आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अंदमान निकोबार बेट जपानने इंग्रजांकडून हिसकावून नेताजींना दिले होते..!


आज आपण ज्या मोकळ्या मनाने आपल्या देशात श्वास घेतो आहोत तो मिळवण्यासाठी आपल्या कित्येक थोर क्रांतिकारकांनी स्वतःच्या रक्ताची आहुती दिली आहे..! जेव्हा पण गोष्ट भारताच्या स्वातंत्र्याची येते तेव्हा ती म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ वर येऊन थांबते.. परंतु या आधी देखील अशा कित्येक घटना झाल्या ज्यात इंग्रजांनी भारताचा प्रदेश बळकावण्याचा प्रयत्न केला आहे.

अशीच एक संधी चालून आली ती म्हणजे १९४३ला.. जेव्हा अंदमान निकोबार द्वीप समूहावरील ब्रिटीशांना सत्ताधारी जपानी लोकांनी हुसकावून लावले… आणि ते बेट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वाधीन केले..!

Andaman and Nicobar Ross Island Neil Island Havelock Island renamed as Netaji Subhash Chandra Bose Island Shaheed Dweep and Swaraj Dweep

new google

ही गोष्ट ३० डिसेंबर १९४३ ची आहे, जेव्हा स्वातंत्र्यसैनिक आणि आझाद हिंद फौज सेनेचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा ‘स्वतंत्र भारताचा’ महत्त्वपूर्ण भाग असणाऱ्या अंदमान-निकोबार बेटांवर भारताचा राष्ट्रीय ध्वज फडकावला.

चला, या लेखातून माहिती करून घेऊया की अंदमान आणि निकोबार बेटे इंग्रजांच्या तावडीतून कसे मुक्त झाले आणि त्यावर भारतीय तिरंगा कसा फडकावला गेला !

मराठा साम्राज्याने यास भारतासोबत जोडले!

अंदमान आणि निकोबार बेटे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेस, हिंद महासागरात असणाऱ्या सुमारे ३६ लहान-मोठ्या बेटांचा समूह आहेत. जरी आजची जीवनशैली बदललेली असली तरीही, जारावा, आंगे, सेंटॅलिस आणि संपियन या सारख्या
आदिवासी प्रजाती त्यांचे मूळ रहिवासी मानले जात. शतकानुशतके पूर्वी हेच आदिवासी आफ्रिकेतून अंदमानला आले होते.

म्हणूनच अंदमानचा इतिहास खूप जुना आहे.

आठव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत चोल वंशातील राज्यकर्त्यांनी येथे राज्य केले. येथे ते आपल्या नाविकांना युद्धासाठी प्रशिक्षण देत असत. मग चोल शासन भारताच्या किनारपट्टीपासून इंडोनेशियापर्यंत पसरला आणि त्यामुळे अंदमान त्याचाच एक भाग राहिला.

काळ बदलत गेला आणि सोळाव्या शतकाच्या आसपास या बेटावर पोर्तुगीज लोकांचे लक्ष गेले. आणि त्यांनी या बेटास कॉकस असे नाव दिले. तोपर्यंत भारतात मराठा हे शक्तिशाली साम्राज्य उदयास आले होते.

मग मराठा येथे १७ व्या शतकाच्या सुमारास पोहोचले आणि त्यावेळी त्यांच्या जहाजासाठी या बेटाचा वापर त्यांनी तात्पुरता समुद्र तळ बनवण्यासाठी केला. मराठा नौदलातील अ‍ॅडमिरल कान्होजी यांनी आपली नौदल सेना या बेटांवर स्थापन केली व अंदमान आणि निकोबारची सर्व बेटे भारतात जोडून संलग्न केली.

तेव्हा पासून ते आतापर्यंत अंदमान भारताचाच एक भाग म्हणून ओळखला जातो.

१७८९ मध्ये इंग्रज अंदमानला येऊन पोहोचले.

ब्रिटिश व्यवसाय करण्याच्या बहाण्याने जरी भारतात आले होते, परंतु सन १६०० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्या नंतर त्यांचा हेतू बदलला. आणि पुढच्या काही वर्षांतच त्यांनी जवळजवळ संपूर्ण भारत त्यांच्या ताब्यात घेतला.

त्याच वेळी, १७५५ मध्ये, तेथे परदेशी लोकांमधील डॅनिश लोक प्रथम अंदमान आणि निकोबार येथे पोहोचले आणि १७५६ मध्ये तेथे त्यांनी ‘न्यू डेन्मार्क’ नावाची वसाहत बनविली. वेळ आपले रंग बदलत होता आणि तेव्हाच इंग्रजांनींही आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली.. ब्रिटीशांनी पहिले इ.स.१७८९ मध्ये अंदमान पोहोचून आधी आपली वसाहत बांधली आणि त्यानंतर नेव्हल मिलिटरी बेस स्थापन केला.

