आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

जगज्जेता सिकंदरच्या या तीन महत्वकांक्षी ईच्छा, मृत्युआधी त्याने केल्या होत्या व्यक्त!


सिकंदर हे नाव तुम्हा आम्हाला ऐकायला फारसं नवीन नाही. इतिहासात उल्लेख असलेला किंवा लहानपणी इतर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपण त्याच्याबद्दल ऐकतच आलो आहोत. सिकंदरच्या बहादुरीच्या गोष्टी लहानपणीही प्रेरणा द्यायच्या तशा अनेकदा आजही देतात.

सिकंदर म्हणजे अगदी इतका प्रचंड महत्वाकांक्षा उराशी बाळगणारा जग जिंकायच्या सफरीवर निघालेला राजा. त्याला त्याच्या प्रत्येक विरोधी राजाला थोडक्यात विरोधकांना नमवण्यात आवड असायची. सिकंदर त्याच्या जग जिंकायच्या अशा भयावह टप्प्यावर आला होता की, त्याची महत्वाकांक्षा अगदी लोकांचे हकनाक बळीदेखील घ्यायला मागेपुढे पाहत नसायची.

सिकंदर

new google

खरतरं तसा पहायला गेलं तर जगातला अगदी सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम अथवा इतर कोणताही मनुष्य म्हटला तर तो त्याच्या स्वत:च्या मृत्यूच्या चिंतेने अगदी त्रासला जातोच. कारण मृत्यू हे अंतीम सत्य सहसा आपल्याला स्विकारणं जड होऊल बसलेलं असतं. त्यात एखादा असा महत्वकांक्षी पुरूष म्हणजे सिकंदर.

इतरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या राजाला जर मृत्युचं त्याच्यावर हक्क गाजवणार हे लक्षात आल्यावर त्याची अवस्था काय झाली असेल हे फार वेगळा अनुभव देऊन जातं. सिकंदर सारख्या जगज्जेत्या राजाला त्याचा अहंकार आणि स्वत:वर असलेला प्रचंड विश्वास खरतरं महागात पडला असं म्हणावं लागेल.

सिकंदर मृत्युच्या खाईत स्वतःला लोटू पाहत नव्हता आणि त्याला वाटू लागलं होतं की, भारताच्या एका भागात चक्क अमृत मिळतं. त्या अमृताच्या शोधाच्या विचारात मग्न झालेल्या सिकंदरने भारताकडे आपला मोर्चा वळवला.

सिकंदरने मृत्युच्या आधी आपल्या खास मंत्र्यांकडे त्याच्या मृत्युपश्चात काही ठराविक ईच्छा पुर्ण करायची गोष्ट सांगितली होती. अर्थात सिकंदर सारखा व्यक्ती असं काहीतरी व्यक्त करतो म्हटलं की जरा आश्चर्यकारकचं वाटतं. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोणत्या होत्या या नेमक्या तीन ईच्छा? आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता?

सर्वात आधी म्हटलं तर सिकंदरच म्हणणं होतं की, ज्या डॉक्टरांनी माझ्यावर मरताना उपचार केले, त्यांनीच माझ्या अर्थीला खांदा द्यावा. त्यामुळे लोकांना दिसू शकेल की, रोगांचे निदन करणारे डॉक्टर्सदेखील मृत्युला नाही थांबवू शकले.

सिकंदर

सिकंदरच्या जीवनातील एका कठीण प्रसंगात तो जी गोष्ट शिकला होता ती त्याला मृत्यूसमयी प्रखर्शाने जाणवली आणि त्याने तिच्यावरून शिकलेला धडा लोकांना घेता येईल याकरता दुसरी ईच्छा सांगितली. ती ईच्छा होती की, ज्या ठिकाणाहून सिकंदरची अर्थी जाईल तिथे वाटेवर त्याची कमावलेली सारी संपत्ती टाकण्यात यावी; जेणेकरून लोकांना समजेल की पैसा कितीही कमावला तरी मृत्युसोबत तो घेऊन जाता येत नाही. किंवा संपत्ती मृत्यू आल्यावर मदतीला येत नाही.

जगज्जेता सिकंदरच्या दोन्ही हातांना अगदी मोकळेपणाने अर्थीच्या बाहेर सोडून दिलं जावं; जेणेकरून लोकांना समजावं माणूस रिकाम्या हातांनी आला आणि रिकाम्याच हाताने पुन्हा परत जाणार. सिकंदरच्या एकूण एक ईच्छेत त्याला जिवंत असताना न अनुभवलेली परिस्थिती ऐन मृत्यू जवळ आल्यावर दिसल्याची प्रचिती या तीन ईच्छांमधून येते.

सिकंदर खरतरं त्याच्या मृत्युची बाब समजून घ्यायला किंवा मान्य करायला कधीच तयार झाला नसता. परंतु भारतात येत असताना त्याला एक साधू भेटला ज्याने सिकंदरला एका पाण्याच्या थेबांच महत्व हे त्याच्या कमावलेल्या संपत्तीपेक्षा अधिक आहे हे पटवून दिलं तेव्हा सिकंदर जरा हे सत्य मानू लागला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जगज्जेत्या सिकंदरने वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला होता.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

थोडफारही सैन्य नसलेल्या या देशांची सुरक्षा कशी केली जाते, हे तुम्हाला माहिती असायलाच हवे..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here