आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जगातील एकमात्र समुद्र ज्यात कोनीही इच्छा असूनदेखील बुडू शकत नाही..!


मित्रांनो हे जग समुद्र, नद्या,कालवे,ज्वालामुखी,सरोवर,धबधबे आणि अशा बर्याच नैसर्गिक स्त्रोतानी नटलेले आहे. या सुंदर जगाच्या पाठीवर अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्यविशायी सर्वानाच कुतूहल असत. यांपैकी बरेच समुद्र किंवा नद्या किंवा तलाव हे वेगवेगळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत.काही समुद्र पाण्याच्या रंगंसाठी तर काही भौगोलिक रचना किंवा पर्यटन अथवा इतर कारणांकरीता जगभरात चर्चेत असतात.

पण तुम्हाला हे माहिती आहे का, की या जगाच्या पाठीवर एक असा देखील समुद्र आहे ज्यात कुणीही बुडून मरू शकत नाही पण तरीदेखिल त्याला मृत समुद्र म्हणून ओळखले जाते. एक असा समुद्र ज्याचे पाणी पिण्यालायक नाहीये परंतु औषध बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि त्या पाण्याला अमृताची उपमा देखिल दिली जाते.

 समुद्र

new google

विशिष्ट भौगोलिक कारणांमुळे किंवा पर्यटन स्थळ म्हणून अनेक समुद्र किंवा तलाव प्रसिद्ध असतात हे आपण बघितल आहे परंतु हा समुद्र त्यात असलेल्या पाण्यामुळे आणि पाण्याच्या औषधि गुणधर्मा साठी प्रसिद्ध आहे हे देखील तितकेच खरे आहे.मुख्य म्हणजे सध्याच्या काळात पर्यटक एक आवडते पर्यटनाचे ठिकाण म्हणून या समुद्राला कमालीची पसंती देत आहेत

विशेष म्हणजे हा समुद्र डेड सी आणि अरबी झील या नावांनी प्रसिद्ध आहे.

हा मृतसमुद्र जॉर्डन, इस्राईल आणि पॅलेस्टाईन च्या दरम्यान स्थित आहे. मृत समुद्र हा समुद्रसपाटीपासून सुमारे चारशे मीटर खाली जगातील सर्वात खोलीवरचा बिंदू आहे ज्याची लांबी सुमारे 65 किलोमीटर आणि रुंदी ही आठ किलोमीटर इतकी आहे.

या मृत समुद्राचे पाणी जगातील इतर कुठल्याही जल संस्थांपेक्षा सर्वाधिक खारट आहे.

मजेदार गोष्ट म्हणजे यात असणारे मीठ हे सरासरी एका घनफूटाला एक किलोग्राम इतके असून त्याचे पाणी इतर महासागरापेक्षा सहा ते सात पटींनी जास्त खारट आहे. या मृत समुद्राचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे पाण्यातील अती खारटपणामुळे या समुद्राचे पाणी अतिशय जड आहे ज्यामुळे हे पाणी वर पासून खाल पर्यंत वाहत जाते आणि परिणामी हा महासागर उच्च घनतेसाठी ओळखला जातो. मुख्य म्हणजे याच कारणामुळे या महासागरात बुडणे कुठल्याही मनुष्यासाठी अगदी अशक्य आहे.

थोडक्यात म्हणजे या मृत समुद्र मध्ये कोणीही बुडू शकत नाही.

मृत समुद्राच्या या आश्चर्यचकित करणाऱ्या कारणांमुळेच हा समुद्र पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु राहिले आहे. पर्यटक या समुद्राचे आश्चर्यकारक रूप पाहायला जातात. मजेची पण खरी गोष्ट म्हणजे, जर एखाद्या माणसाला पोहायचे कसे हे माहीत नसेल किंवा पोहायला येत नसेल तरी देखील या समुद्रात पडून तो सहज पोहण्याचा आनंद घेऊ शकतो.

2007 मध्ये जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक म्हणून मृत समुद्राची निवड केली गेली होती परंतु सेवेन वंडर ऑफ बोर्ड च्या यादीमध्ये जाण्यासाठी त्याला जास्त लोकांनी मतदान केले नाही, परिणामी तो जगाच्या सात आश्चर्यांमध्ये सामील होऊ शकला नाही.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर या मृत समुद्रच्या पाण्यामध्ये कोणीही बुडत नाही कुणीही बुडून मरू शकत नाही तरी देखील याला मृत समुद्र असे नाव का दिले गेले आहे? तर याच महत्वाचं कारण आहे की,जलचर प्राणी आणि वनस्पतींसाठी हे पाणी प्राणघातक आहे.