१८६८मध्ये ब्रिटीशांनी इथल्या कमकुवत झालेल्या डच लोकांकडून त्यांच्या वसाहती विकत घेतल्या. अशाप्रकारे इथूनच डचांचे ‘डॅनिश’ शासन संपले. मग इंग्रजांनी संपूर्ण अंदमान निकोबार आपल्या ताब्यात घेतला.

येथे देण्यात येत होती काळ्या पाण्याची शिक्षा!

ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडलेल्या. देशात ब्रिटीशांविरोधीचा संताप धुमसत होता आणि भारत त्यावेळी स्वातंत्र्यासाठी लढा देत होता, म्हणूनच ब्रिटीशांना, समुद्रात वेढलेल्या या तुरूंगात क्रांतिकारकांना घालणे सर्वात योग्य वाटले.

अंदमान निकोबार

अंदमान निकोबारमधील या कारागृहाचे बांधकाम सन १८९६ मध्ये सुरू झाले, जे सन १९०६ मध्ये पूर्ण झाले. या जेलचे नाव ‘सेल्युलर जेल’ असे ठेवण्यात आले. जे सात भागात विभागले गेलेले.

ब्रिटिश या सेल्युलर जेलमध्ये अशा क्रांतिकारकांना पाठवत असत ज्यांना जन्मठेपेची शिक्षा मिळत असे. जीवाचा थरकाप उडवून देणारी ही शिक्षा, जिला ‘काळ्या पाण्याची’ ची शिक्षा देखील म्हटले जात.

सेल्युलर जेल त्या वेळी अंधारकोठडीपेक्षा कमी नव्हते. तेथून कैद्यांना पळ काढणे निव्वळ अशक्य होते. अशा परिस्थितीत देशाच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणारे असे क्रांतिकारक त्यांना चळवळीपासून दूर ठेवण्यासाठी या तुरुंगात टाकले जाई.

वीर सावरकर, पंडित परमानंद, उल्हासकर दत्त, बीरेंद्र कुमार घोष, पृथ्वीसिंग जाड, पुलिन दास, त्रिलोक नाथ चक्रवर्ती आणि महावीर सिंह या महान क्रांतिकारकांना या तुरुंगात टाकले गेले होते. स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून या ठिकाणाला घोषित केले, आजही स्वातंत्र्यलढ्यातल्या वीरांच्या आठवणी येथे जपल्या गेल्या आहेत.!

भारताने जपानच्या मदतीने मिळवले स्वातंत्र्य

अनेक वर्षांच्या संघर्षानंतरही जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळत नव्हते, तेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आशियाच्या अनेक देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या मदतीने ‘आझाद हिंद फौजेची’ स्थापना केली. ही बाब १९४२ ची आहे, त्या काळात द्वितीय विश्वयुद्ध सुरू झाले होते. ज्यामध्ये जपान ब्रिटनविरूद्ध लढत होता.

त्या काळात आझाद हिंद फौज देखील अंदमानच्या बेटांवर भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढत होती. मग जपानी सैन्य १९४२ मध्ये इंग्रजांशी लढा देत देत अंदमान-निकोबार बेटांवर पोहोचले. ज्यामुळे आझाद हिंद फौजेला जणू नवचैतन्य मिळवुन देण्याचे कार्य केले.

२३ मार्च १९४२ रोजी जपानी सैन्याने अंदमान बेटांवर ताबा मिळवला आणि तेथून इंग्रजी सैन्याला हद्दपार केले.

आता अंदमान आणि निकोबार इंग्रजांच्या बेड्या तोडून बाहेर पडले होते आणि तेथील शासन व्यवस्था जपानच्या हाती आली होती.

नेताजींनी तेथे प्रथमच तिरंगा फडकावला

या सर्वांच्या दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंतरिम आझाद हिंद सरकारची स्थापन केली होती. तोपर्यंत नेताजींचे जपानी लोकांशीचे संबंध आणखी दृढ झाले होते. जपान्यांनी नेताजींना निरोप पाठविला की त्यांनी अंदमान आणि निकोबार ताब्यात घेतले आहेत. या संदेशानंतर नेताजींनी अंदमान निकोबार बेटांवर जाण्याचे ठरविले.

२ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजींनीही ब्रिटीश सरकारविरूद्ध युद्धाची घोषणा केली.

७ नोव्हेंबर १९४३ रोजी जपानचे पंतप्रधान हिडेकी तोजो यांनी अंदमान आणि निकोबार बेट नेताजींच्या अंतरिम सेना सरकारकडे सोपवले. आता अंदमान निकोबार बेटे पूर्णपणे स्वतंत्र झालेली. आणि यामुळेच ३० डिसेंबर १९४३रोजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘स्वतंत्र भारताच्या’ या महत्वाच्या भागावर सर्वप्रथम तिरंगा फडकावला.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here