आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

फेसबुक डेटा लीक होणे म्हणजे काय? हे या लेखकाने खूप वर्षांपूर्वीच जगासमोर मांडले होते!


हल्ली अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. अगदीच सुरुवातीला जेव्हा आपण फेसबुक वापरायला लागलो त्यावेळी माहितीतल्या किंवा अनोळखी लोकांना आपल्याबरोबर जोडणे हा एकमेव उद्देश आपल्याकडे होता. परंतु सोशल मीडियाचा वापर बघता आजचे फेसबुक फक्त लोकांना जोडण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही तर जगातील ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांना कनेक्ट करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या फेसबुकने आज एका जागतिक बाजारपेठेची जागा घेतली आहे असे म्हणायला हरकत नाही.

आता याच सोशल मीडिया किंवा फेसबुकचा अतिवापर आणि त्यामुले होणारे फायदे जितके आहेत त्याच प्रमाणात तोटे देखील आहेत. यातूनच हल्ली फेसबुक डेटा लीक झाला किंवा प्राइवसी सेट केलेली असूनसुधा सोशल मीडिया अकाउंट हैक झाले किंवा त्यावरील माहितीचा गैरवापर केला गेला याची अनेक प्रकरणे आपण बघत असतो.

आता खरे तर २१ व्या शतकात देखील जगासाठी या गोष्टी खुप नवीन आहेत. परंतु फेसबुक डेटा लीक होऊ शकतो किंवा सोशल मीडिया द्वारे जनमत कसे नियंत्रित केले जाऊ शकते या सर्व गोष्टी एका प्रसिद्ध लेखकाने आजपासून बर्याच वर्षांपूर्वी आपल्या लिखानाद्वारे जगासमोर मांडलेल्या आहेत.

new google

डाटा लिक

सुरुवातीला जेव्हा हे फेसबुक डेटा लीक प्रकरण सगळ्यांचा समोर आले त्या वेळेला जगाला ही गोष्ट लक्षात आली की कितीही पासवर्ड टाकून आपण आपल्या फेसबुक अकाउंटवर माहिती शेअर केली किंवा प्रायव्हसी सेटिंग चेंज केली तरीदेखील ती लिक होऊ शकते.

फेसबुक वर आपण प्रायवसी च्या नावाखाली इतक्या विश्वासाने पोस्ट टाकतो किंवा आपल्या आयुष्यातले खाजगी, फोटो शेअर करतो,माहिती शेअर करतो तो डेटा देखील लिक होत आहे याची अनेक उदाहरने आपन बघत असतो.

एक प्रकारे ही गोष्ट अशी झाली की सुरुवातीला आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लावली जाते आणि मग नंतर त्या सेवेचा पूर्णपणे फायदा उठवला जातो. असंच काहीसं फेसबुकच्या बाबतीत म्हणाव लागेल.

हुकूमशाही आणि तंत्रज्ञान या दोन गोष्टी जर एकत्रितपणे आणल्या तर या गोष्टी काय काय करू शकतात हे फेसबूक वरील माहिती लिक होण्याच्या प्रकरणानंतर जगाच्या समोर खरेतर आत्ता आले आहे, परंतु या सगळ्या गोष्टींचा उल्लेख जॉर्ज ऑरवेल यांनी 1984 आणि ॲनिमल फॉर्म या आपल्या पुस्तकात खूप अगोदर केलेला आहे.

या पुस्तकाद्वारे त्यांनी जगाला हे सांगितले आहे की जेव्हा लोक आपल्या विचारांना नियंत्रित करण्याचा हक्क दुसऱ्या कुणाला देतात तेव्हा त्याचा परिणाम काय होऊ शकतो.

जॉर्ज ऑरवेल विषयी बोलायचे झाले तर उपनिवेशवाद काळामध्ये 25 जून, 1903 मध्ये बंगालच्या मोतिहारी मध्ये म्हणजेच आत्ताच्या बिहारमध्ये त्यांचा जन्म झाला. जॉर्ज ऑरवेल हे एक असे लेखक आहेत ज्यांनी जगाला हुकूमशाही आणि हुकूमशाहीची मर्यादा काय असते हे सांगितले.

आजच्या काळात देखील त्यांची पुस्तक लोकांना फक्त त्यांच्यातील राजकीय जाणीव जागृत करण्यास भाग पाडत नाहीत तर सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या विचारावर होणाऱ्या हल्ल्यांचे विषयदेखील त्यांना जागृत करतात. तसेच सोशल मीडियामुळे कुठल्या गोष्टी होऊ शकतात, लोकांचे विचार कशा प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकतात याविषयी देखील ते माहिती देतात.

