आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

प्रभू श्रीरामांचा मृत्यू टळला असता,जर महाबली हनुमान प्रभूंची ही लीला समजू शकले असते!


आजच्या युगात रामायण माहित नसेल किंबहुना कधीच पाहिलं नसेल अशी लोकं क्वचितच असतील. परंतु या रामायणातील एकुण एक लहानसहान बाबी फारच सुंदर आणि अगदी काहीतरी वेगळं भासवून जातील अशा स्वरूपातल्या होत्या. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की देव असतानाही राम, कृष्ण वा इतर देवांचे अवतार यांचे मृत्यू कसे झाले? तर खऱ्या अर्थानं यापाठी अने गोष्टींची रहस्ये दडलेली आहेत.

पण जेव्हा साक्षात देवाने पृथ्वीवर एखाद्या रूपात येण्याची योजना आखतात तेव्हाच स्वत:च्या अंताची गोष्टदेखील लिहून ठेवतात. परंतु  श्रीराम यांच्या मृत्यूची गोष्ट जराशी वेगळी पहायला मिळते. तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे की, हनुमानाकडे काळाच्या देवालाही थांबवण्याची शक्ती होती. अर्थात हनुमानाकडे जे खास ८ वरदान आहेत ते फारच चमत्कारिक स्वरूपाचे आहेत.

हनुमान

new google

हनुमानाबद्दल प्रत्येक गोष्टीची पुरेपूर माहिती असणाऱ्या प्रभू श्रीरामांनी सर्वात प्रथम हनुमानाला अयोध्येपासून दुर करण्याची सोय केली. कारण श्रीरामांना याची खात्री होतीच की, जरं असं झालं नाही तर आपल्यावर पुर्ण निष्ठा असलेला हनुमान काही केल्या आपल्या मृत्युला सामोर जाण्याऐवजी आपल्याला जिवंत ठेवण्यास प्रवृत्त होईल.

पुरातन पौराणिक इतिहासात हनुमानाने प्रभू श्रीरामांच्या रक्षणाची जिम्मेदारी कायमच स्वत:च्या खांद्यावर घेतल्याची पहायला मिळते. आणि हनुमानाने एकदा अयोध्या सोडल्याने हनुमान अयोध्येत काही घडलं तरी आता प्रवेश करू शकणार नव्हते.

तरीदेखील अंतीम क्षणांमधे यमदेवाशी युद्ध करत हनुमान प्रभू श्रीरामांना वाचयायला येणार हे जाणून घेतलेल्या प्रभू श्रीरामांनी एक दुसरी युक्ती आखण्याचा विचार केला. ज्यामधे हनुमानाला प्रभू श्रीरामांच्या हातातील अंगठीचा शोध घेण्याची वेळ आली. एका दरवाजाच्या छोट्याशा फटीत श्रीरामाने आपली अंगठी फेकली आणि हनुमानाला तिचा शोध घेण्याची आज्ञा दिली. हनुमान ज्यावेळी आपल्या शरीराचा आकार बदलून त्या अंगठीचा शोध घेऊ लागला, त्यावेळी हनुमानाला कोडे पडले.

हनुमानाला एक गोष्ट लक्षात आली की दरवाजातली ही फट काही साधी फट नाही. हनुमान आत जाऊ लागले होते परंतु तरीही तिचा संपण्याचा काहीच अंदाजा नव्हता. आणि शेवटी एके ठिकाणी हनुमान थेट पोहोचले, ती जागा म्हणजे नागलोक. तोपर्यंत इकडे प्रभू श्रीरामांना भेटायला काळाचे देवता म्हणून ओळखले जाणारे देवता ऋषीमुनींचे रूप घेऊन आले होते.

प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणाला आदेश दिला की, त्या दोघांच्या बोलण्यात कोणाचाही व्यत्यय नाही आला पाहिजे. कोणालाही आत यायची परवानगी दिली जाऊ नये. प्रभू रामाच्या आज्ञेनुसार तिथे लक्ष्मण बाहेर पहारा देऊ लागला. त्याचक्षणी प्रसिद्ध दुर्वास ऋषींच तिथे आगमन झालं. आत कोणालाही परवानगी नाही, ही बाब समजताच दुर्वास ऋषींचा क्रोध अनावर झाला त्यांनी प्रभू श्रीरामांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यायच ठरवलं.

परंतु लक्ष्मणाने त्यावेळी सारी जोखिम पत्कारत तो मृत्यूदंड आपल्यावर ओढावून घेतला. त्यानंतर दुर्वास ऋषींच आणि  श्रीरामाच बोलणं झालं. प्रभू रामांनी आपला भाऊ लक्ष्मणाचा मृत्यूदंड वापस घेतला परंतु त्याला अयोध्येतून हद्दपार करण्यात आलं. लक्ष्मण पहिल्यांदाच आपला प्रिय भाऊ रामाला सोडून बाहेर राहू लागला. तो प्रचंड दुःखी झाला. शेवटी लक्ष्मणाने शरयूच्या तिरावर ध्यानमुद्रा लगावत जल समाधी धारण केली.

हनुमान

इकडे नागलोकाचे प्रमुख असलेल्या वासुकींनी हनुमानाला प्रभू श्रीरामांच्या अंगठीचे एक ठिकाण दाखवले. तिथे अंगठ्यांचा ढीग साचलेला होता. त्यात एक अंगठी शोधण फार कठीण होतं. हनुमानाने पुढे जात एकेक अंगठी पाहणं सुरू केलं तर लक्षात आलं की, प्रत्येक अंगठी ही तर प्रभू श्रीरामांचीच आहे. हनुमानासमोर एका नजरेत प्रभू श्रीरामांच्या या रचनेमागचा हेतू चमकून गेला.

त्यावेळी वासुकीने हनुमानाला समजावण्याचा प्रयत्न केला की, “या जगतात जो येतो त्याला एक दिवस जाणं भाग आहे.” हनुमानला प्रचंड खंत झालेली होती. जर असं काही आधीच ठाऊक असतं तर हनुमानाने अयोध्या सोडलीच नसती. त्यामुळे असं म्हटलं जातं की, हनुमानाला ही प्रभू श्रीरामांची चाल ओळखता आली असती तर कदाचित त्यांनी श्रीराम यांचा जीव वाचवलाच असता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

कांगारू खेळाडूंना वाटू लागली कोरोनाची भीती: ‘या’ खेळाडूंनी घेतली आयपीएलमधून माघार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here