थोडफारही सैन्य नसलेले हे देश अशा प्रकारे सुरक्षित ठेवतात…!


 

आजच्या घडीला म्हणजे साधारणत: आपण 21 व्या शतकात एखाद्या देशाकडे त्याची सुरक्षा नसेल असा विचार करू शकत नाही. म्हणजे साहजिकचं प्रत्येक देशाला त्याची आर्मी आजच्या घडीला असणं किती महत्वाचं आणि गरजेच आहे हे आपल्याला माहित आहे. परंतु तरीदेखील या जगात असे काही देश आहेत ज्यांना सैन्याची गरज नाही किंबहुना त्यांनी सैन्याची ऊभारणी केलीच नाहीये.

आज भारत, रशिया, अमेरिका आणि इतर काही देश असतील तर त्यांच्याकडे सुरक्षिततेसाठी केवळ सैन्यच नाही तर इतरही सुविधा उपलब्ध असल्याच्या पहायला मिळतात. परंतु काही ठराविक असे देश जे की आजही विनासैन्य सुखात जगत आहेत तर आपण आज याच गोष्टींवर एक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सर्वात प्रथम जो देश येतो तो म्हणजे, समोआ. समोआ हा देश न्यूझीलंड या देशापासून आझाद झालेला देश आहे. समोआ आजच्या घडीला शांतिप्रिय देश असलेला पहायला मिळतो आहे. या देशाचं एकूण क्षेत्रफळ म्हणाल तर ते अगदी कमी जवळपास 2842 चौरस किमी एवढं आहे.

समोआतील लोकांना रक्तपात किंवा हिंसेचे दुष्परिणाम याची पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे इथला मुख्य कारभार हा केवळ पोलीस यंत्रणेवरच चालत असतो. न्यूझीलंड या देशाने गरज पडल्यास त्यांना सुरक्षा देण्याची गोष्टही बोलून दाखवली आहे.

new google

सोलोमन आयलँड, हा त्यानंतरचा देश. या देशावरून आजवर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अनेकदा खडाजंगी झाल्याच्या पहायला मिळाल्या आहेत. आज जरी हा देश ऑस्ट्रेलियाच्या आख्यायतित असला तरी न्यूझीलंडची महत्त्वाकांक्षी नजर यावर होतीच. हा देश म्हणजे एकप्रकारे काही ठराविक बेटांचा बनलेला समुह आहे.

हा देश खरतरं ब्रिटेनच्या सरंक्षण क्षेत्रात व्यापलेला होता. परंतु संरक्षण काढल्यानंतर या देशाला घेऊन राजकारणात बऱ्याच गोष्टी झाल्या. 28,400 वर्ग किमी एवढ्या भागात हा देश पुर्णत: पसरलेला पहायला मिळतो. या देशाची आजची पाठराखण करायचं कर्तव्य सध्यातरी ऑस्ट्रेलियाच्या जिम्मेदारीवर आहे. या देशात कुठल्याही प्रकारची सैन्य दलाची स्थापना झालेली नाही.

सैन्य

कोस्टारिका, हे नाव तुम्ही कधीतरी ऐकलं असावं. कारण हा देश एका मोठ्या हालचालींचा हिस्सा राहिला आहे. सिवील वॉर हा या देशात घडला होता. आणि या युद्धात तब्बल 2000 पेक्षा अधिक लोकांचा बळी गेल्याच्या बातम्या त्यावेळी प्रसारमाध्यमांमधे झळकत होत्या

. या घटनेनंतर तेथील तत्कालीन राष्ट्रपतींनी सैन्य दल बरखास्त करून टाकण्याचा निर्णय दिला. आता सध्याच्या घडीला इथे बॉर्डल पेट्रोल आणि पोलीस यंत्रणाच कार्यरत आहेत. अमेरिकेतील तब्बल छोटेमोठे 20 पेक्षा अधिक देश या देशाला गरजेच्या वेळी मदत करण्यास उभे राहणार असल्याचही एका तहात निश्चित केल्या गेलं आहे.

एंडोरा, हा युरोप येथील एक देश आहे. तब्बल 1276 सालात या देशाची निर्मिती झालेली पहायला मिळते. या छोट्याशा देशाला कायम इतर नजीकच्या राष्ट्रांचा मदतीचा हातभार लागत आलेला पहायला मिळतो. “ड्युटी फ्री चार्जेस” आणि रिसॉर्ट या गोष्टींकरता हा देश प्रामुख्याने चर्चेत राहतो.

या देशात टॅक्स अर्थात आयकर सर्वाधिक कमी किंवा जवळपास नसल्यात जमा आहे. या देशात पोलीस भरती प्रक्रियेत पहिला नियम म्हटलं तर तुमच्याजवळ एखादं स्वत:च हत्यार पाहिजे असा वेगळाच नियम आहे.