जॉर्ज ऑरवेल यांनी दोन महायुद्धाचे म्हणजेच रुस आणि बोल्शेविक क्रांति यांचे अंक आपल्या पुस्तकात ठेवले आहेत. याद्वारे त्यांनी युद्ध राष्ट्रवाद किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाचे शासन आणि निरंकुश राजवट यांचा काय परिणाम जनतेवर होऊ शकतो हे येणाऱ्या पिढ्यांना सांगण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. जॉर्ज यांचे राजकारणावरील लिखाण हे सत्ता मिळवण्याच्या हेतूने किती अचूक आहे किंवा त्यांनी ते लिखनाद्वारे किती सटीकपणे मांडलेले आहे हे आपण एका उदाहरणावरून समजू शकतो. ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच जोर्ज यांच्या 1984 या पुस्तकाची विक्री झपाट्याने वाढली.

ऑरवेल यांनी आयुष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले तसेच पत्रकारिताही केली आणि नंतर स्पॅनिश गृह युद्धातही भाग घेतला. तरी देखील जर ऑरवेल यांची ओळख जगाला असेल तर त्याचे कारण 1984 आणि आणि एनिमल फॉर्म या त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे.

आता आज आम्ही १९८४ या पुस्तकातील त्यांचे काही विचार वाचकांसमोर मांडणार आहोत.

एक अशी कल्पना करा की दोन मोठे डोळे तुमच्याकडे सारखे बघत आहेत एक टेली स्क्रीन सारखी तुमच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहे, आणि सत्ताधारी पक्षाला जे हवे तेच तुम्हाला खायला आणि प्यायला मिळत आहे.
तुमचे कोणासोबत संबंध आहेत किंवा तुम्ही कोणाशी बोलता तसेच कोणासोबत चर्चा करता,तुम्ही कसे राहता या सर्व गोष्टींवर एखाद्या पक्षाचे नियंत्रण आहे. पक्ष जे काही बोलेल तेच अंतिम सत्य आहे आणि त्यावर तुम्हाला विश्वास ठेवण्यास भाग पाडले जात आहे.

डेटा लीक

या नुसत्या कल्पनेने देखील गुदमरल्यासारखे वाटते, परंतु हीच कल्पना जर खरोखर वास्तविक झाली तर ते वास्तव किती धोकादायक आणि भयानक असेल याचा विचार न केलेलाच बरा.

‘1984’ या पुस्तकात अशाच एका जागेची कल्पना केली गेली होती, जिथे सत्ताधारी पक्ष हा देव आहे आणि विचार करणे  हा गुन्हा आहे

‘1984’ हे पुस्तक म्हणजे एक असे जग आहे जिथे विचार करणे हा गुन्हा आहे या संकल्पनेवर बोलले गेले आहे. ज्यामध्ये आपण जर सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध विचार केला तर आपण एखाद्या मर्डर केलेल्या गुन्हेगार पेक्षा मोठे गुन्हेगार आहोत.
थॉट क्राईमच्या प्रति लोकांना अशाप्रकारे तयार केले गेले की कथेमध्ये आपल्या वडिलांची हेरगिरी करणारी अगदी नऊ वर्ष वयाची मुलगी विचारांच्या गुन्ह्यासाठी म्हणजेच या थॉट क्राइम साठी स्वतःच्या वडिलांना तुरुंगात पाठवते.

1984 ही विंस्टन स्मिथ ची कथा आहे. जो पक्षाच्या कल्पनेने विरुद्ध बोलतो आणि स्वतःची वेगळ्या पद्धतिने विचार करण्याची क्षमता टिकवून ठेवतो. तो अशा लोकांमध्ये राहतो जे माणसाने ऐवजी पार्टीच्या अगदी रोबोट मध्ये बदललेले आहेत. अतिशय सुंदरपणे मांडलेल्या या कथेमध्ये जनतेला फसवण्यासाठी आणि त्यांच्यापासून सहानुभूती मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने एक शत्रू तयार केला असून सर्वजण त्याला गोल्डस्टीन म्हणून ओळखतात.

आता हा गोल्डस्टीन बिग ब्रदर च्या हुकुमशाहीच्या पूर्णपणे विरोधात आहे!

