आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

भारतीय संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडण्यासाठी सनथ जयसूर्याला रातोरात सलामीवीर बनवले होते..!


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले ज्यांनी आपल्या कारकिर्दीत करोडो चाहत्यांची मने जिंकली.  त्यातील काही गोलंदाज होते तर काही फलंदाज. असाच एक जागतिक क्रिकेटमधील नावाजलेला तारा म्हणजे श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज सनथ जयसूर्या.

सनथ जयसूर्याची क्रिकेट कारकीर्द तशी फार लांब नव्हती परंतु आपल्या कारकिर्दीत संपूर्ण जगातील क्रिकेट चाहत्यांची मने त्याने सहज जिंकली.

सचिन या जयसूर्या नहीं बल्कि इस बल्लेबाज ने सबसे ज्यादा उम्र में

new google

आपल्या काळातील जगातील सर्वात धोकादायक फलंदाज असलेल्या जयसूर्याचा उपयोग श्रीलंका संघाचे सुरवातीच्या काळात  तात्पुरता फलंदाज आणि गोलंदाज म्हणून केला पण,  1996 मध्ये जयसूर्याला रातोरात सलामीवीर बनविण्यात आले आणि त्यानंतर संपूर्ण विश्व क्रिकेटचे भाग्य बदलले.

जयसूर्याच्या कारकीर्दीतील महत्त्वपूर्ण वळणामुळे तो फलंदाजीत  एक चांगला सलामीवीर बनला. श्रीलंकेच्या या दिग्गज डावखुर्‍या खेळाडूने 110 कसोटी सामन्यांमध्ये 6973 धावा केल्या, ज्यात 14 शतकांचा समावेश होता. ही आकडेवारी फलंदाज म्हणून सनथ जयसूर्याच्या उंचीची साक्ष देते.

सनथ जयसूर्याने सन 1988 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचे प्रतिनिधित्व  केले आणि त्यानंतर पाकिस्तान दौर्‍यासाठी श्रीलंकेच्या बी संघात त्यांची निवड झाली. पाकिस्तानात जाऊन त्याने दोन चमकदार डबल शतके ठोकली आणि त्याला श्रीलंकेच्या संघात खेळण्याची संधी मिळाली.

जयसूर्याने 1989 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले.पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो आला आणि अवघ्या 3 धावा काढून तो बाद झाला. जयसूर्याच्या कारकीर्दीची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि हे चक्र 4 वर्षे चालले.

सनथ जयसूर्या

हेही वाचा:किशन लाल यांच्या नेतृत्वात भारतीय हॉकी संघाने पायात बूट न घालता इंग्लंडच्या संघाला धूळ चारली होती..

मुख्य म्हणजे जयसूर्याने सुरवातीच्या 33 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नाही. 28 ऑक्टोबर 1993 पर्यंतची त्याची सर्वोत्तम धावसंख्या केवळ 34 धावा होती.  यानंतर, शारजाह येथे खेळल्या जाणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरूद्ध त्याला तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरवण्यात आले आणि या फलंदाजाने आपल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. जयसूर्याने 58 धावा केल्या आणि पुढच्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले. यानंतर त्याला 14 डावांमध्ये पुन्हा अर्धशतक करता आले नाही.

1996मध्ये श्रीलंकेच्या संघाने जयसूर्याला सलामीवीर म्हणून फलंदाजीसाठी पाठवले. पाकिस्तानचा संघ श्रीलंकेच्या दौर्‍यावर आला आणि जयसूर्याने तीन सामन्यांच्या मालिकेच्या तिन्ही सामन्यात अर्धशतक ठोकले. तरीही जयसूर्या श्रीलंकेच्या संघात कायमचा नव्हता, त्याच्या फलंदाजीचा क्रम बदलतच राहिला. यानंतर 8 डिसेंबर 1994 रोजी जयसूर्याने आपल्या फलंदाजीने पहिला मोठा धमाका केला. न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सलामीवीर म्हणून त्याने 140 धावा केल्या. जयसूर्याने पदार्पणानंतर 5 वर्षानंतर कारकिर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले.

सनथ जयसूर्या

1996चा विश्वचषक:

1996चा विश्वचषक भारत-पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने संयुक्तपणे आयोजित केला होता. पाकिस्तान आणि भारत यांना विजयाचे दावेदार मानले जात होते. त्यावेळी श्रीलंकेचा संघ खूपच कमकुवत होता, त्यांच्या विजयाची टक्केवारी केवळ 29 टक्के होती. आता श्रीलंकेच्या कॅम्पने विश्वचषक स्पर्धेसाठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली. 1996 मध्ये श्रीलंकेचे प्रशिक्षक डेव व्हॅटमोर होते आणि श्रीलंकेचा संपूर्ण संघ शक्य तितक्या धावा कशा करायच्या यावर चर्चा करीत होता.

त्या काळात, संघ सहसा पहिल्या 40 षटकांत आरामात खेळत असत आणि शेवटच्या 10 षटकांत धावा जमवतात, पण व्हॅटमोर आणि कर्णधार रणतुंगाने पहिल्या 15 षटकांत वेगवान धावा करण्यासाठी रणनीती आखली आणि जबाबदारी जयसूर्या व रोमेश कालुवितरना यांना देण्यात आली. सनथ जयसूर्या याने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘टीम मॅनेजमेंटने मला सांगितले की, मी 7 व्या क्रमांकास खेळण्यास पात्र नाही कारण माझा तिथे योग्य वापर होत नाही. मग त्यांना असे वाटले की जर मला सलामीला पाठवले आणि मी वेगवान धावा करू शकलो तर येणार्‍या फलंदाजांवर जास्त दबाव येणार नाही.

बदलले एकदिवसीय क्रिकेट

श्रीलंकेच्या संघाने विश्वचषक सारख्या मोठ्या स्पर्धेत सलामीवीर म्हणून सनथ जयसूर्याला पाठवून एकाप्रकारे नको ते धाडस केले होते.

त्यानंतर संपूर्ण जग थक्क झाले. जयसूर्याने 1996 च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाला प्रत्येक सामन्यात तुफानी सुरुवात दिली. पहिल्या 15 षटकांत जयसूर्या आणि कालुवितरना धुव्वादार फलंदाजी करायचे आणि विरोधी संघ बॅकफूटवर येत असत. याचा परिणाम असा झाला की श्रीलंकेच्या संघाने 1996चा विश्वचषक जिंकला.

सनथ जयसूर्याची ही क्रिकेट कारकीर्द आजही करोडो चाहत्यांच्या स्मरणात आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

श्रीलंकेचा माजी फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन बनला 21व्या शतकातील सर्वात महान गोलंदाज!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here