आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

घटस्फोट आमीर आणि किरणचा, मार्केट खाल्लाय मात्र ‘फातिमा सना शेख’ने !


बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या लाईफस्टाईल इतरांपेक्षा वेगळ्याअसतात हे सर्वांनाच मान्य असेल. कामावरील दडपण, शुटींग, इतर अन्य  कारणामुळे अनेक वेळा हे पती पत्नी कित्येक महिने एकमेकांपासून लांब राहतात. कोणत्याही पती- पत्नीचा संसार तसा किती दिवस चालेल हे सांगणे कठीणच आहे, परंतु संसार लवकर मोडून दुसरा संसार थाटण्यात बॉलीवूड मात्र सर्वांत पुढे आहे यात वाद नाही.

बॉलीवूडचा स्टार अभिनेता अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एकमेकांना लग्नाच्या बंधनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतलाय. साहजिकच मिडिया आणि न्यूजवाल्यांसाठी हा चर्चेचा विषय ठरला. १५ वर्षाच्या सुखी संसारानंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या घटस्फोटाला नक्की कारण काय आहे हे जरी आमीर आणि किरणने सांगितले नसले तरी लोकांनी मात्र आता त्यांच्या वेगळे होण्यामागचे कारण शोधल्यास सुरवात केली आहे. आणि यात प्रामुख्याने नाव येतंय ते म्हणजे “फातिमा शेख’

दंगल मध्ये काम केलेली अभिनेत्री फातिमा शेख हिच्यासोबत आमिरची वाढती जवळीकता पाहता किरण आणि आमिरच्या वेगळे होण्याचे कारण “फातिमा” असल्याच्या चर्चा चांगल्याचा रंगू लागल्या आहेत.

new google

आमिर आणि फातिमामधील जवळीक यामुळे आमिर आणि किरण यांचं 15 वर्षाचं नातं तुटल्याचं बोललं जात आहे. ट्विटरवर #FatimaSanaShaikh हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. फातिमाने आमिर खानसोबत दंगल सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका केली होती.

 

आमिर खान आणि फातिमा सना शेख या दोघांच्या  लिंकअपच्या अफवा यापूर्वीही समोर आल्या आहेत. या अहवालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना फातिमा सना शेख म्हणाली की ती आमिरला आपला मार्गदर्शक आणि जीवन गुरु मानते. तथापि, आमिर आणि फातिमा यांच्या कथित लिंकअपवरून लोक अजूनही सोशल मीडिया वरबऱ्याच चर्चा करताना दिसतआहेत.

आमीर आणि फातिमामधील वाढती जवळीकता किरणला समजल्याच बोललं जात आहे आणि, त्या कारणामुळेच तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला अशीही चर्चा सोशल मिडीयावर सध्या रंगत आहे.

आंमीर

56 वर्षीय आमिर खानने 2005 साली किरण रावशी लग्न केले होते. आमिरने यापूर्वी 1986 साली रीना दत्ताशी लग्न केले होते. आमीर आणि रीना यांना जुनेद आणि आयरा खान ही दोन मुले आहेत. २००२ साली आमिर आणि रीनाचा घटस्फोट झाला.आमिर खान आता त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटात दिसणार असून तो यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी रिलीज होणार आहे.

आज अमीर आणि किरणने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि सोशल मिडीयावर फातिमा ट्रेंड करायला लागली.काही लोकांनी तर या घटनेवर मजेशिर असे मिम्सही शेअर केले आहेत. फातिमा बद्दलचे काही ट्वीट आणि लोकांच्या प्रतिक्रिया:

 

fatima get troll

एकंदरीत वातावरण पाहता घटस्पोट जरी आमीर आणि किरणचा होत असला तरी चर्चेचा विषय बनलीय मात्र “फातिमा शेख” असच म्हनाव लागेल. आता येणाऱ्या काळात आमीर आणि फातिमा खरच एकत्र येतात का ह्या होणाऱ्या चर्चा केवळ अफवा आहेत हे  लवकरच समजेल.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : ४०० वर्षांपासून जिवंत आहे हा संत ? वाचा सविस्तर…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here