आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा प्रसार करण्यासाठी हा युवक एकटाच महाराष्ट्र भ्रमंती करतोय.!


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जसं वैविध्य आहे तसंच ते इथल्या खाद्यसंस्कृतीतही दिसून येतं. ‘जिथे जे पिकतं तिथे तेच शिजतं’ असं म्हणलं जातं ते अगदी खरंय. देशभरात कुठेही जा. काही निवडकच पदार्थ ताटात दिसतात. उत्तरेकडे गेलात तर गव्हापासून बनवलेल्या रोटी आणि भाजीचे प्रकार अधिक असतात. तिथे भाताचं प्रमाण कमी. तर दक्षिणेकडच्या राज्यात गेलात तर याउलट चित्र दिसते. पण महाराष्ट्रात चित्र खूपच वेगळं आहे. एक संपूर्ण आहार इथल्या घराघरातल्या ताटात दिसतो. दर दोन मैलांवर बोलीभाषेचं एक वेगळं रूप बघायला मिळते तशी खाद्यसंस्कृतीतील विविधताही दिसून येते. महाराष्ट्राची हीच खाद्यसंस्कृती पाहण्यासाठी एक युवक महाराष्ट्र भ्रमंती करतोय.

खाद्यसंस्कृती

सिद्धराम झेंडेकर असं या ३१ वर्षीय तरुणाचं नाव आहे.

new google

शहरातील शेळगी येथील विद्यानगर परिसरात राहणारा सिद्धराम  गेल्या दहा वर्षांपासून ट्रेकिंग करतोय. ट्रेकिंग करता करता त्याला महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती जाणून घेण्याविषयी कुतूहलता निर्माण झाली. या कुतूहलापोटी तो राज्यभर भ्रमंती करू लागला. मार्केटिंगचे काम करणारा हा युवक मध्यमवर्गीय कुटुंबातला.

बालपणापासूनच त्याला निसर्गाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी प्रचंड वेड. पण परिस्थितीअभावी त्याला कुठे फिरताय आले नाही. कसेबसे बीकॉमपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीस लागला. मार्केटिंगच्या कामातून निर्माण होणार्‍या ताणतणावांपासून मुक्तता मिळविण्यासाठी त्याने २०१० साली ट्रेकिंगला सुरूवात केली.

ट्रेकिंगची आवड असलेल्या सिद्धरामने राज्यभर भ्रमंती करून, अनेक जणांना भेटून, विविध पदार्थांच्या चवी चाखली अाहे. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणच्या ट्रेकर्सला त्याने आपले मित्र बनवले. प्रांतांप्रमाणे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला कसे मिळतील. त्याची चव कशी असेल यासाठी सतत प्रयत्न करत असतो.

वर्षांतून दोनदा तरी तो दोन ठिकाणांना हमखास भेटी देतो. पण सध्या कोरोनामुळे त्याला कुठेही फिरत नाही. विशेष म्हणजे तो महाराष्ट्रातच जास्त फिरतो. प्रवासातून घरी परतल्यानंतर त्या ठिकाणचे वैशिष्ट्य आणि खाद्यपदार्थ तो इतर मित्रांना सांगायला विसरत नाही. इतरांनाही ट्रेकिंग करण्याविषयी प्रोत्साहन देतो.

खाद्यसंस्कृती

. . . अन् थेट अमरावती गाठली

अमरावती जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात बहिरम ची दरवर्षी जत्रा भरते. या जत्रेत स्थानिक लोक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ बनवतात. इथले बोकडाचे मटण खूप प्रसिध्द आहे. त्याची चव चाखण्यासाठी सिद्धराम ने सोलापूर ते अमरावती असा एका दिवसांत प्रवास केला होता. गावची जत्रा पाहण्यासाठी खूप दुरून आलेल्या सिद्धराम चे तिथल्या स्थानिक लोकांनी फार कौतुक केले. विशेष पाहुणचार केल्याने सिद्धराम देखील भारावून गेला. कुणी सोबत असो अथवा नसो सिद्धराम मात्र महाराष्ट्राची खाद्यसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एकटाच महाराष्ट्र भ्रमंती करतोय.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here