कसोटी सामन्याच्या एका डावात १० विकेट घेणारा अनिल कुंबळे एकमेव भारतीय गोलंदाज आहे..!


क्रिकेट! असा खेळ ज्यामध्ये दररोज कितीतरी नवीन विक्रम बनतात आणि कितीतरी जणांचे जुने विक्रम मोडले जातात. सांघिक  कामगिरीवर विजय अवलंबून असलेला ह्या खेळात अनेक भारतीय खेळाडूंनी आपलं करीयर घडवले. याच स्टार खेलाडूपैकी एक नाव म्हणजे भारतातच लेगस्पिनर गोलंदाज अनिल कुंबळे.

तसे तर कुंबळेच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आहेत. परंतु त्याच्या एका विक्रमाची चर्चा नेहमी होत असते. अनिल कुंबळे याने  पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्याच्या एका डावात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व खेळाडूंना बाद करत 10 विकेट स्वतःच्या नावावर करण्याचा अनोखा विक्रम केला होता.

Happy Birthday Anil Kumble: From 'Perfect 10' to 'bowling with broken jaw'- greatest moments of his career

लेगस्पिनर अनिल कुंबळेच्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण होता जेव्हा त्याने एका डावात  पाकिस्तानचे 10 गडी बाद केले. 1999 मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर कुंबळेने ही कामगिरी केली होती होती..

हेही वाचा:किशन लाल यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने पायात बूट न घालता इंग्लंडच्या संघाला धूळ चारली होती..

new google

काही  दिवसापूर्वी  झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज माम्बगावासोबत इंस्ताग्राम लाइव्ह वर बोलतांना कुंबळेने या सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला होता.

Anil Kumble appointed head coach of Indian cricket team for 1 year | Cricket - Hindustan Times

अनिल कुंबळे म्हणाला  की ती घटना मला अशी दिसते की जणू काही काल परवाच घडली असावी. बर्‍याच दिवसानंतर भारत आणि पाकिस्तान खेळत असलेल्या 2 कसोटी सामन्यांची ही मालिका होती. पहिली कसोटी चेन्नई येथे खेळली गेली असून भारताला 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. कुंबळे म्हणाले की, कोटला येथे जाताना त्यांना माहित होते की संघ जिंकला पाहिजे.

अनिल कुंबळेने या कसोटी सामन्यात सर्व 10 बळी घेऊन इतिहास रचला. असे करणारा तो जगातील दुसरा क्रिकेटर ठरला. त्याच्या आधी इंग्लंडच्या जिम लेकरने ही कामगिरी केली होती. पाकिस्तानचे फलंदाज एकामागे एक कुंबळेच्या गोलंदाजीवर तंबूत परतत होते.

अनिल कुंबळे

अनिल कुंबळेने इतिहास रचताना सामन्याच्या चौथ्या दिवशीची परिस्थिती सांगितले. “मला माहिती होते की, जेव्हा विकेटमध्ये जास्त उंचावा असतो तेव्हा चेंडू स्विंग करण्यास सोपा जातो” त्या दिवशीही नेमके तेच घडले. सामना जिंकणे आमच्यासाठी खूप महत्वाचं होत. अन्यथा  आम्ही मालिका गमावली असती. काहीही करून सामना जिंकायचा एवढच आमच्या डोक्यात होते आनी त्या हिशोबाने खेळ खेळला. सुदैवाने आम्ही तो सामना जिंकण्यास यशस्वी झालो.

दहाव्या विकेटचा किस्सा!

अनिल कुंबळे

अनिल कुंबळेने पुढे सांगितले कि “दहावा विकेट हा मला नाहीतर कदाचित माझा सहकारी जवागल श्रीनाथ याला मिळाला  असता. परंतु श्रीनाथने त्याच्या ओव्हरमध्ये फक्त धावा रोकल्या. त्याला चांगले माहिती होते की, तो पाकिस्तानचा दहावा  फलंदाज हा गोलंदाज आहे आणि तो त्याला सहज बाद करू शकला असता. पण कुंबळेचा स्पेल ९ विकेट वर संपावा अस त्याला वाटले नाही आणि त्याने विकेट मिळवण्यासाठी गोलंदाजी केली नाही.”

त्याच्या पुढच्याच  षटकात अनिल कुंबळेनी सकलेन मुश्ताकला पायचीत करून दहावा बळी मिळवला आणि इतिहास  घडवला. 

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन बनला 21व्या शतकातील सर्वात महान गोलंदाज!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here