आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

देशाच्या नोटावर फोटो छापुन येणारा एकमेव क्रिकेटर ‘फ्रैंक वॉरेल’ होता…!


तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहितच आहे की, एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्याच्या बाबतीत सरकारकडून अथवा त्या त्या शासनाकडून जेव्हा काही दखल घेतल्या जाते तेव्हा एकतर त्या व्यक्तीच्या सन्मानार्थ टपाल टिकीट अथवा इतर काही गोष्टींशी त्याचा संबंध जोडल्या जातो.

परंतु एक अशी खास गोष्ट असते जिथे फार क्वचित प्रसंगी एखाद्या महान पुरूषाचंच कार्य डोळ्यांसमोर ठेवून ते केलं जातं. आणि ती गोष्ट म्हणजे चलन छापणं. प्रत्येक देश आणि प्रांत यांची आज आपापली वेगवेगळी काही ठराविक चलनांची रचना तर आहेच, शिवाय आपापल्या चलनांचा प्रत्येक देशाला अभिमान वाटेल असं काही दर्शवणारं आपापल्या चलनावर कोरलेलं वा छापलेलं आढळून येतं.

क्रिकेटर

new google

तर आज आपण अशा एका खास खेळाडूबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या पराक्रमामुळे वा थोडक्यात सेवाभाव ही प्रवृत्ती कायम त्याने बाळगल्याने त्याचा थेट चलनावर फोटो लावण्यात आला. अर्थातच ही गोष्ट घडली आहे ती म्हणजे, वेस्ट इंडिजचे पुर्व क्रिकेटर राहिलेले फ्रैंक वॉरेल यांच्यासोबत.

फ्रैंक यांनी कायम त्यांच्या देशातील क्रिकेट या खेळाचा दर्जा वाढवून तो अबाधित ठेवण्याच काम केलं. फ्रैंक यांच्या फलंदाजीला येताच तमाम वेस्ट इंडिज त्यांच्यासाठी नजरे क्रिकेटकडे लावून बसत असायचा. चौकार आणि षटकारांची तुफान फटकेबाजी करून ते साऱ्यांनाच प्रभावित आणि आनंदीत करून टाकायचे.

वेस्ट इंडिज सारख्या देशात त्या काळी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी व फलंदाजीची धुरा सांभाळणारे फ्रैंक हे वेस्ट इंडिज या संघाचे नेतृत्वदेखील करत होते. एकाच वेळी तिन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी कधी क्रिकेटबद्दल त्यांची आस्था अथवा प्रेम कमी आहे याची जाणिव कधीच नाही होऊ दिली.

वेस्ट इंडिज सारख्या देशात आजही नव्या पिढीला प्रेरणा देण्याची गरज पडल्यावर याच व्यक्तिमत्वाच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम केला जातो.

फ्रैंक वॉरेल एकप्रकारे प्रचंड जबरदस्त व्यक्तिमत्त्वाची झालर सोडलेले खेळाडू म्हणावे लागतील. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु त्यांनी अनेक वर्षे वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट खेळलेलं आहे. सहसा क्रिकेट अथवा इतर क्रिडा क्षेत्रातील कोणताही माणूस निवृत्त झाल्यानंतर तो राजकारण, बॉलीवुड बायोपिक सिनेमे अथवा इतर काही गोष्टींशी संलग्नित व्हायला लागतो.

क्रिकेटर

परंतु फ्रैंक मात्र याला अपवाद ठरले. त्यांनी क्रिकेट क्षेत्रात नवे अगदी उत्तम खेळाडू बनवण्याच्या गोष्टीकडे अधिक लक्ष दिलं. वॉरेल यांचा जन्म साधारणतः १९२४ सालात बारबखडोस येथे झाला होता. वॉरेल यांना आज अनेक इतर टोपण नावानेही ओळखल्या जातं. टे, फ्लेनी हे दोन्ही त्यांचीच उपनाव आहेत.

त्या काळात खरतरं वेस्ट इंडिज संघाच क्रिकेट क्षेत्रावर प्रचंड वर्चस्व आणि दबदबा राहिल्याचा कायम पहायला मिळतो. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या जडणघडणीत महत्वपूर्ण पैलू असलेले फ्रैंक वॉरेल, एटर्वन विक्स, क्लॉईड वालकॉट अशा या तिघांना “द थ्री डब्ल्यू” अशी खास ओळख प्राप्त झालेली आहे.

आपला संघ कायम एकत्र ठेवून कार्य करत राहिलेल्या फ्रैंक यांनी एकप्रकारे इंग्रजांचा क्रिकेट केवळ गोऱ्या लोकांचा खेळ आहे हा अहंकार पुरेपूर उतरवला. वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षात फ्रैंक यांनी जगापासून निरोप घेतला. ज्यावेळी ही बातमी जगभरात पसरली त्यावेळी अनेकांनी प्रचंड हळहळ व्यक्त केली. फ्रैंक वॉरेल यांनी एक खिलाडूवृत्तीने जे काही या क्रिकेट जगताला दिलं ते नक्कीच मौल्यवान होतं.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here