वतःच चित्तौरी टेकडीवर तळ ठोकला होता.त्यानी सलग आठ महिने  वेढा घातला होता, हे सिद्ध होते की बचावकार म्हणजेच राजा रत्न सिंहने त्याला कठोर संघर्ष केला.

पद्मावतअनुसार राजा रतन सिंह आणि त्यांची सैना 2 महिने पावसाळी वातावरणात आर्धी पहाडी चढून आले होते. परंतु हे लक्षात येताच खिलजीने पहाडी व किल्ल्यावर दगडे फेकण्याचा आपल्या सैन्यांना आदेश दिला. ज्यामुळे सैना परत किल्य्यावर अडकली. असही म्हटले जाते की, किल्यावरील सैना आणि पहारेकरी यांचे भुकेने हाल होत होते.

26 ऑगस्ट 1303 रोजी अलाउद्दीन किल्ल्यात प्रवेश करण्यात यशस्वी झाला. तेथे आपला विजय साकारल्यानंतर त्याने चित्तोडमधील जनसंहार करण्याचे आदेश दिले. अमीर खुसरो यांच्या म्हणण्यानुसार, खिलजीच्या आदेशानुसार सुमारे 30 हजार हिंदूंना ‘कोरड्या गवतासारखे कापण्यात आले’.

 खिलजी

या युद्धामध्ये राजा रतन सिंह यांचे काय झाले यावर अजूनही मतभेद आहेत. वेगवेगळ्या मुस्लिम लेखकांनी या विषयावर वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या आहेत. ज्यामध्ये अमीर खुसरो, झियाउद्दीन बारानी आणि इस्लामी लिहित आहेत की चित्तोडगढच्या राजाने अलाउद्दीनला शरण गेले आणि खिलजीने त्याला माफ केले.

त्याचप्रमाणे जैन लेखक कक्क्या सूरी यांनी लिहिले की अलाउद्दीनने राजाची सर्व मालमत्ता घेतली आणि त्यानंतर त्याने राजाची अशी अवस्था केली की ते एका राज्यातून दुसर्‍या राज्यात भटकत राहिले.

तर आधुनिक इतिहासकारांचे या विषयावर वेगळे मत आहे. त्यांच्या मते, राजा रत्न सिंह शेवटच्या क्षणापर्यंत लढताना रणांगणावर शहीद झाला. असेही एक मत आहे की राजाने खिल्लजीसमोर आत्मसमर्पण केले होते.

पद्मावतमध्ये असा दावा केला गेला आहे की कुंभलनेरच्या राजाशी झालेल्या युद्धाच्या वेळी राजा रतन सिंह यांचा मृत्यू झाला होता. चित्तोडगढवर आपला विजय मिळविल्यानंतर असे म्हणतात की खिलजी तिथे सात दिवस राहिले. त्यानंतर त्याने आपल्या आठ वर्षांच्या मुलाच्या हातात चित्तोडचा राज्यकारभार दिला आणि निघून गेला.

आपल्या 8 वर्षाच्या मुलाच्या नाववर (खिज्र खान) खिलजीने चित्तोडच्या किल्ल्याचे नाव खिजराबाद असे ठेवले. त्यानंतर तो परत दिल्लीला परतला. त्याचवेळी मंगोल्यानी भारतावर आक्रमण केले होते.

खिलजी

खिज्र खान अजूनही लहान असल्यामुळे  चित्तोडचा कारभार खऱ्या अर्थी खिलजीचा गुलाम मलिक सांभाळत होता. काही दिवसांनी खिलजीचा  विचार अचानक बदलला आणि त्याने चित्तोडचा राज्यकारभार पाहण्यास हिंदू राजा मलादेव  याला बोलावले.

अलाउद्दीनच्या मोहिमेत मलादेवाने पाच हजार घोडेस्वार आणि दहा हजारांचे सैन्याचे  योगदान दिले होते. याखेरीज जेव्हा जेव्हा खिलजी मलादेवाला मदतीसाठी ऑर्डर देत असत तेव्हा मलादेव त्याच्या मदतीसाठी तिथे असे. यासह दरवर्षी तो खिलजीला भेटण्यासाठी शाही दरबारात जायचा. तिथे जाताना गिफ्ट घेत असे आणि त्या बदल्यात त्याला तिथूनही सन्मान मिळाला.

मलादेव जिवंत असे पर्यंत त्यानेच चित्तोडचा कारभार सांभाळला . 1321 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हा किल्ला हम्मिरसिंगने ताब्यात घेतला. हम्मीरसिंग गुहिलांच्या सिसोदिया शाखेचा शासक होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे हि आवडेल – मराठ्यांना गनिमी काव्याची देणगी या आफ्रीकन सरदाराने दिली होती…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here