ब्रोमाइड, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर इत्यादी खनिजे या पाण्यात जास्त प्रमाणात आढळतात आणि परिणामी या समुद्राचे पाणी पिण्यास योग्य नाही तेव्हा त्यामध्ये सापडलेले मीठ देखील वापरण्यास योग्य नाही. या मृत समुद्राचे पाणी इतके खारट आहे की, त्यात कोणतेही मासे किंवा इतर जलचर प्राणी टिकू शकत नाहीत. जलीय वनस्पतीची त्यात वाढ होणे देखील फार कठीण आहे.

असे मानले जाते की, या समुद्रामध्ये केवळ काही प्रकारचे बॅक्टेरिया आणि फक्त एकपेशीय वनस्पती आढळतात. परंतु एकीकडे हा सागर कोणत्याही जलजीव किंवा वनस्पतींसाठी अनुकूल देखील नाही यामुळेच आजूबाजूलाही झाडे किंवा इतर काही वनस्पती देखील दिसत नाही आणि म्हणूनच त्याला डेड सी असे म्हणतात.

मृत समुद्राची ही वैशिष्ट्य लक्षात घेतल्यानंतर एका प्राचीन ग्रीक लेखकाने या महासागराला मृत समुद्र असे नाव दिले.

आता पाहूया की, या मृत समुद्राच्या अतिशय खाऱ्या पाण्याला अमृताची उपमा का दिली गेली आहे!

श्वसन व त्वचेच्या आजारांवर उपचार करण्यास तसेच आपल्या अनेक गुणधर्मामुळे रोग बरे करण्यास आणि औषधे तयार करण्यासाठी हे मृत समुद्राचे पाणी उपयुक्त आहे. अगदी आज देखील बऱ्याच प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांवर मृत समुद्राचे पाणी समाविष्ट असल्याचा उल्लेख पाहायला मिळतो.

अशी देखील एक मान्यता आहे की, या समुद्राच्या पृष्ठभागावरून शिलाजीत काढून तो इजिप्शियन देशांमध्ये विकला गेला.
शास्त्रज्ञांच्या मते, या समुद्रात ब्रोमीन ची मात्रा जास्त प्रमाणात आढळून आल्याने ती आपल्या रक्तवाहिन्या साठी फायदेशीर ठरते. यासह त्यातील मॅग्नेशियमच्या विपुल प्रमानामुळे त्वचा आणि श्वसन रोगांवर उपचार करणे शक्य आहे.

समुद्र

आणि म्हणूनच श्वसन आणि त्वचेचे रोगसारख्या इतर आजारांवर उपचार म्हणून मृत समुद्राचे पाणी खूपच प्रसिद्ध आहे. औषधी गुणधर्मांमुळे पर्यटकांसाठी चांगल्या सुविधांची व्यवस्था देखील येथे केली आहे तिथे बरेच हॉटेल, शॉपिंग सेंटर इत्यादी देखील बांधली गेली आहेत. याशिवाय पश्चि्म किनाऱ्यावरील पर्यटकांसाठीही कल्याण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

मृतसमुद्राच्या काठावरील काळी माती चेहरा सुशोभित करण्यासाठी खूप उपयुक्त असून लोक चेहऱ्यावर लावण्यासाठी या मातीचा वापर करतात. अनेक सौंदर्य कंपन्या आपल्या सौंदर्य उत्पादनांसाठी इथली माती वापरतात यावरूनच लक्षात येते की ही माती सौंदर्यासाठी किती ख़ास आहे.

मृत समुद्रावर मात्र एक धोका वाढत चालला आहे आणि तो म्हणजे जगभरात प्रसिद्ध असलेला हा मृतसमुद्र पाण्याअभावी अटक चालला आहे म्हणजेच कमी होत चालला आहे. या मृत समुद्रात प्रामुख्याने जॉर्डन नदी तसेच इतर लहान नद्यांचे पाणी येते, जी जॉर्डन नदी सीरिया आणि लेबनॉन मधून जाते. महत्त्वाचे म्हणजे देशांच्या परस्पर मतभेदांचा देखिल या समुद्रावर खोलवर परिणाम होत आहे.

असे देखील म्हटले जाते की, इस्राईलने जॉर्डन नदीच्या पाण्याचा वापर त्याच्या दक्षिणेकडील भागातील लोकसंख्येसाठी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे गोड आणि खाऱ्या पाण्याच्या एकत्रित होण्यावर किंवा दोन्ही पाण्याचे मिश्रण होण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे.

या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार केल्यास हा मृत समुद्र हळूहळू त्याच्या मृत्यूच्या कगारी वर पोहोचला आहे असे  म्हणणे वावगे ठरणार नाही. तरी एकदा या मृत समुद्राला अवश्य भेट द्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : गुन्हेगारी जगतातील सर्वांत खतरनाक महिला किलर विषयी वाचा सविस्तर …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here