आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

चंदाताई तिवाडी गेल्या ४९ वर्षापासून भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करतात.!


जगण्यासाठी संस्कृती आणि विज्ञान आवश्यक असल्याचा संदेश देत पंढरपूरच्या चंदाताई तिवाडी या महिला भारूडकार १९७२ म्हणजे ४९ वर्षापासून भारूडाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करीत आहेत. संत एकनाथांचा वारसा घेतलेल्या चंदाबाईंनी, त्यांच्या अंगी उत्तम अभिनयकला असल्याने, प्रसंगी विनोदातून, तर कधी मार्मिक दाखले देत सर्वसामान्यांना भेडसावणार्‍या अनेक विषयांचे विवेचन करतात.

भारूड

चंदाताई तिवाडी यांचा जन्म पंढरपूर येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताची म्हणून त्यांना लौकिक अर्थाने शिक्षण घेता आले नाही. जेमतेम सहावीपर्यंतच शिक्षण त्यांना घेता आले; मात्र सर्व बालपण हे पंढरपूरच्या भक्तिमय लोकजीवनात गेल्याने भक्तीचे हे संस्कार आयुष्यभर सोबत राहिले. आईचे माहेर मोझरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गाव, त्यामुळे तुकडोजी महाराजांचे राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांना आत्मसात करता आले. १९६५ साली त्यांचे पंढरपूरच्या तिवाडी कुटुंबातील जगदीश प्रसाद तिवाडी यांच्या समवेत विवाह झाला.

new google

लग्नानंतर त्या सोलापुरात आल्या. त्यावेळी सोलापूरच्या नगरेश्वर मंदिरात सात्यत्याने चालणाऱ्या नामसंकीर्तन सोहळ्यात भक्तिभावाने सहभाग घेवू लागल्या. तिथेच अभंग, गौळण, भारुड अशी भावगीते गाण्याची संधी त्यांना मिळाली. यावेळी बालपणातील संस्कारांनी त्यांनी साथ दिली. सामाजिक बंधने झुगारून भारूड परंपरेत स्वतःला झोकून दिले. भारूडाचे पाठांतर करून आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याचे सादरीकरण ही खुबी चंदाताईंनी आत्मसात केली. चंदाताईना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुंडा महाराज देगलूर कर यांचे सानिध्य लाभले.

चंदाताई तिवाडी

दुंडा महाराजाचा आदर्श घेवून त्यांनी आपल्या भारूड सादरी करणाला सुरूवात केली. प्रवाहाच्या विरोधात उभे राहून संत परंपरेची पताका डोईवर घेऊन सन १९७२ पासून चंदाताई भारूड सादरीकरण करून समाजप्रबोधाचे कार्य करीत आहेत.
दरम्यान १९८१ साली पुणे आकाशवाणी केंद्रातून त्यांना पहिल्यांदा भारूड सादरीकरणाची पहिली संधी मिळाली. पुणे आकाशवाणी केंद्राद्वारे त्या घराघरात पोहचल्या.

हजारो लोकांना एका जागी खिळवून ठेवण्याची ताकत चंदाबाईंच्या सोंगी भारूडात आहे. त्यांचा संतसाहित्याचा चांगला अभ्यास आहे.

गरीब महिलांना मिळवून दिली घरे

केवळ भारुडातून समाजप्रबोधन करण्यावरच त्यांनी समाधान मानले नाही, तर प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी ते साकारण्याचा प्रयत्‍न केला. गरीबांसाठी स्वतःचे घरकुल हे आयुष्यभर निव्वळ स्वप्नच राहते. म्हणूनच चंदाताईंनी पुढाकार घेऊन १९८१ साली पंढरपूरनजीक गोपाळपूर येथे खडकाळ माळरानावर जमीन उपलब्ध करून दिली. स्थानिक आमदार सुधाकर परिचारक यांच्या सहकार्याने तसेच पंढरपूर अर्बन बँकेच्या मदतीने प्रत्येकी केवळ २८ हजार रुपयांत त्यांनी तळागाळातील दीडशे गरजूंना वीज-पाणी आदी सोयींसकट त्यांच्या मालकीची होतील अशी घरे बांधून दिली.

अनिष्ट प्रथा-परंपरांवर प्रहार

सादरीकरणातील नाटय़मयता आणि लोकमानसाची नस सापडलेल्या चंदाताई भारूडांतून केवळ भक्तिमार्गाचीच थोरवी सांगत नाहीत, तर त्यातून समाजातील प्रचलित अनिष्ट प्रथा-परंपरांवरही त्या प्रहार करतात. आजवर त्यांनी दारू, गुटखा, एड्स, कुटुंबनियोजन, पाणीप्रश्न, कृषी-योजना, राष्ट्रीय एकात्मता, महिला स्वातंत्र्य, भ्रूणहत्या असे अनेक विषय भारुडातून हाताळले आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. पळून गेलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी वरदान ठरणारे महादेव मंदिर ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here