आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

रडत असलेल्या व्यक्तीलाही हसवू शकतात हे पाच भन्नाट विनोदी कलाकार!


कला ही गोष्ट फार अप्रतिम असते. अर्थात या कलेच्या जोरावर अनेक लोकांची मने जिंकून घेता येतात. याच कलेच्या जोरावर विविधांगी स्वरूपाच्या गोष्टीदेखील करता येतात. कला म्हणजे मानवाला लाभलेलं एक प्रकारचं सर्वश्रेष्ठ वरदान आहे, असं म्हणता येईल. माणूस दैनंदिन आयुष्यात जगत असताना त्याला कधी ना कधी एखाद्या विरंगुळ्याची गरज ही भासतेच. आणि हा विरंगुळा म्हणुन आज कलेतील बऱ्याचशा गोष्टींकडे प्रामुख्याने पाहिल्या जातं. आणि मुळात विरंगुळ्यातील महत्वपूर्ण गोष्ट किंवा भुमिका असते ती विनोदाची.

विनोदनिर्मिती किंवा विनोद करून एखाद्याच्या चेहर्‍यावर हास्य आणणं कधीकधी जरासं कठीण बनून जातं. भारतात आजवर उत्तम दर्जाचे अनेक विनोदी कलाकार होऊन गेले आणि काही आजही आहेत.आणि विनोदवीरांच्या म्हणण्यानुसार विनोद निर्माण करणं फारच अवघड गोष्ट आहे.

 विनोदी कलाकार

new google

प्रत्येक कलाकार विनोदात्मक निर्मिती किंवा ती शैली निर्माण करेल असं नाही. परंतु काही खास कलाकार असतात जे प्रचंड प्रमाणात विनोद सहजरित्या करून जातात. एखाद्या अभिनेत्यानेही विनोदनिर्मिती करणं हा ट्रेंड एकप्रकारे भारतात गोविंदा या अभिनेत्याने रूजवला असं म्हणता येईल.

गोविंदाच्या या पावलांवर इतर अभिनेत्यांनी पाऊल ठेवायचा बराच प्रयत्न केला परंतु गोविंदाप्रमाणे ते इतर ठराविक एक दोन अभिनेते सोडले तर फारसं कोणाला जमलं नाही.

परंतु गोविंदाच्या नंतर अनेक कलाकारांनी विनोदी शैलीला आपली खास कला बनवून लोकांसमोर येणं पसंत केलं. तर आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेऊयात ज्यांच्यात एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीलाही हसवण्याची धमक आहे.

सर्वात आधी आपण बोलायचं म्हटलं तर तो कलाकार म्हणजे सुनील ग्रोवर. अर्थात सुनील ग्रोवर याला आज प्रत्येक रसिकप्रेक्षक ओळखतो तो खास त्याच्या अप्रतिम विनोदी शैली आणि त्यात खिळून ठेवणारी त्याची बोलण्याची पद्धत.

टेलीव्हिजनच्या माध्यमातून आपल्या विनोदी शैलीला फुलवत पुढे बॉलीवुडमधील प्रवास चालू ठेवलेला हा अवलिया कलाकार. डॉक्टर गुलाठी ही व्यक्तिरेखा प्रचंड प्रमाणात लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुनीलने वारंवार ऑनस्क्रीन आल्यावर प्रत्येकालाच हसवण्यात कुठलीच कसर नाही सोडलेली. सुनील ग्रोवर याने आजच्या घडीला विविध सिनेमांमधूनही आपल्या कामगिरीची छाप पाडल्याची दिसून येते आहे. सुनील ग्रोवर हा एके काळी सध्याचा प्रसिद्ध विनोदवीर कपील शर्मा याच्याच कार्यक्रमाचा भाग राहिला होता.

कपील शर्मा, आत्ताच वर उल्लेख केल्याप्रमाणे तोदेखील एक भन्नाट विनोदवीर आहे. आणि गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचा कार्यक्रम अगदी तेजीत चालत असल्याचा पहायला मिळतो. त्याच्या विनोदी कार्यक्रमाच अनेक कलाकार त्यांचे सिनेमे प्रमोट करण्यासाठीही घेऊन येतात. कपील शर्मा याच्याकडे जी विनोदशैली आहे ती सहसा स्पष्ट आणि काहीशी हजरजबाबीपणा असलेली पहायला मिळते. कपील शर्माच्या कार्यक्रमात तो ज्या पद्धतीने लोकांच मनोरंजन करतो ते फारच एकमेवाद्वितीय वाटतं. कपील शर्मानेदेखील त्याच्या विनोदाची सुरूवात टेलीव्हिजनच्या माध्यमातूनच केली होती.

भारती सिंह, हे बऱ्याचदा चर्चेत राहणारं नाव असल्याने ऐकलचं असेल. भारती एकप्रकारे विनोदाच्या अनुषंगाने फारच विचित्र काहीतरी प्रतिक्रिया देत विनोदात्मक निर्मिती करते. तिच्या विनोदाला लोकांचा भरपूर प्रमाणात लाफ्टर मिळतो. भारती सिंह हिच्या लल्ली या पात्राने तर अगदी प्रेक्षकांना प्रचंड हासवून सोडलं होतं. तिच हे पात्र लोकांच्या आजही चांगलच लक्षात आहे. भारती सिंह एकमेव अशी स्री आजच्या घडील म्हणावी लागेल जी अगदी तिच्या फारच वेगळ्या असलेल्या विनोदशैलीतून प्रेक्षकांना पुरत हसवू शकते.

विनोदी कलाकार

राजू श्रीवास्तव, या नावाचा डंका तर तमाम भारतीयांना माहितचं आहे. राजू श्रीवास्तव याच्याबद्दल काही खास वेगळं काय सांगायचं? कारण जे काही आहे ते सारंच आजच्या पिढीला ठाऊक आहे. राजू श्रीवास्तव जास्तीत जास्त नकला करणं आणि आपला वेगळा अंदाज याकरता प्रसिद्ध आहेत. राजू श्रीवास्तव यांच्या कार्यक्रमांना आजही तितकीच गर्दी असते जितकी काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रसिद्धीच्या शिखरावर असताना होती. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच गजोधर हे पात्र अगदी रसिकप्रेक्षकांच्या मनावर चांगलचं उमटवलं आहे. राजू श्रीवास्तव यांनी सिनेमादेखील केले. राजू श्रीवास्तव यांच्या विनोदी शैलीत कथा सांगण्याची ताकद आहे ती अप्रतिम म्हणावी लागेल.

कृष्णा अभिषेक, ज्याच्या नावाचा उल्लेख सहसा विनोदी अभिनेता गोविंदाच्या नावासोबत केला जातो. कारण अभिनेता गोविंदा हा त्याचा मामा आहे. कृष्णाकडे खरतरं गोविंदाप्रमाणेच विनोदाची झालर अलगद आलेली पहायला मिळते. याशिवाय कृष्णाकडे विनोदाची अचूक टायमिंगदेखील उत्तम आहे. विनोदात्मक निर्मितीत सुदेश लहरी आणि कृष्णा अभिषेक यांची जोडी एके काळी प्रचंड प्रसिद्ध झाली होती. कृष्णा अभिषेक याने विनोदात्मक गोष्टी करण्याआधी बऱ्याचशा भोजपुरी सिनेमांमधे काम केल्याच पहायला मिळालं आहे. कृष्णा अभिषेक याच्या आजही विविध प्रकारच्या विनोदनिर्मितींना रसिकप्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळालेला पहायला मिळतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here