तो अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रेस स्वातंत्र्य आणि संघटित होण्याचे स्वातंत्र्य अशा विचारांना समर्थन देतो जे पक्षाच्या विचारांच्या अगदी विरोधात आहेत. मजेची गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्ष हा गोल्डस्टीनला असा शत्रू मानतो की, त्याच्या विरुद्ध द्वेषपूर्ण सत्र आयोजित केली जातात ज्यामध्ये लोक त्याच्या वरील आपला राग त्या सत्रामध्ये व्यक्त करतात आणि त्याला शिव्या देतात. लोकांनी क्वचितच गोल्डस्टीन ला कधी बघितले असेल किंवा त्याच्या विषयी ऐकले असेल. परंतु; सत्ताधारी पक्षाने लावलेल्या सवयीमुळे ते मनातल्या मनात त्याला शिव्या देतात आणि त्याचा पूर्णपणे द्वेष करतात.

आता या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र विंस्टन स्मिथ जो या कथेतील मुख्य पात्र आहे,तो या सगळ्यांच्या मध्ये अडकलेला आहे. कारण तो गोल्डस्टीनचा कधी द्वेषही करत नाही किंवा त्याला गोल्ड स्टीनबाबत सहानुभूतीही वाटत नाही. प्रत्यक्षात अशी व्यक्ती आहे की नाही हे देखील त्याला माहीत नाही.

खोट्या गोष्टींच्या आधारावर बांधला गेला इतिहास

आपल्याप्रमाणेच विन्स्टन च्या जगातही मंत्रालय आहेत, परंतु ती आपल्या मंत्रालयात पेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत.
उदाहरणार्थ , मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ या मंत्रालयाचे काम आहे सत्ताधारी पक्षाची जाहिरात करणे किंवा त्यांचा प्रचार-प्रसार करणे ज्यामध्ये बातम्या, करमणूक, शिक्षण आणि कला या गोष्टींचा समावेश आहे.

अगदी शाळेत देखील मुलांना सत्ताधारी पक्षाबद्दल शिकवले जाते, प्रत्येक क्षेत्रात पक्ष दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. सदर पुस्तकात इतिहास हा कथांवर नाही तर सत्ताधारी पक्षाने पसरवलेल्या खोट्या आधारांवर तयार केला आहे, ज्यामध्ये फक्त बिग ब्रदर चा गौरव केला जातो आणि सत्ताधारी पक्षाचे कौतुक केले जाते.

या पुस्तकातील कथेचे मुख्य पात्र विंस्टन स्मिथ हे सत्य मंत्रालयात म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ मध्ये कार्यरत आहेत. जे दररोज पक्षाच्या आवडीनुसार आधीपासूनच प्रकाशित लेख पुस्तके वर्तमानपत्रे आणि मासिके या गोष्टी बदलत राहते.
या पुस्तकात युद्ध संबंधित काम हाताळणारे शांती मंत्रालय देखील आहे. टेलीस्क्रीन आणि दूरदर्शन टीव्हीवर नेहमीच माहिती असते की, ओशनिया येथे सत्ताधारी पक्षाची सत्ता आहे आणि प्रत्येक युद्धात त्याचा वरचा हात आहे.या कथेतील प्रेम मंत्रालय कायदा व सुव्यवस्थेचे संबंधित काम हाताळते.

जॉर्ज ऑरवेल हे 1984 या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय सुंदरपणे सांगतात की, एक असे जग जिथे सगळे काही नियंत्रित असेल आणि एका हुकुमशाही सत्तेच्या कायद्यात सर्व गोष्टी बंधनकारक असतील तर तिथे मानवी भावना किंवा प्रेम कशा प्रकारे दम तोडतात.

कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे विंस्टन स्मिथ यांची पक्षापेक्षा वेगळेपणाने विचार करण्याची सवय आणि मानवी भावना त्याला खूप वेगवेगळ्या परिस्थितीमधून जाण्यास भाग पाडतात. थोडक्यात सांगायचे झाले तर फेसबुक किंवा डेटा लिक प्रकरणे जी आता हताळली जात आहेत ती या जोर्ज ओरवेल यांनी खुप पूर्वी जगासमोर मांडली होती ती देखील १९८४ या पुस्तकाच्या माध्यमातुन.

==

सदर व्यासपीठावर मांडलेली मते ही विविध लेखकांची आहेत. संपादक मंडळ कदाचित या त्यांच्या मताशी सहमत असेलही. आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. पळून गेलेल्या प्रेमी जोडप्यांसाठी वरदान ठरणारे महादेव मंदिर ..

कागदावर पेरलेलं विष पिढ्यानपिढ्या इतिहास उद्ध्वस्त करते, कुबेराच ‘रेनिसान्स स्टेट’ ही तसचं आहे!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here