या देशाला सतत वेळोवेळी स्पेन व फ्रान्स हे दोन्ही देश मदतीचा हात पुरवतात.

ग्रेनेडा, ग्रेनेडाने एकदाच घडलेल्या भयानक स्फोटातून खुप काही गमवलं आहे. अमेरिकेसारख्या बलशाली देशाने या देशावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर येथील पहिली सैन्य दलाची जी काही रचना होती ती आता पुर्णत: बरखास्त केल्या गेली आहे. त्या सैन्यबलाचा वापर आधी हुकूमशाहीकरता करण्यात आला होता. पण आजच्या घडीला इथे लोकतंत्र आहे. हा देश आकारमानाने फारच छोटासा आहे. लोकतंत्र झाल्यापासून आणि सैन्याची बरखास्ती झाल्यापासून येथील पोलीसांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत.

These Are the 31 Countries That Don't Have Armed Forces

मार्शल आईसलँड, ते साल होतं जवळपास 1983 ज्यावेळी हा देश स्वतंत्र झाला. परंतु आजही अनेकजण या देशाला अमेरिकेचाच हिस्सा संबोधतात. केवळ 181 चौरस किमी वर्ग एवढंच याच क्षेत्रफळ आहे. सोबतच जरी या देशात स्वत:ची सैन्य व्यवस्था नसली तरी या देशावर इतर कुणी हल्ला केला तर तो थेट अमेरिकेवर हल्ला ग्राह्य धरला जाईल अशी याची स्थिती आहे. त्यामुळे शक्यतो लहान जरी असला तरी या देशाकडे वाकडी नजर इतर कोणताही देश ठेवू शकत नाही.

लिंचेस्टाईन, हा देश म्हणजे ज्याला कधीच सैन्याची गरज भासली नाही आणि कदाचित इथून पुढेही याला कोणाच्या मदतीची गरज पडणार नाही. 1868 सालात घडलेल्या एका पर्सियन लढ्यात या देशाने प्रचंड पैसा आणि आर्थिक सुबत्ता गमावली. या कारणास्तव या देशाने पुढे सैन्यदल बंद करण्याचा निर्णय घेतला. आजच्या घडीला येथील सर्व पोलीस यंत्रणा ही सरकारच्या देखरेखेखाली चालते. स्वित्झर्लंडच्या सैन्याने या देशावर सुरक्षेची नजर ठेवल्याने या देशाला फारशी बाह्यहल्यांची चिंता नाही.

नॉरू, हा देश खरतरं महासागराच्या बेटावरील देश म्हणावा लागेल. तोदेखील सर्वाधिक मोठा महासागर असलेला प्रशांत महासागर यावर स्थित. याच क्षेत्रफळ अगदी लहान 21 चौ किमी वर्ग इतकचं असल्याने इथे सैन्याची कसलीही गरज नाही. केवळ पोलीसांचा काय तो थोडा समावेश आहे. गरजेला ऑस्ट्रेलिया मदत करायला नेहमी तत्पर असतो.

सैन्य

वेटिकन सिटी, हे नाव एकप्रकारे सिनेमांमधे प्रचंड प्रसिद्ध असल्याच जाणून येतं. जगभरातल्या सर्वाधिक लहान देशांपैकी हा अगदीच लहान देश म्हणावा लागेल. इटलीची राजधानी असलेल्या रोम या ठिकाणी हा देश आहे. यामुळे साहजिकचं याची सुरक्षा ही इटलीच्या हातात आहे. त्यातही इथे केवळ स्वीस गॉर्डच संरक्षणासाठी ठेवले जातात. जे की, धर्मगुरू पोप व त्यांच्या घरांची रखवाली करतात. या देशात पोलीस व्यवस्था शक्यतो मुलभूत अधिकारांचा गैरवापर करण्यात येऊ नये याकरताच वापरली जाते.

पलाऊ, हा देश खरतरं अमेरिकेचाच भाग गणल्या जातो. या देशात आजही कोणत्याच प्रकारची सैन्य दलाची स्थापना नाही. या देशात केवळ पोलीस यंत्रणा सक्षम असल्याची पहायला मिळते. हे असे काही ठराविक देश आहेत जे अगदी शांतीच्या मार्गाने आपलं जगणं पसंत करतात. आणि इतरांना त्यासाठी प्रेरितदेखील करतात.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा

या छंदवेड्या अवलियाचे ट्रक भरून बातम्यांच्या कात्रणांचा संग्रह जमा केलाय….!

शरीरात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी झाल्यास शरीरास होते हे मोठे नुकसान…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here